सेकंड हॅण्ड टू-व्हीलर्स खरेदी करताना या गोष्टींकडे द्या लक्ष्य

सेकंड हॅण्ड टू-व्हीलर्स खरेदी करताना या गोष्टींकडे द्या लक्ष्य

भारताच्या रस्त्यांवर सध्या २० कोटींहून अधिक दुचाकी गाड्या आहेत, असे असताना ग्राहकांनी चांगल्या स्थितीतील आणि त्यांच्या पैशांची ब-यापैकी बचत करून देईल अशा यूज्ड टू-व्हीलरचा शोध घ्यायला हवा. अशी टू-व्हीलर शोधण्यासाठी ग्राहक खूप धडपड करत असतात आणि बहुतेक वेळा अशा दुचाकी विकणारे आणि डीलर्स अशा दोन्हींकडूनही फसवणूकच त्यांच्या पदरी पडते. वापरलेल्या दुचाकींची बाजारपेठ खूप मोठी आहे, पण असे असूनही ग्राहकांना छोट्या-मोठ्या डीलर्सबरोबर हे व्यवहार करताना खूपच निराशाजनक ग्राहक अनुभव येतो. अशा परिस्थितीमध्ये ग्राहकांनी सेकंड हॅण्ड किंवा यूज्ड टू-व्हीलर्सची बाजारपेठ आणि योग्य वाहनाची निवड कशी करावी याचे तंत्र समजून घेणे आवश्यक आहे. याबद्दल सविस्तर माहिती देताहेत (CredR) क्रेडआरचे चीफ स्ट्रॅटेजी ऑफिसर, श्री. शशीधर नंदिगम.   

कंपनी प्रतिष्ठित हवी: इथे विचारात घेण्यासारखी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चांगल्या दर्जाची सेकंड हॅण्ड दुचाकी वाजवी किंमतीत विकत घेऊ पाहणा-यांनी नामांकित, विक्रीनंतरच्या सेवा, विमा आणि इतर मूल्यवर्धित सेवा, सारे एकाच ठिकाणी देऊ शकणा-या कंपनी/ब्रॅण्डचीच दुचाकी खरेदी करायला हवी.

बजेट आखा: यूजर्सनी वापरलेली दुचाकी खरेदी करताना अत्यंत स्वस्त दरात मिळणारी तसेच त्यासोबत अतिरिक्त कर, अवमूल्यन असे कोणतेही इतर घटक त्यात अंतर्भूत नसतील अशी दुचाकी विकत घेण्याचा विचार करावा. तसेच आपले बजेट ठरवताना दर्जा, बाइकचे वय, ब्रॅण्डचे मूल्य आणि आपल्याला हव्या असलेल्या टू-व्हीलरची उपलब्धता अशा इतर घटकांचाही विचार केला पाहिजे.

अभ्यास करा: यूज्ड टू-व्हीलर्स विकत घेऊ पाहणा-यांनी ऑनलाइन तसेच सेलर्सच्या माध्यमातून या विषयाची माहिती शोधली पाहिजे व या खरेदीसाठी वास्तविक, प्रत्यक्षात उतरवता येतील अशा अपेक्षा ठेवल्या पाहिजेत. ही गोष्ट महत्त्वाची आहे कारण कोणतेही टू-व्हीलर्सचे कोणतेही मॉडेल/ब्रॅण्ड त्यांच्या गरजांशी तंतोतंत जुळणारे असू शकत नाही. शिवाय इतर सेलर्सबद्दल ग्राहकांनी दिलेल्या प्रतिक्रिया, रिव्ह्यू स्कोअर्सही तपासून घ्यायला हवेत. चांगले रेटिंग आणि ऑनलाइन मंचावर ग्राहकांच्या चांगल्या प्रतिक्रिया मिळविणा-या यूज्ड टू-व्हीलर ब्रॅण्ड्सकडून खरेदी करणे केव्हाही चांगले.

घोटाळ्यांपासून सावध रहा: भारतातील वापरलेल्या दुचाकींची बाजारपेठ अजूनही खूपच असंघटित आहे, तेव्हा घोटाळेबाज, फसवणूक करणा-या लोकांपासून सावध रहा. इथे ग्राहकांनी जागरुक असणे आवश्यक आहे. त्यांनी एखाद्या व्यक्तीकडून किंवा रस्त्यावरच्या छोट्या-मोठ्या डीलर्सऐवजी प्रमाणित, एखाद्या प्रतिष्ठित विक्रेता संस्थेचे नाव असणा-या सेलर्सकडूनची अशा दुचाकी विकत घेण्याची खबरदारी घ्यायला हवी.

होम टेस्ट राइड: खरेदीचा व्यवहार पक्का करण्याआधी ग्राहकाने गाडीची ट्रायल रन घेण्याचा विचार करायला हवा. यामुळे आपण निवडलेली दुचाकी चालविण्यासाठी किती आरामशीर आहे, तिची रस्त्यावरची कामगिरी कशी आहे, ब्रेक्स आणि इतर घटकांचे यांत्रिक कार्य कसे चालते या सर्व बारकाईने पहावयाच्या गोष्टींची कल्पना येते. सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात संघटित क्षेत्रातील टू-व्हीलर कंपन्या बाइक्सची होम डिलिव्हरी तसेच कॉन्टॅक्टलेस डिलिव्हरीही करत आहेत. ग्राहकांना अशा सेवांचा आवर्जून वापर केला पाहिजे.

कागदपत्रांची पडताळणी: सेकंड हॅण्ड बाइक विकत घेण्यापूर्वी विमा, आरसी बुक, चॅसिस नंबर, मॅन्युफॅक्चरिंगची तारीख आणि प्रदूषण प्रमाणपत्र या सर्व संबंधित कागदपत्रांची पडताळणी करून घेणे अनिवार्य आहे. गाडीवर आधी घेतलेले कर्ज असेल तर बँक हायपॉथीकेशन सर्टिफिकेट असायलाच हवे. आरटीओमध्ये पैसे भरून गाडीच्या कागदपत्रांची पडताळणी करून घेतल्यास तुम्ही निवडलेल्या टू-व्हीलरच्या विरुद्ध नियमभंगांचे कोणते गुन्हे वगैरे दाखल झाले आहेत किंवा नाहीत हेही कळू शकेल. सध्याच्या काळात, डुप्लिकेट कागदपत्रे मिळविणे अतिशय सोपे झाले आहे, त्यामुळे अशी कागदपत्रे देऊन सेलर्सकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी अत्यंत बारकाईने पडताळणी करायला हवी.

वॉरंटीचा कालावधी/विक्रीनंतरचे लाभ: सेकंड हॅण्ड दुचाकीचा पर्याय निवडताना वॉरंटी संपण्याची तारीख आणि एक्स्चेंजची सुविधा किती काळापर्यंत लागू आहे हे तपासून घेणे चांगले. अशा मुद्दयांची स्पष्टपणे पडताळणी करून घेतली असेल तर खरेदी केलेल्या बाइकचा दर्जा असमाधनकारक वाटल्यास तुम्ही ती परत करू शकता किंवा तिच्या बदल्यात नवीन टू-व्हीलर घेऊ शकता.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24