ब्ल्यू डार्टच्या ’राखी एक्सप्रेस’ ऑफरसह प्रेमाच्या बंधाचे साजरीकरण

 ब्ल्यू डार्टच्या ’राखी एक्सप्रेस’ ऑफरसह  प्रेमाच्या बंधाचे साजरीकरण


सर्व कोविड-19 योध्द्यांसाठी विशेष ऑफरचा परिचय

 


मुंबई, 4 ऑगस्ट 2021: ब्ल्यू डार्ट, याभारतातील आघाडीच्या सेवा प्रदाता कंपनीने आणि डॉइश पोस्ट डीएचएल ग्रुप (डीपीडीएचएल)चा भाग असलेल्या कंपनीने “लोकांना जोडणे, जीवनमान सुधारणे” या आपल्या ब्रीदवाक्याला सार्थ करत आपल्या राखी ऑफरचा परिचय करुन दिला आहे. या ऑफरमुळे व्यक्तींना त्यांच्या जगभरातील प्रियजनांशी( आवडत्या व्यक्तिशी) जोडण्यासह देशातल्या कोविड-19 योध्द्यांचे कौतुक करण्याचा व प्रत्येक भारतीय नागरिकाचे संरक्षण करण्याचे निरंतर कार्य करण्याबद्दल त्यांचे आभार मानण्याचा उद्देश आहे. 


 


सर्व कोविड-19 योध्द्यांसाठी 200 रु. एवढ्या विशेष सवलतीच्या दरामध्ये शिपमेंट पाठवण्याची व मिळवण्याचे या ऑफरमुळे मुभा मिळणार आहे, आपल्या भावडांना व प्रिजनांना आपल्याच देशात राखी शिपमेंट पाठवणाऱ्या ग्राहकांसाठी 0.5 किग्रॅमपर्यंत वजन असलेल्या शिपमेंट्सवर 250/- रु. सवलत शुल्क आकारले जाणार आहे. प्रिय व्यक्ती कधी कधी परदेशात राहतात याची ब्ल्यू डार्टला कल्पना आहे, त्यामुळे राखीच्या सर्व आंतरराष्ट्रीय शिपमेंट्सवर ग्राहक 0.5 किग्रॅम ते  2.5 किग्रॅम, 5 किग्रॅम, 10 किग्रॅम, 15 किग्रॅम  आणि 20 किग्रॅम वजनापर्यंतच्या शिपमेंटसाठी टाइम डेफिनेट एक्सप्रेस डिलिव्हरीसह प्राथमिक भाड्यावर 50%पर्यंत सवलतीचा लाभ घेऊ शकतात. ही ऑफर 26 जुलै ते 23 ऑगस्ट 2021 पर्यंत वैध आहे.      


 


एक्सप्रेस लॉजिस्टिक प्रदाता त्याच्या आउटलेट्सवर स्वदेशामध्ये राखी शिपमेंट बुक करणाऱ्या ग्राहकांसाठी खास “स्लोगन स्पर्धेचे’ देखील आयोजन करत आहे. ग्राहक फॉर्म भरुन, “आमच्या कुटुंबाला ब्ल्यू डार्टची राखी एक्सप्रेस आवडते कारण...” हे साधे स्लोगन पूर्ण करु शकतात. 10 नवीनतम प्रतिसादांना स्मार्टफोन जिंकण्याची संधी मिळणार आहे. 


सीएमओ आणि अध्यक्ष-व्यवसाय विकास, ब्ल्यू डार्टचे केतन कुलकर्णी सांगतात,”जगाची कोविड-19 आणि त्याच्या नवनवीन प्रकारांविरुध्द निकराची लढाई सुरु आहे. या वर्षी देखील, कठोर सामाजिक अंतराचे नियम पाळून देशामध्ये रक्षाबंधन साजरे केले जाणार आहे. सणासुदीचा हा उत्साह काहीसा फिका वाटतोय कारण आपण सगळेच जण देशाला कोविड-19च्या विळख्यामधून मुक्त करण्यासाठी आपआपला खारीचा वाटा उचलत आहोत. या आव्हानात्मक प्रसंगाला, ब्ल्यू डार्ट ग्राहकांवर पूर्णपणे लक्ष देण्याच्या व अपल्या ग्राहकांना आणि त्यांच्या प्रियजनांना, ते जरी दूर असले तरी जवळ आणण्याच्या आपल्या आधार स्तंभावर खरी ठरली आहे.- आम्ही हालचाल करतो जेणेकरून तुमच्या जगतात हालचाल होऊ शकेल!”  


ते पुढे म्हणाले, ”आमच्या मार्केट डिफ्रंटशिएटर्सला-आमच्या तंत्रज्ञानावर आधारीत समाधानांना चालना देत, आमचे बोइंग 757-200 फ्रेटर्स त्याचप्रमाणे आमच्या एचयूबी, कार्यालयांमध्ये, सेवा केंद्रांमध्ये काम करणारे आमचे सहकारी त्याचप्रमाणे आमचे फ्रंटलाइनर/पायलट सहकारी-आम्हा सर्वांचाच आमच्या ग्राहकांच्या शिपमेट दरवेळी वेळेत पोहोचवण्याचा उद्देश आहे. राखी शिपमेंट/भेट पाठवण्यामागची भावना आम्ही समजू शकतो, त्यामुळे शिपमेंटमध्ये जरी राखी असली, नोट असली किंवा जरी एखादी मोठी भेटवस्तू असली तरी, आम्ही ती तुमच्या प्रियजनांपर्यंत सुयोग्य स्थितीत व वेळेवर पोहोचेल याची नक्कीच शाश्वती देतो, म्हणूनच जर महत्वाचे असेल तर केवळ #BlueDartIT.”


या महामारीच्या काळामध्ये ग्राहकांच्या अनुभूतीला अधिक चांगले करण्याच्या शाश्वतीसाठी ब्ल्यू डार्ट अथकपणे झटते आहे. क्रिटिकल सप्लाय त्याचप्रमाणे नॉन इसेंशिअल सल्पाय चेन मिशनच्या सातत्याची शाश्वती करण्यासाठी, या आव्हानात्मक काळात ग्राहकांना अनेक सवलती देऊ करण्यासाठी आणि संपर्क विरहित डिलिव्हरी देणाऱ्या तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी “माय ब्ल्यू डार्ट” या मोबाईल ऍप्लिकेशनचा परिचय करुन दिला जाणार आहे, त्याचप्रमाणे ब्ल्यू डार्ट मेड-एक्सप्रेअ कन्सोर्टिअमचा परिचय करु देण्यात आला, यामध्ये ड्रोन डिलिवरीचा उपयोग केला जाणार आहे. ब्ल्यू डार्ट ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवण्यासाठी खात्रीशीरपणे प्रयत्नशील असते. ब्ल्यू डार्टसह शिपिंग केल्यावर ग्राहकांना संक्रमणाची भिती न बाळगता अडचण विरहित एक्सप्रेस लॉजिस्टिक्सचा अनुभव घेता येऊ शकतो.   


भारतातील 35000+ स्थळांवर तसेच 220 देशांमध्ये व डीपीडीएचएल समुहाचा भाग म्हणून संस्था सेवा देत असलेल्या जगातल्या सर्व ठिकाणांवर ब्ल्यू डार्ट राखी डिलिवर करणार आहे. ग्राहक संस्थेसोबत संपूर्णपणे संपर्क विरहित अनुभूती मिळवू शकतात, कारण ग्राहकांना अनेक देय/भरणा पध्दती उपलब्ध करुन देण्यात आल्या असून, त्यात 16 डिजीटल वॉलेट्स, नेट बँकिंग, क्रेडिट व डेबिट कार्ड्स, भारत क्यूआर कोड आणि यूपीआय (भीम)चा समावेश आहे.   



Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24