सहीपे(SahiPay)च्या भागीदारीसह एसबीआय जनरलचे ग्रामिण भारतासाठी जनरल इन्श्युरन्स उत्पादनांचे सादरीकरण

 सहीपे(SahiPay)च्या भागीदारीसह एसबीआय जनरलचे ग्रामिण भारतासाठी जनरल इन्श्युरन्स उत्पादनांचे सादरीकरण


मुंबई,3ऑगस्ट2021: भारताच्या आघाडीच्या जनरल इन्श्युरन्स कंपन्यांपैकी एक समजल्या जाणा-या एसबीआय जनरल इन्श्युरन्सने मणिपाल बिझनेस सोल्युशन्स सोबत सहयोगाची घोषणा केली आहे, यामुळे ग्रामिण बाजापेठांपर्यंत विम्याला जास्तीत जास्त प्रमाणात पोहोचवता येणे शक्य होणार आहे. सहीपे(SahiPay) हा मणिपाल बिझनेस सोल्युशन्सचा जलद गतीने प्रगती करत असलेला तंत्रज्ञान सक्षम वित्त समावेशक मंच मध्यम शहरी आणि ग्रामिण भारतातील ग्राहकांना डिजीटल व वित्त सेवा  उपलब्ध करुन देतो.    

भारताचा सर्वात विश्वासार्ह जनरल इन्श्युरर बनण्याचे धेय्य पूर्ण करण्याच्या दृष्टीने एसबीआय जनरलला या सहयोगामुळे एक महत्वपूर्ण टप्पा गाठता येणे शक्य झाले आहे. या भागीदारीच्या मार्फत, एसबीआय जनरल सहीपे (SahiPay ) ग्राहकांना अनेक नॉन-लाइफ इन्श्युरन्स समाधाने किंवा जीवन विम्या व्यतिरिक्त इतर अनेक समाधाने उपलब्ध करुन देणार आहे.   

भागीदारीबद्दल बोलताना, एसबीआय इन्श्युरन्सचे अध्यक्ष-धोरणात्मक गुंतवणूक व खुल्या बाजारपेठेचे प्रमुख श्री पुशण महापात्रा (Pushan Mahapatra ) म्हणाले, “एसबीआयमध्ये, आम्ही नेहमीच आमच्या ग्रामिण बाजारपेठांना विमा उत्पादने देताना डिजीटल मॉडेलच्या प्लग-इनवर लक्ष केंद्रित केले  आहे. सहीपे (Sahipay)सोबतचा सहयोग अगदी साजेसा पर्याय असून ग्रामिण विभागांपर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात पोहोचण्याच्या आमच्या प्रयत्नांमध्ये अगदी योग्यवेळी याची साथ मिळणार आहे.”  

मणिपाल बिझनेस सोल्युशन्सचे सीइओ श्री कमलजीत रस्तोगी म्हणाले,  "भारतात ग्रामिण विभागांमध्ये लोकसंख्येच्या 65% जनता सामावत असल्यामुळे तो ठळकपणे ग्रामिण आहे असे म्हणणे अगदी योग्य आहे. ग्रामिण जनतेला विम्याच्या लाभांची कल्पना देण्यासाठी विशेष लक्ष देणारे प्रयत्न त्याचप्रमाणे नवीनतम, माफक दराची, तंत्रज्ञानावर आधारलेली विमा उत्पादने देणे आवश्यक आहेत, जी पुरेश्या प्रमाणात रिस्क कव्हरेज देतात.   एसबीआय जनरल इन्श्युरन्स  आम्हाला आमच्या ग्राहकांसाठी विस्तिर्ण व हाताळता येण्याजोग्या विमा उत्पादनांचा संच देण्यात मदत करणार आहे. ही भागीदारी ग्रामिण ग्राहकांसाठी एसबीआय जनरलच्या नॉन लाइफ उत्पादनांसह मणिपाल बिझनेस सोल्युशन्सचे साजेसे संमिश्रण आहे ज्यामुळे दोन्ही भागीदारांमार्फत ग्रामिण विभागाचे उत्तम आकलन होण्यात मदत होईल.”  

एसबीआय जनरल निरंतरपणे देशामधला आपला वितरणाचा ठसा दृढ करत असून हा सहयोग या दिशेत उचललेले एक पाऊल आहे असे म्हणण्यास हरकत नाही.

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202