व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेमुळे नसांच्या आरोग्यावर परिणाम : पीअॅण्डजी नर्व्ह हेल्थ सर्व्हे


व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेमुळे नसांच्या आरोग्यावर परिणाम

पीअॅण्डजी नर्व्ह हेल्थ सर्व्हे


 

 

मुंबई,३ सप्टेंबर २०२१: सप्टेंबर महिना  हा राष्ट्रीय पोषण मास दिन म्हणून साजरा केला जातो. योग्य आहार आणि पोषणावर भर देत आपले एकूण आरोग्य सुधारणे  यावर भर दिला जातोकुपोषणामुळे अनेक आजार होऊ शकताततर त्याचा परिणाम हा नसांवर होतोनसांच्या आरोग्यासंदर्भात जागरुकता वाढवण्यासाठी आणि दृष्टिकोन बदलण्यासाठी तसेच लोकांना नसांचे आजार ओळखता येतात का हे समजून घेण्यासाठी पीअॅण्डजी नर्व्ह हेल्थ सर्व्हे करण्यात आलासामान्य लोकांमध्ये नसांच्या आरोग्याबाबत फारच कमी माहिती असल्याचे यातून स्पष्ट झाले आहेनसा डॅमेज झाल्याची लक्षणे लोकांमध्ये दिसून आली असली तरी फक्त ५० टक्के लोकांनी त्याचा संबंध नसांच्या आरोग्याशी लावला. या सर्व्हे'मध्ये १२ शहरांमधील १८०० प्रतिसादकर्त्यांचा समावेश होताया सर्वेक्षणानुसार ६० टक्क्यांहून अधिक प्रतिसादकर्ते नसांच्या आजारांच्या सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात.

 

मात्रया सर्वेक्षणानुसार मुंबईत ७३ क्के लोक नसांच्या अनारोग्यकारक लक्षणांकडे दुर्लक्ष करतातराष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत हे प्रमाण अधिक आहेहील हेल्थ आणि हंसा रीसर्च यांनी प्रॉक्टर अॅण्ड गॅम्बल हेल्थ लिमिटेडच्या पाठिंब्याने केलेल्या या राष्ट्रीय पातळीवरील सर्वेक्षणात असेही नमूद करण्यात आले आहे की ९० टक्के प्रतिसादकर्त्यांच्या मते नसांचे आरोग्य महत्त्वाचे असते मात्र फक्त ३८ टक्के लोकांना हे ठाऊक आहे की नसा आणि रक्तवाहिन्या वेगवेगळ्या असतात. बी १२ ची कमतरता ही इतर कमतरतांमध्ये भारतातील एक सामान्य समस्या आजकाल आढळून येत आहे .व्हिटॅमिन बीच्या कमतरतेमुळे नसा दुर्बळ होण्याची शक्यता अधिक असतेकाही विशिष्ट आहार सवयी किंवा कुपोषणामुळे काही विशिष्ट व्हिटॅमिन्स जसे न्युरोट्रॉपिक-बी व्हिटॅमिनची कमतरता भासू शकते.

 

बॉम्बे हॉस्पिटल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे डीन आणि एचओडी न्युरोलॉजी डॉ. सतिश खाडीलकर म्हणाले की आपल्या नसांना आरोग्यदायी आणि संरक्षित ठेवण्यात या व्हिटॅमिनची भूमिका महत्त्वाची असते. प्रॉक्टर अॅण्ड गॅम्बल हेल्थ लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद थत्ते म्हणाले की आजघडीला मोठ्या संख्येने देशातील नागरिक व्हिटॅमिन  बी १२ कमतरतेचा त्रास सहन करत आहे. मात्र, यामागची कारणे तसेच संबंधित धोके, जसे की नर्व्ह डॅमेज याबद्दल त्यांना फारशी माहिती नाही

 

असोसिएशन ऑफ फिजिशिअन्स ऑफ इंडियाचे ऑनररी जनरल सेक्रेटरी डॉमंगेश तिवसकर म्हणाले की व्हिटॅमिन बी १२  ची कमतरता हे नसांचे त्रास होण्याचं एक मुख्य कारण असू शकतं. अनेक आजार टाळण्यासाठी, अगदी नसांचे आरोग्य राखण्यासाठीही योग्य पोषण हा पहिला उपाय असतो. तुम्ही जो आहार घेता त्यामुळे तुमच्या नसांचे कार्य सुधारते. तुमच्या नसांना कशातून पोषण मिळते हे जाणून घेतल्यास तुम्ही आरोग्यदायी जीवन जगू शकता आणि नसांशी संबंधित आजार होण्याचे प्रमाणही कमी होते. मात्र, फारशी जागरुकता नसल्याने आपण बऱ्याचदा योग्य आहार निवडत नाही. व्हिटॅमिन  बी १२ च्या कमतरतेमुळे नसा डॅमेज झाल्यास हा त्रास कायमस्वरुपी राहू शकतो . 

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24