नवीन टाटा एमडी चेक एक्सप्रेस आरटी-पीसीआर टेस्टिंग सुविधा ओमायक्रॉन व्हेरियंटसाठी परीक्षणांना प्रोत्साहन देणार

 नवीन टाटा एमडी चेक एक्सप्रेस आरटी-पीसीआर टेस्टिंग सुविधा 

ओमायक्रॉन व्हेरियंटसाठी परीक्षणांना प्रोत्साहन देणार 


किफायतशीर, व्हेरियंट-प्रूफ आणि जलद उपयोग करता यावा यासाठी भारतात विकसित करण्यात आलेली आरटी-पीसीआर टेस्ट


ओमायक्रॉन व्हेरियंटच्या केसेस जगभरात वाढत आहेत आणि या पार्श्वभूमीवर भारतात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे, अति जोखीम असलेल्या देशांमधून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी परीक्षण करवून घेणे अनिवार्य करण्यात आले आहे आणि इतर देशांमधून आलेल्या प्रवाशांची देखील रँडम परीक्षणे केली जात आहेत. काही राज्यांनी देशांतर्गत प्रवास करत असलेल्या लोकांसाठी निगेटिव्ह कोविड टेस्ट्स करणे अनिवार्य केले आहे आणि इतरही प्रतिबंध जारी केले आहेत.  भारतात पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात केसेसमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता काही संशोधनांमध्ये वर्तवण्यात आली आहे, किफायतशीर आणि अतिशय जलद निष्कर्ष देऊ शकतील अशा आरटी-पीसीआर कोविड टेस्ट्सच्या मागणीमध्ये अनेक पटींनी वाढ होण्याची शक्यता आहे. या आव्हानांचा सामना करण्यासाठी टाटा एमडीने भारतात कोविड परीक्षण सुविधा विकसित केल्या आहेत ज्या आपल्या देशाच्या कोविड परीक्षण क्षमतेमध्ये लक्षणीय वृद्धी घडवून आणतील.

टाटा एमडी कोविड एक्सप्रेस आरटी पीसीआर सुविधांमध्ये यांचा समावेश आहे:
१.    टाटा एमडी चेक एक्सएफ, हे एक ३-जीन आरटी-पीसीआर किट आहे जे आरएनए एक्स्ट्रॅक्शन-फ्री आहे. यामध्ये इकडून तिकडे सहज नेता येईल अशा आणि जलद क्यूपीसीआर ऍनलायझरसोबत फास्ट ऍम्प्लिफिकेशन प्रोटोकॉलचा उपयोग केला जातो. यात प्रोसेसिंगचा कालावधी फक्त १ तास असतो आणि प्रत्येक मशीन प्रत्येक बॅचमध्ये ३० नमुन्यांवर प्रक्रिया करू शकते. किटला आयसीएमआरने ९५%+ संवेदनशीलता आणि १००% विशिष्टतेसह मंजुरी दिली आहे.
२.    टाटा एमडी चेक आरटी-पीसीआर फास्ट ३जीन, हे एक ३-जीन आरटी-पीसीआर किट आहे ज्यामध्ये फास्ट ऍम्प्लिफिकेशन प्रोटोकॉलचा उपयोग केला जातो आणि त्यामुळे याचा प्रोसेसिंग चा कालावधी फक्त ९० मिनिटे असतो.  यामध्ये प्रत्येक मशीन प्रत्येक बॅचमध्ये ९० नमुन्यांचे प्रोसेसिंग करू शकते.  किटचा उपयोग सध्याच्या क्यूपीसीआर उपकरणांमध्ये केला जाऊ शकतो.  याला आयसीएमआरने १००% संवेदनशीलता आणि १००% विशिष्टतेसह मंजुरी दिली आहे.

या दोन्ही किट्समध्ये ३-जीनचा वापर करण्यात आला आहे जे व्हेरियंट-प्रूफ आहे.

प्रक्रियेतून जाणाऱ्या सामग्रीचे उच्च प्रमाण (थ्रूपुट क्षमता) हे या सुविधेचे वैशिष्ट्य यामधून मिळणारा एक प्रमुख फायदा आहे. एकीकडून दुसरीकडे सहजपणे ने-आण करण्याजोगे आणि जलद काम करणाऱ्या क्यूपीसीआर ऍनलायझरसोबत टाटा एमडी एक्सएफ पाच लाईन्सचा उपयोग करून २ तासांत ३००-४०० नमुन्यांचे प्रोसेसिंग करू शकते. टाटा एमडी चेक आरटी-पीसीआर फास्ट ३-जीन ५ क्यूपीसीआर उपकरणांचा (९६ वेल्स) उपयोग करून २ तासांत ४५० नमुन्यांचे प्रोसेसिंग करू शकते.  सध्या विमानतळांवर वापरल्या जात असलेल्या सर्वात वेगवान परीक्षण सुविधांची थ्रूपुट क्षमता कमी असून एकावेळी एकाच परीक्षणाचे प्रोसेसिंग केले जाते आणि तरीही त्या खूप महाग आहेत.

टाटा मेडिकल अँड डायग्नोस्टिक लिमिटेडचे सीईओ श्री. गिरीश कृष्णमूर्ती यांनी सांगितले, "अभिनव वैद्यकीय तंत्रज्ञान भारतात विकसित करण्यासाठी आम्ही टाटा एमडीमध्ये सातत्याने प्रयत्नशील असतो आणि आम्ही कोविड परीक्षणांसाठी अनेक नवीन तंत्रज्ञानांवर काम करत आहोत. या एक्सप्रेस परीक्षण सुविधा विमानतळांवर आणि काही कार्यक्रम वगैरे असेल अशा ठिकाणी वापरल्या जाऊ शकतात, ज्याठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर आणि विश्वसनीय परीक्षणे केली जाणे गरजेचे असते."

नवीन टाटा एमडी चेक एक्सप्रेस पीसीआर टेस्टिंग सुविधा या महिन्याच्या सुरुवातीपासून बंगलोरच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर वापरली जात आहे आणि मोठ्या प्रमाणावर परीक्षणांबरोबरीनेच वास्तविक वातावरणात देखील जलद आणि विश्वसनीय निष्कर्ष देत असल्याचे सिद्ध झाले आहे.  अति जोखीम असलेल्या देशांमध्ये येत असलेल्या, आरटी-पीसीआर परीक्षण ज्यांच्यासाठी अनिवार्य आहे अशा लोकांच्या खूप मोठ्या संख्येची परीक्षणे सुविधाजनक पद्धतीने करण्यात मदत करण्याच्या दृष्टीने या सुविधा उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24