पेटीएम 'एफॲण्‍डओ डॅशबोर्ड'च्‍या लाँचसह रिटेल डेरिव्‍हेटिव्‍ह्ज गुंतवणूकदारांना देणार संस्‍थात्‍मक व्‍यापार अनुभव


पेटीएम 'एफॲण्‍डओ डॅशबोर्ड'च्‍या लाँचसह रिटेल डेरिव्‍हेटिव्‍ह्ज गुंतवणूकदारांना देणार संस्‍थात्‍मक व्‍यापार अनुभव 

  • रिटेल व्‍यापा-यांसाठी भारताचे सर्वात व्‍यापक डेरिव्‍हेटिव्‍ह्ज इंटेलिजन्‍स व्‍यासपीठ  
  • डेरिव्‍हेटिव्‍ह्ज विभागाचा व्‍यापार मूल्‍यामध्‍ये जवळपास ९५ टक्‍के हिस्‍सा, पण प्रचलित जटिलतेमुळे रिटेल सहभाग लक्षणीयरित्‍या कमी  
  • एफॲण्‍डओ डॅशबोर्ड वैविध्‍यपूर्ण डेटा देते आणि पहिल्‍यांदाच व्‍यवहार करणा-या आणि अनुभवी व्‍यापा-यांसाठी डेरिव्‍हेटिव्‍ह्ज व्‍यापार अधिक सुलभ करण्‍याकरिता अत्‍याधुनिक तंत्रज्ञान व स्‍मार्ट ग्राफिक्‍सचा वापर करते  
  • ऑप्‍शन चेन्‍स, भावी हिट मॅप, ऑप्‍शन्‍स ओआय आणि ग्रीक्‍सवरील स्‍वीपिंग माहिती  
  • पेटीएम मनी देते उद्योगक्षेत्रातील सर्वात स्‍पर्धात्‍मक दर – प्रति व्‍यापार १० रूपयांमध्‍ये ऑल डिलिव्‍हरी फ्री व इंट्राडे/एफॲण्‍डओ; एफॲण्‍डओ डॅशबोर्ड आता सर्व पेटीएम मनी युजर्ससाठी कार्यान्वित 


पेटीएम मनीने भारतामध्‍ये अद्वितीय एफॲण्‍डओ डॅशबोर्ड लाँच केला आहे, ज्‍यामुळे डेरिव्‍हेटिव्‍ह्ज विभागातील रिटेल व्‍यापार अनुभवामध्‍ये क्रांतिकारी बदल घडून आला आहे. हा डॅशबोर्ड यापूर्वी संस्‍थात्‍मक पातळीवरील क्‍लायण्‍ट्ससाठीच उपलब्‍ध असलेली साधने देतो. युजर्स आता एका टॅपमध्‍ये डेरिव्‍हेटिव्‍ह्ज विभागामधील सर्व माहिती सुलभपणे प्राप्‍त करू शकतात आणि त्‍या माहितीचा उपयोग करून व्‍यापारासंदर्भात योग्‍य निर्णय घेऊ शकतात.  

डेरिव्‍हेटिव्‍ह्ज विभागाचे भारतातील व्‍यापार कृतींवर वर्चस्‍व आहे. या विभागाचा एक्‍स्‍चेंजेसवरील व्‍यापार मूल्‍यामध्‍ये जवळपास ९५ टक्‍के हिस्‍सा आहे. ऐतिहासिकदृष्‍ट्या या विभागामध्‍ये रिटेल सहभाग अत्‍यंत कमी राहिला आहे, पण मागील काही वर्षांमध्‍ये यामध्‍ये लक्षणीय वाढ होताना दिसण्‍यात आली आहे. पण रिटेल गुंतवणूकदारांसाठी प्रचलित असलेली प्रमुख समस्‍या म्‍हणजे डेरिव्‍हेटिव्‍ह्ज डेटा जटिल असू शकतो आणि सामान्‍यत: विविध स्रोतांसोबत तुलना करणे अवघड आहे. परिणामत: रिटेल गुंतवणूकदारांना त्‍यांच्‍या संस्‍थात्‍मक काऊंटरपार्टसच्‍या तुलनेत तोटा होतो.   

एफॲण्‍डओ डॅशबोर्ड युजर्सना व्‍यापक डेरिव्‍हेटिव्‍ह्ज डेटा देण्‍यासोबत स्‍मार्ट ग्राफिक्‍सच्‍या स्‍तरावर अधिक भर देखील करतो, ज्‍यामुळे माहिती अत्‍यंत विश्‍वसनीय असण्‍याची खात्री मिळते. योग्‍य डेरिव्‍हेटिव्‍ह्ज व्‍यापार करण्यासाठी आवश्‍यक असलेली कोणतीही महिती युजर्सना एका क्लिकमध्‍ये उपलब्‍ध होते. डॅशबोर्डमधील इंटरअॅक्टिव्‍ह चार्टस युजरला अधिक शोध घेण्‍यास प्रोत्‍साहित करतात, ज्‍यामुळे ही माहितीपूर्ण प्रक्रिया आहे. व्‍यापक डेरिव्‍हेटिव्‍ह्ज डेटासंदर्भात देण्‍यात आलेले व्हिज्‍युअल इंटेलिजन्‍स डॅशबोर्डला पहिल्‍यांदाच व्‍यापार करणा-या व्‍यापा-यांसाठी, तसेच अनुभवी व्‍यापा-यांसाठी अत्‍यंत प्रबळ साधन बनवते.   

डॅशबोर्डची प्रमुख वैशिष्‍ट्ये आहेत स्‍टॉक्‍स व निर्देशांकांसाठी ऑप्‍शन-चेन, ओपन इंटरेस्‍ट ॲनालिसिस, ऑप्‍शन ग्रीक्‍स आणि भावी स्थितीसाठी हिट-मॅप. युजरला निफ्टी निर्देशांक पर्याय पाहिजे असतील तर त्‍याला/तिला फक्‍त 'ऑप्‍शन चेन' आयकॉनवर टॅप करावे लागेल. त्‍यानंतर प्रत्‍येक टप्‍प्‍यावर कॉल व पुट पर्याय दिसतील. तसेच हिट मॅप गुंतवणूकदारांना विशिष्‍ट निर्देशांकाच्‍या प्रत्‍येक घटकामधील दीर्घकालीन/लघुकालीन स्‍थान समजण्‍यास मदत करतो. तसेच विशिष्‍ट दिशेने वाटचाल करणारे स्‍टॉक्‍स ओळखण्‍यामध्‍ये देखील मदत करतो. डॅशबोर्ड प्रमुख जागतिक निर्देशांक आणि संस्‍थात्‍मक फ्लो डेटाच्‍या कामगिरीची माहिती देखील देतो. ज्‍यामुळे युजर्सना महत्त्वपूर्ण पार्श्‍वभूमी माहिती मिळते.  

पेटीएम मनीचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी वरूण श्रीधर म्‍हणाले, ''एफॲण्‍डओ डॅशबोर्ड हे पेटीएम मनीचे क्रांतिकारी ऑफरिंग आहे, जे रिटेल डेरिव्‍हेटिव्‍ह्ज व्‍यापा-यांना संस्‍थात्‍मक पातळीवरील व्‍यापाराची माहिती व अनुभव देते. अनुपलब्‍धता आणि माहितीमधील असममितता हे व्‍यापारासंदर्भात अयोग्‍य निर्णय होण्‍यास कारणीभूत घटक आहेत. आम्‍ही आमचे युजर्स सर्वोत्तम व्‍यापारांसाठी सर्वोत्तम साधनांसह सक्षम असण्‍याची खात्री घेऊ इच्छितो. आम्‍ही उच्‍च सर्वसमावेशक एफअॅण्‍डओ डॅशबोर्ड डिझाइन केला, जो सुलभपणे वापरता येतो. आमचा विश्‍वास आहे की, हे पहिल्‍यांदाच गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार आणि अनुभवी व्‍यापा-यांसाठी अपरिहार्य साधन बनेल.''     

पेटीएम मनी हे देशातील सर्वात प्रबळ व किफातयशीर व्‍यापार व्‍यासपीठ आहे. हे व्‍यासपीठ प्रति ऑर्डर १० रूपयांमध्‍ये मोफत व इन्‍ट्राडे / एफॲण्‍डओ ट्रेड्ससाठी ऑर्डर्स डिलिव्‍हर करते. एफॲण्‍डओ डॅशबोर्डच्‍या लाँचसह पेटीएम मनी रिटेल डेरिव्‍हेटिव्‍ह्ज व्‍यापारामधील अग्रणी बनण्‍याच्‍या स्थितीवर आहे. एफॲडओ डॅशबोर्ड आता सर्व विद्यमान व नवीन पेटीएम मनी युजर्ससाठी कार्यान्वित आहे आणि युजर्सना याचे नवीन व्‍हर्जन प्राप्‍त करण्‍यासाठी ॲप अपग्रेड करण्‍याची गरज आहे. 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24