नवीन लक्स कोझी जाहिरातीसह वरुण धवन याने तरुणाई आणि नेटीझन्समध्ये निर्माण केला उत्साह

 नवीन लक्स कोझी जाहिरातीसह वरुण धवन याने तरुणाई आणि नेटीझन्समध्ये निर्माण केला उत्साह  राष्ट्रीय, 7 सप्टेंबर: लक्स इंडस्ट्रीज लिमिटेड, (बीएसई: 539542 | एनएसई: LUXIND) आपल्या कल्पक आणि ग्राहक-केंद्री उत्पादन प्रस्तावाकरिता ओळखली जाते. 14 प्रमुख ब्रँडसह 100 पेक्षा अधिक उत्पादनांची निर्मिती करत पुरुष, महिला आणि बालकांकरिता इनरवेअर आणि आउटरवेअरची संपूर्ण श्रेणी उपलब्ध आहे. भारताच्या तरुणाईची धडकन आणि लक्स कोझीचा ब्रँड अॅम्बेसेडर वरुण धवनचा सहभाग असलेल्या नवीन जाहिरात कॅम्पेन चर्चेत आले. वरुण धवन समवेत केलेल्या नवीन जाहिरातीच्या माध्यमातून तरुण ग्राहक जोडण्याचे ध्येय आहे. ग्राहकांनी या जाहिरातीचे फार कौतुक केले. वरुण धवन नेहमीच तंदुरुस्त, आरोग्यदायी राहण्याविषयी तत्पर असतो. लक्झ कोझी हा ब्रँड आराम आणि टिकाऊ जीवनशैलीची हमी देत असल्याने वरुण या ब्रँडच्या वैशिष्ट्यांना अगदी शोभून दिसतो.  

लक्स कोझीची नवीन जाहिरात “एकदम कोझी” या हा नवीन संदेश घेऊन येत असल्याने अपेक्षित ग्राहक वर्गाचे लक्ष वेधून घेते. या जाहिरातीला मोठ्या प्रमाणावर हिट मिळाल्या आहेत.   

लक्स कायमच कल्पक उत्पादन विकास निर्मितीत नवीन पद्धतींचा अवलंब करत सक्रीय राहिली आणि योग्य ग्राहकाला आपल्या अशाप्रकारच्या पहिल्यांदा आजमावलेल्या  ब्रँडिंग व प्रमोशनल क्रियाकलापांनी लक्ष्य करत आली. त्यांची पद्धत ग्राहक-केंद्री असून ब्रँडला सुमारे 47 देशांत संपूर्ण ब्रँड पोर्टफोलियोकरिता दृश्यमानता विस्तारण्यास आणि बळकट ब्रँड इक्विटी निर्माण करण्यात मदत झाली. 15 ब्रँडच्या मजबूत पाठबळासह जगभरात मास, मीड-प्रीमियम आणि प्रीमियम प्रोडक्ट उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ज्यामुळे बाजारात चांगल्या कामगिरीसाठी आणि महत्त्वाची मूल्य निर्मिती करण्यास हातभार लागला.  

लक्स इंडस्ट्रीजचे कार्यकारी संचालक साकेत तोडी म्हणाले की, “लक्स कोझीने नाविन्यपूर्ण वेगळेपण नेहमीच जपले आहे. मग विषय प्रोडक्ट लॉन्चचा असो किंवा ब्रँड निर्मिती उपक्रमाचा, हे नवीन कॅम्पेन युवा वर्गाला नजरेसमोर ठेवून साकारण्यात आल्याने त्याचे निराळेपण तरुणाईला रुचले. वरुण हा ऊर्जावान आणि चतुरस्त्र अभिनेता आहे. त्याला अभिनयाची समृद्ध पार्श्वभूमी आहे. तो कायमच स्वत:च्या तंदुरुस्तीची काळजी घेतो. त्यामुळे स्वत:चे वैशिष्ट्य जपत तो युवा वर्गाची धडकन ठरला आहे. त्याच्या स्टाईलची आणि फॅशन सेन्सची नक्कल करावी असे प्रत्येक वयातील व्यक्तिला वाटत असल्याने तो उपभोक्त्यांच्या सर्वच वयोगटाचे, प्रामुख्याने तरुण वर्गाला आकर्षित करतो.”  

लक्स इंडस्ट्रीजचे कार्यकारी संचालक उदित तोडी म्हणाले की, “गुणवत्ता, आराम आणि टिकाऊपणाचे दुसरे नाव म्हणजे लक्स कोझी! याब्रँडची स्थिती आणि मार्केटींग उपक्रम होजीयरी उद्योगाचे बदलते गणित बळकट करणारे आहे. अग्रगण्य बाजार प्रस्तावात आम्ही नेहमीच आघाडीवर असतो. आम्ही लक्स कोझीच्या या उत्साही प्रवासाचा भाग असलेल्या वरुणचे आभार मानतो. ही नवीन कमर्शियल महत्त्वाच्या वृत्त आणि मनोरंजन वाहिन्यांवर लॉन्च करण्यात आली आहे आणि सोशल मीडियावर आम्हाला उपभोक्त्यांच्या सर्वोत्तम प्रतिक्रिया मिळत आहेत.  

यलो बीटल ही एजन्सी या संकल्पनेमागे असून तिचे प्रतिनिधित्व देवेन मुंजाल यांनी केले. त्याविषयी बोलताना ते म्हणाले की, “आम्हाला लक्स कोझी संवादाला नवीन पैलू द्यायचा आहे, आम्ही जाहिरातीची संकल्पना मांडताना युवा वर्गाला स्पष्टपणे  केंद्रस्थानी ठेवले. या जाहिरातीत ताजेपणा आहे. तसेच युवा वर्गासोबत अवखळपणे, त्यांच्या भाषेत संवाद साधण्यात आला आहे.”

उपभोक्त्यांच्या बदलत्या पसंती आणि प्राधान्याचा विचार करून लक्स कोझीचा संवाद उत्क्रांत होत गेला. अगोदर अपना लक पहन के चलो ते सुनो तो अपने दिल की आणि आता एकदम कोझी!  या ब्रँडने ताजेपणाचे दर्शन घडवले असून आपल्या जाहिरात संवादात सर्वोच्च समकालीन वैशिष्ट्य जपले आहे. लक्स इंडस्ट्रीजच्या गुलदस्त्यातील अन्य लायरा, ऑन (ONN), जेनेक्स, वन 8 व्यतिरिक्त लक्स कोझी हा बळकट आणि वेगाने वाढणारा ब्रँड मानला जातो.

ब्रँडची ताजी जाहिरात नाविन्यपूर्ण असून ग्राहक पसंती जोपासणारी असल्याने मोठ्या प्रमाणावर कौतुकास पात्र ठरली. भारतीय ग्राहकवर्ग नव-कल्पकता आणि ब्रँडचा तरुण संवाद, दोन्हीचे स्वागत करणारा आहे, याची पोचपावती जाहिरातीला मिळालेल्या प्रतिसादावरून मिळते.

Comments

Popular posts from this blog

Piramal Capital & Housing Finance Limited Secured NCD Public Tranche I - Issue Opens on July 12, Coupon Rate Upto 9.00% p.a.#

54 School Principals from across India get the prestigious Change Maker Award for digital transformation & holistic learning

Samco Launches ‘KyaTrade’ - India’s First Real-time Stock Trading & Recommendation App