एल अँड टीतर्फे महाराष्ट्रातील रायगड आणि महाड जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात मदतीसाठी वैद्यकीय युनिट्स

 

एल अँड टीतर्फे महाराष्ट्रातील रायगड 

आणि 

महाड जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात मदतीसाठी वैद्यकीय युनिट्स


 

रायगड, ऑगस्ट 06,2021एल अँड टी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, या लार्सन अँड टुब्रो या भारतातील आघाडीची ईपीसी व उच्च तंत्रज्ञान उत्पादक आणि सेवा समूहाचा भाग असलेला ट्रस्ट महाराष्ट्रातील रायगड व महाड जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात मदतीसाठी पुढे आला आहे.

रायगडचे जिल्हाधिकारी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत एल अँड टी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टने (एलटीपीसीटी) तातडीने महाडमधे चार वैद्यकीय युनिट्स कार्यरत करून 35,000 रहिवाशांपर्यंत पोहोचवली आहेत. या आपत्ती प्रतिसाद उपक्रमाला रायगडच्या जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी आणि श्री. दत्तात्रय नवले, एसडीओ यांनी झेंडा दाखवला.

सरकारी महसूल विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार महाडमधील 18 हजार आणि पोलादपूरमधील 751 कुटुंबांना पूर व पावसामुळे ओढवलेल्या संकटांचा फटका बसला असून त्यामुळे स्थानिक समाजाला आरोग्याच्या तीव्र समस्यांचा धोका संभवतो आहे. एलटीपीसीटीची चार वैद्यकीय युनिट्स 24 वैद्यकीय कर्मचारी, सर्वसाधारण तपासणी, आवश्यक औषधे आणि लेप्टोस्पारयोसिस, डेंग्यु, मलेरिया आणि कोविड- 19 च्या तपासणीसाठी आवश्यक उपकरणे व सुविधांनी सज्ज आहेत.

लार्सन अँड टुब्रो तसेच एलटीपीसीटीचे अध्यक्ष श्री. एएम नाईक म्हणाले, महाड व रायगड जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील समाज तसेच या भागातील आमच्या 800 कर्मचाऱ्यांचे आरोग्य व सुरक्षेविषयी आम्ही चिंताग्रस्त आहोत. इथे राहाणाऱ्या लोकांची मोठी जीवित तसेच मालमत्तेची हानी झाली आहे. आम्हाला आशा आहे, की वैद्यकीय सेवा पुरवण्याच्या आमच्या प्रयत्नांमुळे या संकटातून उद्भवणाऱ्या आरोग्याच्या समस्यांना आळा बसेल.

एल अँड टी वैद्यकीय मोबाइल टीम एकंदर परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत 8 ते 10 दिवस अत्यावश्यक आरोग्य सेवा पुरवेल. यापूर्वी एल अँड टीने उत्तर बिहारमधील पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री रिलीफ फंडाला योगदान दिले होते. एलटीपीसीटी शिक्षण, आरोग्य, कौशल्य उभारणी, जल आणि स्वच्छता क्षेत्रात काम करते. प्रत्येक वर्षागणिक एलटीपीसीटी अधिक मजबूत झाली असून लाभार्थींना कामाचा फायदा मिळत असल्याची बाब आनंददायी आहे. इतकी वर्ष ट्रस्टने कायमच उपक्रमाचा दर्जा वाढवण्याच्या तत्वावर लक्ष केंद्रित केले. सबलीकरण, देखरेख आणि परीक्षणाबरोबरच ट्रस्टने निष्कर्षावर आधारित उपक्रम राबवले असून सरकार, आंतरराष्ट्रीय भागीदार, उभयपक्षी संघटना आणि ना- नफा क्षेत्राबरोबर अर्थपूर्ण सहकार्य करत भागिदारी केल्या आहेत.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24