इक्विटस स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड महाराष्ट्र सरकारची बँकिंग सहयोगी म्हणून नोंदणीकृत
इक्विटस स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड महाराष्ट्र सरकारची बँकिंग सहयोगी म्हणून नोंदणीकृत
भारत, 21 डिसेंबर २०२१: इक्विटस स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडने (''इक्विटस स्मॉल फायनान्स बँक'') राज्य सरकार कर्मचा-यांना सेवा देण्याच्या दृष्टिकोनासह महाराष्ट्र सरकारसोबत बँकिंग सहयोगी म्हणून सहयोगाची घोषणा केली आहे. या करारांतर्गत इक्विटस स्मॉल फायनान्स बँक विद्यमान कर्मचा-यांना पगार आणि भत्ते वितरीत करण्याची, तसेच पेन्शनधारकांना पेन्शनची तरतूद करण्याची सुविधा देईल, ज्यामुळे संस्थांना सोल्यूशन्स आणि व्यक्तींना मूल्यवर्धित सेवा मिळतील.
बंधन बँक, करूर वैश्य बँक, दि साऊथ इंडियन बँक या इतर तीन बँका आहेत, ज्यांना सरकारी कर्मचा-यांना पगार, भत्ते वाटपाची जबाबदारी देण्यात आली आहे. हा करार दायित्वासाठी आहे. सरकारने इक्विटस स्मॉल फायनान्स बँकेला महाराष्ट्रातील ५८ शाखांमधील विद्यमान आणि निवृत्त कर्मचा-यांसाठी पगार व पेन्शन खाती उघडण्याचे अधिकार दिले आहेत. बँक पैसे काढण्याच्या आणि वितरित करण्याच्या अधीन आहे.
याप्रसंगी बोलताना इक्विटस स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडच्या ब्रांच बँकिंग - लायबिलिटीज, प्रॉडक्ट्स अॅण्ड वेल्थ विभागाचे वरिष्ठ अध्यक्ष व कंट्री हेड श्री. मुरली विद्यानाथन म्हणाले, ''इक्विटस स्मॉल फायनान्स बँकेमध्ये आमचा ग्राहकांना एकसंधी बँकिंग अनुभव देण्यासाठी आमच्या सेवा सुलभ करण्यावर विश्वास राहिला आहे. आम्हाला महाराष्ट्र राज्यामध्ये कार्यान्वित करण्याची संधी दिल्याबद्दल आम्ही अधिका-यांचे आभार मानतो. महाराष्ट्र सरकारसोबतचा आमचा सहयोग आम्हाला संस्थांना सर्वोत्तम सोल्यूशन्स देण्यासाठी महाराष्ट्रातील आमच्या ५८ शाखांचा लाभ घेण्याची संधी देतो. तसेच आम्हाला वैयक्तिक ग्राहकांसह संबंधित व्यवस्थापकांना मूल्यवर्धित सेवा देण्यामध्ये, प्रत्येक खर्चासाठी रिवॉर्डस् देण्यामध्ये देखील मदत करतो. तसेच हा सहयोग आम्हाला महाराष्ट्र बाजारपेठेतील आमची उपस्थिती प्रबळ करण्यास देखील मदत करेल. आम्ही आमच्याकडे गुंतवणूक केलेल्या पैशांचे मोल करण्याच्या माध्यमातून या क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्यास उत्सुक आहोत.''
Comments
Post a Comment