जयपोरतर्फे गजगामिनी कलेक्शनची मर्यादित आवृत्ती लाँच करत गणेश चतुर्थीच्या उत्सवाचा प्रारंभ


जयपोरतर्फे गजगामिनी कलेक्शनची मर्यादित आवृत्ती लाँच करत 

गणेश चतुर्थीच्या उत्सवाचा प्रारंभ

~ हाताने रंगवलेली कलमकारी कला आणि गणपतीच्या मोतिफ्सने सजलेले नवे कलेक्शन ~


 

6 सप्टेंबर, 2021 – हिंदु दिनदर्शिकेतील सर्वात शुभ दिवसाने – गणेश चतुर्थीने सणासुदीच्या हंगामाची सुरुवात झाली आहे. या उत्सवाच्या जल्लोषावरून प्रेरणा घेत जयपोरने गजगामिनी हे मर्यादित आवृत्तीचे कलेक्शन सादर केले आहे. या कलेक्शनमध्ये हँडक्राफ्टेड ओढण्यांचा समावेश असून त्याचे अभिजात व पारंपरिक रूप प्रत्येकाला भुरळ घालणारे आहे. या खास कलेक्शनमध्ये लाडक्या गणपतीची विविध रूपे पाहायला मिळतील. त्याची ही सर्व रूपे कुशल कलमकारी कारागिरांनी स्वतःच्या हाताने रंगवलेली असून त्याची किंमत 18,990 रुपये आहे. ग्राहकांना कलमकारीच्या पारंपरिक कलेने सजलेली अऩोखी डिझाइन्स उपलब्ध करून देण्यासाठी जयपोरने हे कलेक्शन खास तयार केले आहे.

 

जयपोर लेबल कारागीरांसह जातीने काम करून सर्वोत्तम विणकाम, एम्ब्रॉयडरीज आणि डिझाइन्सची निर्मिती करते. त्यांचा वेगवेगळ्या प्रकारच्या कलेक्शनमध्ये समावेश करून ग्राहकांना असामान्य किंमतीत विक्री केली जाते.

 

कलेक्शन: जयपोरचे गजगामिनी

कला: कलमकारी

 

कलमकारीची प्राचीन कला वेगवेगळ्या गावांत प्रवास करत हिंदू पुराणातल्या कथा रंगवणाऱ्या चित्रकारांनी तयार केली. आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिरातील पारंपरिक कारागिरांनी या कलेला हे स्वरूप दिले आहे. गजगामिनी कलेक्शनमध्ये कलमकारीचे वैशिष्ट्यपूर्ण मोतिफ्स आणि गणेशाची विविध रूपे यांची नाजूक कलाकुसर केलेल्या ओढण्यांचा समावेश करण्यात आला आहे.

 

यातील प्रत्येक नमुना अशाप्रकारचा एकमेव असून त्यावरील मोतिफ्स आणि बारकाई केलेली कलाकुसर पारंपरिक किंवा आधुनिक रूप खुलवेल. हे मर्यादित कलेक्शन कलमकारी कौशल्य व तिचा समृद्ध इतिहास गौरवणारी आहे. हे उत्पादने हाताने रंगवलेली असून हस्तकारागिरी उत्पादनांचे खास वैशिष्ट्य असलेले विविध रंग व डिझाइन्समुळे त्यांना अनोखे व कालातीत रूप प्राप्त झाले आहे. 

Comments

Popular posts from this blog

eFootball™ Marks Successful India Finale With Grand Mumbai Meet & Greet

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth