वर्षाला 1 लाख कॉर्नियल ट्रान्सप्लांटेशन मागणीसाठी भारताला चार पट अधिक दृष्टिदात्यांची आवश्यकता' - डॉ. नीता शहा

 वर्षाला 1 लाख कॉर्नियल ट्रान्सप्लांटेशन मागणीसाठी भारताला 

चार पट अधिक दृष्टिदात्यांची आवश्यकता' -  डॉ. नीता शहा


 

मुंबई: आजच्या घडीला जगभर अंधत्व ही मुख्य समस्या बनली आहे. भारतात, डोळ्यांच्या बाहुलीवरील पारदर्शक पडदा म्हणजे कॉर्नियल इजेपायी अंदाजे 20 लाख व्यक्ती दृष्टिहीन झाल्या आहेत. या विकारात दिरंगाई न केल्यास, वेळेवर ट्रान्सप्लांटेशन (प्रत्यारोपण) उपचार झाल्यास एक-चतुर्थांशहून अधिक कॉर्नियल अंधत्वाची समस्या दूर होऊ शकते. शरीराच्या अन्य कोणत्याही इतर अवयवाप्रमाणे डोळ्याच्या कॉर्नियाचे दान मृत्यूपश्चात करणे शक्य आहे. “दरवर्षी दहा हजार कॉर्नियल अंधत्वाची प्रकरणे अस्तित्वात असलेल्या केसमध्ये भर घालतात. त्यामुळे कॉर्नियल प्रत्यारोपणाला वार्षिक मागणी वाढत चालली आहे. मागणी आणि पुरवठ्यातील दरी भरून काढण्यासाठी लोकांमध्ये दृष्टिदानाविषयी जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. राष्ट्रीय दृष्टिदान पंधरवड्याच्या निमित्ताने आपण आपले डोळे दान करणार असल्याचे वचन घेऊ,” असे डॉ नीता शहा, प्रमुख - क्लिनिकल सेवा, डॉ. अग्रवाल आय हॉस्पिटल मुंबई म्हणाल्या.
 
ते पुढे म्हणाले की, डॉ. अगरवाल आय हॉस्पिटल’ मध्ये अभिनव पीडीईके प्रक्रिया उपलब्ध असून एक डोळा दान केल्यास दोन किंवा अधिक व्यक्तींना दृष्टी मिळण्यास मदत होऊ शकते.
 
दृष्टिदान कोण करू शकते?
दृष्टिदाता हा कोणत्याही लिंगाचा किंवा वयाचा असू शकतो. तरीच दात्याला एड्स, हेपेटायटीस बी आणि सी, रेबीज, सेप्टीसेमिया, अॅक्यूट ल्युकेमिया (रक्ताचा कर्करोग), टीटॅनस, कॉलरा आणि मेनेंजेटीस तसेच एन्सेफलिटीस यासारखे संसर्गजन्य विकार असू नयेत.
 
दृष्टिदानाकरिता डॉ. नीता शहा मुंबई यांनी सार्वजनिक जनजागृतीकरिता काही मुद्दे नमूद केले.
 
·         केवळ मृत्यूपश्चातच डोळ्यांचे दान करता येते.
·         मृत्यूनंतर 4-6 तासांत डोळे काढावेत.
·         नोंदणीकृत वैद्यकीय तज्ज्ञाकरवी डोळे काढून घ्यावेत.
·         ज्या व्यक्तिला दृष्टिदान करायची आहे, त्याच्या घरी अथवा रुग्णालयात आय बँकेची टीम येऊन डोळे काढण्याची प्रक्रिया पूर्ण करेल.
·         डोळे काढून घेण्याची प्रक्रिया वेळखाऊ नसल्याने, हे काम केवळ 20-30 मिनिटांत पूर्ण होत असल्याने अंत्यविधीला विलंब होण्याची शक्यता नसते.
·         संसर्गजन्य आजार होऊ नये म्हणून थोडे-फार रक्त बाहेर प्रवाहित करण्यात येते.
·         नव्याने डोळे बसल्याने चेहऱ्याच्या ठेवणीत कोणताही फरक होत नाही.
·         दाता आणि प्राप्तकर्ता, दोघांची नावे गोपनीय ठेवली जातात.
·         दृष्टिदान प्रतिज्ञा आणि दृष्टि संग्रह प्रक्रियेबद्दल बोलायचे झाल्यास, जरी मृत व्यक्तिने दृष्टिदान प्रतिज्ञा घेतली असली तरीही या प्रक्रियेला त्याच्या जवळच्या नातेवाईक/ परिवाराची अधिकृत संमती असणे आवश्यक आहे.
 
 
·         जवळची, लांबची दृष्टी कमी असल्यास किंवा दृष्टिवैषम्य असल्यास अथवा मोतीबिंदूची शस्त्रक्रिया असलेल्यांनी चष्मा वापरल्यास त्यात काहीच गैर नाही.
 
डोळा पेशीजालापासून बाहेर काढणे
मृत्यू-पश्चात सहा ते आठ तासांत डोळा काढून घेणे हितावह ठरते. डोळे काढून घेतल्यानंतर ते मूल्यांकनाकरिता आय बँकेत पाठविले जातात. आणि त्यानंतर त्यांचे पुढील वितरण होते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय मानकांनुसार प्रशिक्षित तज्ज्ञांकडून डोळ्याचे मूल्यमापन होते. प्रतीक्षा यादीत नमूद अंध व्यक्तींना पाचारण करण्यात येते. तातडीने डोळ्यांची गरज असलेल्यांना मार्गदर्शक तत्त्वांत नमूद प्रक्रियेच्या आधारे सेवा देण्यात येते.
 
दृष्टिदानाचे महत्त्व
दृष्टिदानाचे महत्त्व या विषयावर बोलताना डॉ. नीता शहा म्हणाल्या, “थोडा-फार किंवा अगदीच नगण्य जनजागृती असल्याने, सामाजिक किंवा धार्मिक समजुती आणि अन्य कारणांस्तव आपल्या देशात दृष्टिदानाला फारसे महत्त्व नाही. या महान कार्याला विविध गैरसमजुती आणि अंधश्रद्धांचे ग्रहण लागल्याने हा मार्गामधील अडसर आहे.”
 
ते पुढे म्हणाले की, “सध्या भारतात दरवर्षी सुमारे 50,000 डोळ्यांचे दान केले जाते. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास – वर्षाला देशभर अंदाजे 1 कोटी लोक मृत होत असून 0.5% हून कमी प्रमाणात डोळे जमा केले जातात. त्यामुळे दृष्टिदानाविषयी जनजागृती होणे आवश्यक ठरते. तसेच आय बँक आणि संशोधन केंद्रांनी अधिकाधिक दृष्टिदानाचा आकडा वाढावा म्हणून सुविधा उभ्या करण्याची आवश्यकता आहे.” दृष्टिदानातून प्रत्यारोपण होत नसल्यास ते संशोधन आणि शिक्षणासाठी पाठवावेत. संपूर्ण दृष्टि संशोधनात प्रगतीची आवश्यकता आहे. ग्लूकोमा, डोळ्याच्या पटलाचे आजार, मधुमेही डोळ्यांची गुंतागुंत तसेच अन्य दृष्टिविकाराला जबाबदार कारणे आणि स्थितीचा परिणाम याविषयी समज वाढली पाहिजे.
 
For more information visit: https://www.dragarwal.com/

                                                            

Comments

Popular posts from this blog

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24

Liberty General Insurance Launches Dedicated 24/7 Helpline <+91-9324968286> for the Victims of Odisha Train Tragedy