एयू स्मॉल फायनान्स बँकेने अक्षय पात्र मेगा किचनमध्ये सौर ऊर्जा ग्रीड सुरू केली



 

एयू स्मॉल फायनान्स बँकेने अक्षय पात्र मेगा किचनमध्ये सौर ऊर्जा ग्रीड सुरू केली

सीएसआर उपक्रम म्हणून 170 किलोवॅट सौर ऊर्जा ग्रिड उभारण्यासाठी 50 लाख रुपयांचे योगदान दिले


 

 

मुंबई-2 सप्टेंबर 2021:  कॉर्पोरेट सोशल पार्टनरशिप (सीएसआर)चा भाग म्हणून अक्षय पात्र फाउंडेशनच्या जयपूर कॅम्पसमध्ये एयू स्मॉल फायनान्स बँकने, (भारतातील सर्वात मोठी लघु वित्त बँक,) आज सौर ऊर्जा ग्रिडचे उद्घाटन केले. दीर्घकालीन ऊर्जा खर्चात बचत करण्याशिवाय अक्षय ऊर्जेच्या वापराद्वारे शाश्वत वीज पुरवण्याचे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.

जयपूरमधील अक्षय पात्र रसोई सुविधा (मेगा किचन)च्या मुख्य इमारतीच्या छतावर 170 किलोवॅट सौर ऊर्जा ग्रिड बसवण्यासाठी बँकेने 50 लाख रुपयांचे योगदान दिले आहे. अक्षय ऊर्जा स्त्रोतांच्या स्थापनेमुळे विजेची किंमत मोठ्या प्रमाणात कमी होईल. स्वच्छ ऊर्जा प्रदान करण्यासाठी आणि पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात संरक्षण करण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.

विजेच्या बिलातून वाचलेली रक्कम फाऊंडेशनच्या विद्यार्थ्यांना पोषण आहारासह दिली जाईल. नव्याने स्थापित करण्यात आलेली सौर ऊर्जा ग्रिड फाउंडेशनला त्याच्या स्थापनेच्या दोन वर्षांच्या आत स्वतंत्र वीज जनरेटर मिळण्यास मदत करेल.

या कार्यक्रमात बोलताना एयू बँकेचे चीफ ऑफ स्टाफ योगेश जैन म्हणाले, “एयूमध्ये मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आमचा सतत प्रयत्न असतो कारण ते आपल्या देशाचे भविष्य आहेत. फक्त मनाचे आणि शरीराचे योग्य पोषण त्यांना एक चांगली व्यक्ती बनण्यास मदत करू शकते. अक्षय पत्र फाउंडेशनने विद्यार्थ्यांना पौष्टिक अन्न पुरवण्याचे विश्वसनीय कार्य केले आहे आणि आम्हाला ते फाउंडेशनच्या दृष्टीने आणि उद्दिष्टांशी पूर्णपणे जुळते. छतावरील सौर पॅनल्सची स्थापना हा एक चांगल्या भविष्यासाठी योगदान देण्याचा एक सुरक्षित आणि सोपा मार्ग आहे आणि चांगल्या उद्यासाठी हा आमचा नम्र प्रयत्न आहे. ”

उद्घाटन कार्यक्रमाला एयू बँकेचे चीफ ऑफ स्टाफ श्री.योगेश जैन आणि अक्षय पात्र फाउंडेशनचे श्री.अनंतसेसा दास उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24