बँक ऑफ बडोदा ' बडोदा किसान पखवाडा ' च्या चौथ्या पर्वातून करणार ग्रामीण क्षेत्राची उन्नती
बँक ऑफ बडोदा ' बडोदा किसान पखवाडा ' च्या
चौथ्या पर्वातून करणार ग्रामीण क्षेत्राची उन्नती
~बँकेतर्फे 16 झोनल कार्यालयांमध्ये सेंटर फॉर अॅग्रिकल्चरल अँड प्रोसेसिंग (CAMP) युनिट्सची सुरुवात
मुंबई, 28 ऑक्टोबर 2021 : भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील प्रीमिअम बँक असलेल्या बँक ऑफ बडोदातर्फे (BoB) ‘बडोदा किसान दिवस’चे दिमाखदार उद्घाटन जाहीर करत जागतिक अन्न दिवस साजरा करण्यात आला. आज ‘बडोदा किसान पखवाडा’ या शेतकरी वचनबंध कार्यक्रमाच्या (फार्मर एंगेजमेंट प्रोग्रॅम) चौथ्या पर्वाच्या पंधरवड्याची सुरुवात करण्यात आली. या वर्षी, अन्न व कृषी संस्था (एफएओ) यांच्या संकल्पनेशी सुसंगत असलेल्या ‘आमची कृती हेच आमचे भविष्य आहे’ या संकल्पनेवर हा एंगेजमेंट कार्यक्रम साजरा करण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून, आपल्या देशाच्या आर्थिक वाढीमध्ये शेतकरी सुमदायाने दिलेल्या योगदानाची दखल घेण्यात येणार आहे व त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे आणि या निमित्ताने शेतकरी संपर्क कार्यक्रम, ज्ञान मालिका, सत्कार कार्यक्रमांचा समावेश आहे. भारतभर राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाची सांगता 31 ऑक्टोबर 2021 रोजी होईल आणि विविध चॅनल्सच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना याचा लाभ होईल.
बँकेने ‘सेंटर फॉर अॅग्रिकल्चर मार्केटिंग अँड प्रोसेसिंग’ (सीएएमपी) ही त्यांची नवी केंद्रीभूत कृषी कर्जे प्रक्रिया युनिट्स 16 झोनल कार्यालयांमध्ये सुरू केली. CAMP हे खास कर्ज वाटप प्रारुप असून अपारंपरिक कृषी उत्पादनांसाठी अर्थसहाय्य देण्यावर आणि कृषी-मार्केटिंग अॅक्टिव्हींवर भर देण्यात येतो. CAMPमध्ये प्रशिक्षित मनुष्यबळ आहे ज्यांना मोठ्या रकमेच्या कर्ज खात्यांना हाताळण्याची समज आणि जाणीव आहे. दर्जेदार व्यवसाय स्रोतांसाठी बँकेतर्फे स्थानिक संस्थांसोबतच्या सहयोगाला चालना देण्यात येणार आहे.
या वेळी बोलताना व्यवस्थापकीय संचालक, श्री संजीव चड्ढा म्हणाले, “हे असे एक क्षेत्र आहे ज्याने सध्या सुरू असलेल्या महामारीचा प्रभाव सहन करत त्यावर मात केलीच, त्याचबरोबर या क्षेत्राची वाढही होत आहे. त्याचप्रमाणे अनेक कृषीतंत्रज्ञान फर्म्स संपूर्ण कृषी परिसंस्था आणि व्याप्तीमध्ये बदल घडवत आहेत. या सगळ्यामुळे कमी खर्चात प्रगती करण्यासाठी नव्या संधी उपलब्ध होत आहेत. आपल्याला या संधींचा निश्चितच लाभ होत आहे. देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (स्वातंत्र्याची 75 वर्षे) साजरा होत असताना कृषी व कृषी क्षेत्राशी संलग्न असलेल्या उद्योगांच्या शाश्वत वाढीमध्ये गुंतवणूक करण्याचा आमचा निर्धार आहे. ‘बडोदा किसान पखवाडा’ कार्यक्रमांतर्गत आम्ही बँकेचे शेतकरीकेंद्री उपक्रम सादर करत आहोत आणि त्यांचा प्रसार करत आहोत आणि अधिकाधिक शेतकऱ्यांनी आमच्याशी सहयोग करावा आणि पुढील पिढ्यांसाठी लाभ घ्यावेत, असे आम्ही त्यांना आवाहन करत आहोत.”
या वेळी कार्यकारी संचालक श्री. विक्रमादित्यसिंग खिची म्हणाले, “आमची बँक कृषि वित्तसहाय्यासह बँकिंग आणि इन्श्युरन्सच्या सर्व क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञान स्वीकारार्हतेमध्ये आघाडीवर आहे. बँकेच्या नव्या केंद्रीभूत प्रक्रिया यंत्रणेमुळे एकसूत्रता, वेगवान पूर्तता कालावधी आणि उच्च अनुपालन मानके यांची खातरजमा करते. बाजारपेठेच्या बदलत्या परिस्थितीत CAMPतर्फे, नव्या व अभिनव कृषी उत्पादनांना व कार्यपद्धतींना स्वीकारण्यासाठी चालना दिली जाईल, जेणेकरून बँकेकडे वैविध्यपूर्ण प्रगत कृषीसाधनांचा पोर्टफोलियो असेल.
सरकारने आणि विविध ठिकाणच्या स्थानिक प्रशासनाने जारी केलेल्या कोव्हिड-19 संदर्भातील नियमांचे पालन करून बँकेचा संपर्क कार्यक्रम आयोजित करण्यात येईल.
Comments
Post a Comment