नेटाफिम इंडियातर्फे आजच्या युगातील शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारी पोर्टेबल ड्रिप कीट सादर


नेटाफिम इंडियातर्फे आजच्या युगातील शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारी पोर्टेबल ड्रिप कीट सादर

 

~ या कीटच्या माध्यमातून 10,000 हेक्टर जमीन ठिबक सिंचनाखाली आणण्याचे आणि आगामी वर्षात

25,000 शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे

 

~ वाजवी किमतीतील, ऑल-इन-वन नेटाफिम सिंचन उपाययोजना अनेक उत्पादने एका छत्राखाली आणतात आणि

इन्स्टॉलेशन खर्च वाचविणारी मोड्युलर यंत्रणा उपलब्ध करून देतात ~

 

मुंबई, 18 ऑगस्ट 2021: नेटाफिम इंडिया या आघाडीच्या स्मार्ट सिंचन उपाययोजना पुरवठादारातर्फे पोर्टेबल ड्रिप कीट सादर करण्यात आले आहे. हे सर्वसमावेशक ऑल-इन-वन सिंचन उपाय  असून ते इन्स्टॉल करण्यास सोपे आहे आणि वाजवी किमतीला उपलब्ध आहे. हे कीट  विशेषतः छोट्या शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आले आहे, ज्यांच्याकडे 1 एकरहून कमी जमीन आहे. हे कीट  अतिरिक्त मजुरांशिवाय इन्स्टॉल करता येऊ शकते. नेटाफिमच्या डीलर नेटवर्कच्या माध्यमातून पोर्टेबल ड्रिप किट भारतभर उपलब्ध करण्यात आले आहे. हे कीट  सर्व भाजीपाला पिके, वेलवर्गीय भाज्या, ओळीत जवळ लावण्यात येणाऱ्या अशा सर्व रब्बी  आणि खरीप पिकांसाठी  उपयुक्त आहे.

 

पोर्टेबल ड्रिप कीट लाँच करून 10,000 हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याचे आणि आगामी वर्षात भारतातील 25,000 शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्रामध्ये कंपनीला अतिरिक्त 5% शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायचे आहे आणि ~2000 हेक्टर शेतजमीन ठिबक सिंचनाखाली आणायची आहे.

 

आजच्या युगातील शेतकऱ्यांच्या कामकाजासंबंधीच्या आणि पर्यावरणीय वैविध्यपूर्ण गरजा हाताळण्यासाठी एकाच छताखाली असलेल्या विविध नेटाफिम यंत्रणा असलेले हे कीट वापरण्यास सोयीचे, हलक्या वजनाचे आणि सहज हलवता येणारे असून ते शेतकऱ्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण गरजांची पूर्तता करते. ४५०० चौ. मीजमिनीच्या सिंचनाच्या दृष्टीने रचना करण्यात आलेली ही सर्व उत्पादने आणि सुटे भाग सहज इन्स्टॉल करता येतात आणि वापरानंतर सोयीच्या साठवणुकीच्या जागी नेता येऊ शकतात. त्याचप्रमाणे या कीटमध्ये आधुनिक टिकाऊ ड्रिपर्स वापरण्यात आले आहेत, जे उत्तम कामगिरी बजावतात.

 

फ्लेक्सनेटTM हा या कीटचा  महत्त्वाचा भाग आहे. हा अत्यंत आधुनिक, गळतीमुक्त लवचिक मेनलाइन आणि विवधांगी पाइपिंग उपाय  आहे, ज्यामुळे  काटेकोर  जल वाटप (प्रिसाइझ वॉटर डिलिव्हरी) होते आणि पाण्याची बचत वाढते तसेच वाढीव सिस्टिम कामगिरीमुळे पिकाची उत्पादकताही  सुधारते. याच्या पेटंट केलेल्या आउटलेट्समुळे आणि पाइपमुळे पाण्याची गळती होत नसल्याने चिखल होत नाही तण वाढत नाहीत्यामुळे अनेक वर्ष उत्तम कामगिरीची हमी मिळते. यात नेटाफिम यंत्रणेशी सुसंगत असलेले  लॅटरल कनेक्टर्स पुरविण्यात येतात. पांढऱ्या रंगामुळे उष्णतेला प्रतिबंध केला जातो आणि उच्च रासायनिक आणि अतिनील किरणांमध्येही ही यंत्रणा तग धरून राहते.

 

या नावीन्यपूर्ण उत्पादनाबद्दल नेटाफिम इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रणधीर चौहान म्हणाले, "शेतकऱ्यांसाठी शेती प्रक्रिया सुलभ करण्यावर नेटाफिम इंडिया आपली ऊर्जा केंद्रीत करते आणि त्यांना प्रगतीच्या मार्गावर नेण्यासाठी सक्षम करते. भारतातील अनेक शेतकऱ्यांकडे   एकरहून कमी जमीन आहे, याची आम्हाला जाणीव आहे. अशा परिस्थितीमुळे पिक घेणे ही प्रक्रिया त्यांच्यासाठी धाडसी आणि आव्हानात्मक असते. खर्च, मजुरी कमी करून आणि पाण्याचा वापर अधिक कार्यक्षमतेने करत वाढीव पिक क्षमता उत्पादकतेसाठी छोटे क्षेत्र असणाऱ्या  शेतकऱ्यांना सुविधाजनक तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याच्या नेटाफिमच्या प्रयत्नांचे पोर्टेबल ड्रिप कीट  हे फलित आहे."

 

शेतातील इन्स्टॉलेशन आणि कामकाजासाठी आवश्यक असलेले सर्व भाग पोर्टेबल ड्रिप कीटमध्ये उपलब्ध आहेत. यात स्क्रीन फिल्टर, फ्लेक्सनेट पाइप, ड्रिपलाइन कनेक्टर्स यांचा समावेश आहे.

 

Comments

Popular posts from this blog

Piramal Capital & Housing Finance Limited Secured NCD Public Tranche I - Issue Opens on July 12, Coupon Rate Upto 9.00% p.a.#

54 School Principals from across India get the prestigious Change Maker Award for digital transformation & holistic learning

Samco Launches ‘KyaTrade’ - India’s First Real-time Stock Trading & Recommendation App