एफआरएनडीने क्राफ्टन इन्‍क.च्‍या नेतृत्‍वांतर्गत सिरीज ए फंडिंग फेरीमध्‍ये उभारला ६.५ दशलक्ष डॉलर्स निधी

 एफआरएनडीने क्राफ्टन इन्‍क.च्‍या नेतृत्‍वांतर्गत सिरीज ए फंडिंग फेरीमध्‍ये 

उभारला ६.५ दशलक्ष डॉलर्स निधी  


 


भारत, २१ डिसेंबर २०२१: एफआरएनडी या बेंगळुरूमधील ऑडिओ रोमांस अॅण्‍ड फ्रेंड डिस्‍कव्‍हरी स्‍टार्टअपने अत्‍यंत लोकप्रिय बॅटल रोयाल गेम बॅटलग्राऊण्‍ड्स मोबाइल इंडिया (बीजीएमआय)ची निर्माती दक्षिण कोरियन गेमिंग कंपनी क्राफ्टन इन्‍क.च्‍या नेतृत्‍वांतर्गत सिरीज ए फंडिंग फेरीमध्‍ये ६.५ दलशक्ष डॉलर्स निधी उभारला आहे. सिरीज ए फेरीमध्‍ये कंपनीचे मागील गुंतवणूकदार इंडिया क्‍वोशण्‍ट आणि एलीव्‍हेशन कॅपिटल यांचा देखील सहभाग दिसण्‍यात आला.  

आयआयटी कानपूरचे तीन माजी विद्यार्थी भानू प्रताप सिंग तन्वर, हार्दिक बंसल आणि हर्षवर्धन छंगानी यांनी एफआरएनडीची स्‍थापना केली. हा भावी अब्‍जो युजर्ससाठी विकसित करण्‍यात आलेला अद्वितीय अॅप आहे. हा अॅप तरूणांना एफआरएनडी डेटिंग सारखे लाइव्‍ह-स्ट्रीम फॉर्मेट्स आणि राजा राणी चोर पोलिस, वॉईस मॅच यासारखे ऑडिओ गेम्‍स, तसेच इतर कॅज्‍युअल गेम्‍सच्‍या माध्‍यमातून एकमेकांशी कनेक्‍ट होण्‍याची सुविधा देतो. ज्‍यामधून १-ऑन-१ कनेक्‍शन्‍स निर्माण करण्‍यावर भर दिला जातो. युजर्स सुलभपणे ऑडिओच्‍या माध्‍यमातून कनेक्‍ट होऊ शकतात आणि मॅचमेकरसोबत संवाद सुरू करू शकतात. व्‍यासपीठांवरील मॅचमेकर-नेतृत्वित गेम व चॅट रूम्‍समध्‍ये विशिष्‍ट नियंत्रण यंत्रणा आहेत, ज्‍या मुला-मुलींना कनेक्‍ट होण्‍याची आणि सुरक्षित, पण सर्वसमावेशक संवाद साधण्‍याची सुविधा देतात.  

एफआरएनडीचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी व सह-संस्‍थापक भानू म्‍हणाले, ''भारतीय रोमांस मार्केटमध्‍ये मोठी संधी आहे, जेथे तरूण इंटरनेटवर एकमेकांशी कनेक्‍ट होऊन संवाद साधतात. आम्‍ही भारतीय तरूणांना, विशेषत: मुलींना सुरक्षित व्‍यासपीठ देण्‍याप्रती कार्य करत आलो आहोत. सुरक्षित वैशिष्‍ट्ये आणि अत्‍याधुनिक अल्‍गोरिदम्‍स एफआरएनडीला या भावी अब्‍जो युजर्सना नियंत्रित पद्धतीने अद्वितीय अनुभव घेण्‍यासाठी योग्‍य अॅप बनवतात.'' ते पुढे म्‍हणाले, ''आम्‍हाला क्राफ्टन इन्‍क.कडून मिळालेल्‍या निधीचा आनंद होत आहे. या निधीसह आम्‍ही विद्यमान १० भारतीय भाषांमधील एफआरएनडीला विकसित करण्‍याचा, तसेच आमचा तंत्रज्ञान परिसंस्‍था प्रबळ करण्‍याचा आणि भारतातील व जगभरातील आमची उपस्थिती वाढवण्‍याचा मनसुबा आहे.''

गुंतवणूकीबाबत बोलताना क्राफ्टन इन्‍क. येथील भारतीय विभागाचे प्रमुख शॉन ह्युनील सोन म्‍हणाले, ''ही गुंतवणूक भारतातील स्‍टार्टअप परिसंस्‍थेप्रती आमची कटिबद्धता अधिक दृढ करण्‍याप्रती आमच्‍या प्रयत्‍नांचा भाग आहे. एफआरएनडी हे अद्वितीय उत्‍पादन आहे, जे जागतिक कंपन्‍यांना अवलंबण्‍यास अवघड जाईल, अशा अद्वितीय स्‍थानिक सोल्‍यूशनसह संपूर्ण विभागामध्‍ये धुमाकूळ निर्माण करेल. आम्‍हाला या उच्‍च व्‍यावहारिक डिजिटल स्‍टार्टअपमध्‍ये असलेली भव्‍य क्षमता दिसून येते आणि त्‍यांच्‍या विकासगाथेमध्‍ये गुंतवणूक करण्‍याचा आनंद होत आहे. आम्‍ही या देशातील डिजिटल परिसंस्‍थेमध्‍ये आमूलाग्र बदल घडवून आणण्‍यास प्रेरित आहोत आणि अधिक संधींचा शोध घेत राहू, ज्‍यामुळे आम्‍हाला तरूण व विकसित होत असलेल्‍या स्‍टार्ट-अप्‍सना पाठिंबा देता येईल.''   

एफआरएनडी सध्‍या गुगल प्‍ले स्‍टोअरवर उपलब्‍ध आहे आणि सरासरी युजर्स दररोज या अॅपवर जवळपास २५ मिनिटे वेळ व्‍यतित करतात.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

After Abida Parveen & Atif Aslam's magical performance, Next is Enrique Iglesias who is all set to perform in UAE