फेडरल बँक हॉर्मिस मेमोरियल फाउंडेशन शिष्यवृत्तीसाठी अर्ज आमंत्रित करीत आहोत.
फेडरल बँक हॉर्मिस मेमोरियल फाउंडेशन शिष्यवृत्तीसाठी अर्ज आमंत्रित करीत आहोत
मुंबई, २७ ऑक्टोबर २०२१: फेडरल बँकेकडून 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी ‘फेडरल बँक हॉर्मिस मेमोरियल फाउंडेशन शिष्यवृत्ती’साठी अर्ज आमंत्रित केले जात आहेत. ही शिष्यवृत्ती, बँकेचे संस्थापक श्री के पी हॉर्मिस यांच्या स्मरणार्थ सुरू करण्यात आली आहे.
शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी 2021-22 या शैक्षणिक वर्षात शासकीय/अनुदानित/सरकार मान्यताप्राप्त स्व-वित्तपुरवठा महाविद्यालयांमध्ये गुणवत्तेनुसार प्रवेश मिळवलेला असावा. शिष्यवृत्तीसाठी पात्र अभ्यासक्रमांत एम बी बी एस, अभियांत्रिकी, बी एस सी नर्सिंग, बी एस सी कृषी यासह बी एस सी (ऑनर्स), कृषी विद्यापिठांकडून आयोजित को-ऑपरेशन अँड बँकिंग विथ अॅग्रिकल्चर सायन्सेस आणि एम बी ए सामील आहेत. अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रु 3,00,000/- पेक्षा कमी असावे. देशासाठी हुतात्मा झालेल्या सशस्त्र दलातील कर्मचार्यांच्या मुलांसाठी, शिष्यवृत्तीसाठी स्वतंत्र चॅनल तर्फे विचार केला जाईल आणि कौटुंबिक उत्पन्नाची वरील अट या श्रेणीतील विद्यार्थ्यांना लागू होणार नाही.
केरळ, तामिळनाडू, गुजरातसह महाराष्ट्र राज्यांतील विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. शारीरिकदृष्ट्या विकलांग विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक समूहांत एक जागा वेगळी ठेवली जाईल, याकरता पुरावा म्हणून किमान डी एम ओ किंवा बँकेच्या मान्यताप्राप्त वैद्यकीय अधिकाऱ्याच्या दर्जाच्या अधिकाऱ्याने जारी केलेले प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाईल. शारीरिकदृष्ट्या अपंग प्रवर्गांतर्गत अर्ज प्राप्त न झाल्यास, या जागेचा उपयोग सर्वसाधारण प्रवर्गाकरता करण्यात येईल.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांना १००% शिक्षण शुल्क आणि महाविद्यालयाच्या फी रचनेनुसार भरलेल्या इतर शैक्षणिक खर्चाची कमाल रु. १ लाख प्रति वर्ष पर्यंतची परतफेड केली जाईल,.
Comments
Post a Comment