भारताची बहुप्रतिक्षित गेमिंग चॅम्पियनशिप ‘टीईजीसी’ लवकरच सुरू होणार

भारताची बहुप्रतिक्षित गेमिंग चॅम्पियनशिप टीईजीसीलवकरच सुरू होणार


 

कोविड-१९ ने संपूर्ण व्यवस्था बिघडवली आणि लोकांना घरातल्याघरात कोंडून दैनंदिन जीवन जगण्यास भाग पाडले, तर खेळ जगाने शेकडो आणि हजारो इस्पोर्टस् उत्साहींना तसेच, घराबाहेर पडू इच्छिणाऱ्या शौकिनांना नवीन रोमांचांचे दरवाजे उघडून दिले. या उत्तेजनास अधिक उंचीवर नेऊन, तैवान एक्सलन्स (टीई), त्यांची वार्षिक आणि भारतातील सर्वात जास्तकाळ चालणारी गेमिंग चॅम्पियनशिपतैवान एक्सलन्स गेमिंग कप (टीईजीसी) २०२१ ची आठवी आवृत्ती सादर करण्यास संपूर्णपणे तयार आहे.

आभासी स्वरूपाला धरून आणि तरीही स्पर्धेचा उत्साह कायम ठेवून टीईजीसी, सर्वोत्तम भारतीय खेळाडू आणि संघांचा शोध घेऊन, त्यांचा प्रचार आणि सन्मान साजरा करेल. व्हॅलॉरन्ट, रेनबो सीज आणि कॉल ऑफ ड्यूटी मोबाईल सारख्या अव्वल इस्पोर्टस् खेळांमधील अंतिम चॅम्पियनशिपसाठी संघ लढत आहेत.

महामारीच्या काळात देखील, खेळ उद्योग सर्वकालीन उच्च पातळीवर आहे. ईवायच्या अहवालानुसार, भारताचे इस्पोर्टस् उद्योग, इन-अ‍ॅप खरेदीमध्ये गुंतवणूक करून, थेट उद्योग महसूल आणि अतिरिक्त महसूल, याद्वारे पुढील चार वर्षांमध्ये १०० अब्ज रुपयांहून अधिक आर्थिक प्रभाव निर्माण करेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. इस्पोर्टस् खेळांच्या सामन्यांद्वारे लोकप्रिय झालेले खेळ, इन-अ‍ॅप खरेदीद्वारे १४ अब्ज रुपये एवढा महसूल निर्माण करतील. २०२५पर्यंत हा उद्योग ३०० दशलक्ष रुपयांच्या सहाय्यक महसूल पर्यंत वाढण्याची देखील अपेक्षा आहे.

सगळे संघ चार पात्रता फेऱ्यांमध्ये स्वतंत्रपणे सहभागी होतील; त्यानंतर प्रत्येक पात्रता फेरीतील विजेते संघ, आणि डिसेंबर रोजी होणाऱ्या शेवटच्या व्हाईट-नकल फेरीत लढतील. १७ ऑगस्ट पासून नोंदणीला सुरुवात होईल आणि पात्रता फेऱ्या १६ सप्टेंबरपासून सुरू होतील २१ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहतील. व्हॅलॉरन्ट आणि सीओडीएमच्या अंतिम स्पर्धा अधिकृत तैवान एक्सलन्स इंडिया चॅनेल्सवर ऑनलाइन प्रसारित केल्या जातील आणि, विजेत्यांना १०,००,०००/- रुपये एवढ्या मोठ्या रकमेचे बक्षीस दिले जाईल.

या वर्षी टीईजीसी एसर, अदाता, अ‍सुस, अ‍ॅव्हरमेडीया, बेनक्यू, डी-लिंक, गिगाबाईट, इनविन, एमसआय, टीमग्रुप, थर्मलटेक, सिलिकॉनपॉवर, ट्रान्सएन्ड, झडॅक आणि झायझेल सारख्या काही प्रशंसनीय तैवानच्या ब्रॅण्डद्वारे समर्थित असेल.  

भारतभरातील इस्पोर्टस् शौकिनांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील चॅम्पियनशिपचे वातावरण प्रदान करण्यासाठी, तैवान एक्सलन्स गेल्या वर्षांपासून टीईजीसी स्पर्धा भरवत आहे. या स्पर्धेद्वारे खेळाडूंना सर्वोत्तम श्रेणीतील तैवान तंत्रज्ञानाचा अनुभव घेण्याची देखील संधी दिली गेली आहे आणि त्यांना स्वत:ला प्रशिक्षित करण्यासाठी आणि व्यावसायिक खेळाडू म्हणून उदयास येण्यासाठी प्रो-लेव्हल व्यासपीठ प्रदान केले आहे. टीईजीसीने इतर देशांतील टीईजीसीच्या विजेत्यां विरुद्ध आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करण्याची संधीही अव्वल खेळाडूंना दिली आहे. टीईजीसी स्पर्धांमध्ये पूर्वी सहभागी झालेल्या अनेक खेळाडूंनी आणि विजेत्यांनी त्यांच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे आणि चांगली कामगिरी करत आहेत. प्रत्यक्षरित्या आयोजित असो अथवा आभासी रीतीने आयोजित असो, खेळातले मूलतत्त्व आणि खेळांच्या सर्वाधिक प्रोत्साहित व उत्साही स्पर्धा आयोजित करण्याचे त्यांचे वचन कायम ठेवण्यात टीईजीसी सक्षम राहिली आहे.

२०२० मध्ये मोठ्या प्रमाणात गौरव प्राप्त केल्यावर, पॉवर-पॅक्ड नवीन गेमसह आठ आवृत्ती, एक मोठी बक्षिसाची रक्कम, रोमांचक भेटवस्तू व बक्षिसे आणि स्पर्धक व प्रेक्षकांमध्ये उत्साहाचा एक नवीन स्तर घेऊन टीई सर्व दृष्टीने तयार आहे. तलवार गाजवणारे असो किंवा बंदुकी ने सज्ज असो, सर्व खेळाडू आभासी वातावरणात एकत्र येतील त्यांचे पराक्रम सिद्ध करण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतील तर वर्षभरापासून वाट पाहत असलेले उत्कटतेने आणि उत्साहाने भरलेले चाहते या निपुण खेळाडूं मधील अटीतटीची लढाई पाहत असतील. मागील वर्षांप्रमाणेच, यावर्षीदेखील, वर्षातील सर्वाधिक प्रतिक्षित खेळ स्पर्धा सुरू करण्यासाठी, सगळे स्पर्धक सर्व त-हेने सज्ज आहेत.

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth