टायगर श्राॅफच्या "गणपत'ची "कु' अॅपवरील डान्स चॅलेंजची चर्चा
टायगर श्राॅफच्या "गणपत'ची "कु' अॅपवरील डान्स चॅलेंजची चर्चा
प्रतिनिधी : "कु' स्वदेशी अॅपवरील पोस्टमुळे टायगर श्राॅफच्या "गणपत'ची आतापासूनच चर्चा आहे. खरे तर हा चित्रपट पुढील नाताळला म्हणजे २३ डिसेंबर २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. पण, "कु' अॅपवरील टिझरमुळे टायगरचे चाहते आणि प्रेक्षकांची उत्सुकता आतापासूनच शिगेला पोहोचली आहे. टायगर "कु'वर नवा व्हिडीओ कधी पोस्ट करतो याची त्याचे चाहते चातकासारखी वाट पाहात असतात.
टायगर अॅक्टिंग इतकाच त्याच्या डान्ससाठीही फेमस आहे. "कु'मुळे त्याच्या जगभरातील चाहत्यांत वाढ झाली आहे. कोरीयन पाॅप डान्सर काईने टायगरला एका गाण्यावर डान्स करून दाखवण्याचे चॅलेंज केले. आणि टायगरनेही ते सहज स्वीकारीत पूर्ण केले. काईने दिलेल्या गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ टायगरने "कु'वर पोस्ट केला आहे. पाहता पाहता लाखो लोकांपर्यत व्हिडीओ व्हायरल झाला. सध्या सर्वत्र या व्हिडीओची चर्चा आहे
Comments
Post a Comment