एमएस धोनी झाला न्यूबर्ग डायग्नोस्टीक्सचा ब्रँड अॅम्बेसेडर

 

  एमएस धोनी झाला न्यूबर्ग डायग्नोस्टीक्सचा  ब्रँड अॅम्बेसेडर

न्यूबर्ग डायग्नोस्टीक्सची आरोग्य आणि तंदुरुस्तीविषयक संदेश पाठवण्यासाठी एमएस धोनी समवेत भागीदारी

मुंबई,17 ऑगस्ट, 2021: भारताची चौथी सर्वात मोठी डायग्नोस्टीक लॅब चेन, न्यूबर्ग डायग्नोस्टीक्सच्या वतीने भारताचा चतुरस्त्र क्रिकेटपटू एमएस धोनी समवेत भागीदारीची घोषणा करण्यात आली. न्यूबर्गच्या तंदुरुस्ती आणि आरोग्य विषयक अभियानांचा प्रचार करणे तसेच प्रत्येक नागरिकाचे उत्तम किफायतशीर आरोग्य देखभालीकरिता सबलीकरण करण्यासाठीची मेहनत इतरांना समजावी म्हणून सजगता निर्माण करण्याच्या उद्देशाने ही भागीदारी करण्यात आली.

न्यूबर्ग डायग्नोस्टीक्सचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. जीएसके वेलू म्हणाले की, एमएस धोनी आमच्या प्रगतीकारक विचारपद्धतीला साजेसा आहे. त्यामुळे आमच्या वाढीच्या काळात तो धोरणात्मकदृष्ट्या सुयोग्य ठरतो. आम्ही या भागीदारीविषयी उत्सुक आहोत आणि आमचा मार्गदर्शक तसेच ग्लोबल ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून त्याची भागीदार म्हणून निवड करताना गौरवान्वित वाटते. आमच्याकडे उपलब्ध असणाऱ्या डायग्नोस्टीक सेवांचा गुलदस्ता भारतभर पसरावा आणि आमचे प्रत्येक नागरिकाला उत्तम आणि किफायतशीर आरोग्य देखभालीकरिता सबलीकरणाच्या प्रयत्नासाठी वचनबद्ध आहोत. त्याशिवाय, धोनी देखील चांगले आरोग्य आणि तंदुरुस्तीच्या बाबतीत आग्रही असल्याने आमच्या मिशनला साजेसा आहे. त्याची आमच्या समवेत असलेली भागीदारी लोकांना आरोग्य प्राधान्याची आठवण करून देईल. धोनीने दिलेल्या पाठबळामुळे आम्ही अधिक प्रभावीपणे आमची वचनबद्धता आणि सेवांविषयी संवाद साधण्यासाठी सक्षम होऊ.

माजी भारतीय यष्टिरक्षक आणि चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी म्हणाला की,न्यूबर्गमधील अग्रणी नेतृत्व भारतात किफायतशीर आरोग्य देखभाल उपलब्ध करून देण्यासाठी वचनबद्ध आहेत. मी याच विचाराने स्तब्ध झालो आणि त्यांच्या टीमसोबत भागीदारी करून मनाला फार आनंद वाटतो आहे. त्यांच्या अनेक प्रकारच्या कार्यक्रमाच्या माध्यमांतून गुणवत्तापूर्ण आणि किफायतशीर आरोग्य देखभाल पर्याय उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. अभूतपूर्व कोविड-19 महासाथीत, सर्व वयोगटात आरोग्य आणि तंदुरुस्ती विषयक जागरुकता निर्माण करण्याची मोहीम त्यांनी हातात घेतली आहे. मला व्यक्तिश: हे प्रयत्न महत्त्वाचे वाटतात आणि ते नक्कीच समर्थन-पात्र आहेत.

पाऊलखुणांच्या विस्ताराच्या पाठबळावर कंपनीने वेगवान प्रगतीचा अनुभव केला. स्थापनेपासून अगदी चार वर्षांच्या कालावधीत कंपनी तीन खंडांत पोहोचली आहे. कंपनीचा आर्थिक वर्ष 21चा महसूल रु. 800 कोटींच्या घरात पोहोचला, तर कंपनीकडून देण्यात येणाऱ्या विविध ऑफर तसेच जगभरात 200 हून अधिक लॅब आणि 3000 कलेक्शन सेंटरच्या जोरावर आर्थिक वर्ष 22 पर्यंत महसूल रु. 1000 कोटींपर्यंत पोहोचेल.    

एमएस धोनी सोबतच्या भागीदारीमुळे युएई, दक्षिण आफ्रिका आणि युएसएच्या जागतिक बाजारपेठांत चांगला महसूल कमावण्याची संधी मिळायला मदत होणार आहे.

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth