दालमिया सिमेंट भारतच्या श्री. महेंद्र सिंघी यांचा आयसीआर आणि फर्स्ट कंस्ट्रक्शन कौन्सिलचा ‘पर्सन ऑफ दि इयर’ पुरस्काराने गौरव
दालमिया सिमेंट भारतच्या श्री. महेंद्र सिंघी यांचा आयसीआर आणि फर्स्ट कंस्ट्रक्शन कौन्सिलचा ‘पर्सन ऑफ दि इयर’ पुरस्काराने गौरव
२१ सप्टेंबर २०२१: दालमिया सिमेंट (भारत) लिमिटेड Dalmia Cement (Bharat) Limited, या आघाडीच्या भारतीय सिमेंट कंपनी आणि दालमिया भारत लिमिटेड Dalmia Bharat Limitedच्या मालकीच्या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. महेंद्र सिंघी यांना आज इंडियन सिमेंट रिव्ह्यू आणि फर्स्ट कंस्ट्रक्शन कौन्सिल यांचा उद्योगाला कार्बनमुक्त करून भारताचे सिमेंटचे भवितव्य या विषयावर आधारित १२व्या सिमेंट एक्स्पोमध्ये ‘पर्सन ऑफ दि इयर’ पुरस्कार २०२१-२२ देऊन गौरवण्यात आले. डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटर्नल ट्रेडचे अतिरिक्त सचिव श्री. अनिल अग्रवाल यांनी हा पुरस्कार सिमेंट एक्स्पोच्या १२ व्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात श्री. सिंघी यांना प्रदान केला.
श्री. सिंघी यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार त्यांच्या भारतीय आणि जागतिक सिमेंट क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्याप्रति दिलेल्या योगदानासाठी प्रदान करण्यात आला. ते आपल्या भविष्याधारित विचारसरणी आणि अत्यंत वेगळ्या व्यावसायिक दृष्टीकोनाद्वारे या क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून चक्रीय अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सतत कार्यरत आहेत. पर्सन ऑफ दि इयर पुरस्काराची स्थापना याच वर्षी करण्यात आली आहे.
श्री. सिंघी यांच्या पुरस्काराचे नामांकन असे आहे - “श्री. सिंघी हे सिमेंट उद्योगातील दिग्गज आहेत आणि त्यांचा दृष्टीकोन आणि कामगिरी यांच्यामुळे उद्योगाची मोठी वाढ झाली आहे. आम्ही त्यांना सिमेंट क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी इंडियन सिमेंट रिव्ह्यू पर्सन ऑफ दि इयर या पुरस्काराने गौरवित आहोत.”
श्री. सिंघी हे यूएन सीओपी प्रेसिडेन्सी यांच्याकडून श्री. सिंघी यांची नेमणूक सीओपी २६ बिझनेस लीडर म्हणून झाली असून वर्ल्ड बँक ग्रुपने कार्बन प्रायसिंग लीडरशिप कोएलिशनअंतर्गत त्यांची नेमणूक कार्बन प्रायसिंग चॅम्पियन म्हणून केली आहे.
ते सिमेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे तात्काळ माजी अध्यक्ष असून नॅशनल कौन्सिल फॉर सिमेंट अँड बिल्डिंग मटेरियल्सचेही तात्काळ माजी अध्यक्ष आहेत.
हा पुरस्कार स्वीकारताना दालमिया सिमेंट (भारत) लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. महेंद्र सिंघी म्हणाले की, “मी मागील ४३ वर्षांमध्ये ज्या ज्या लोकांसोबत काम केले आणि ज्यांनी माझ्या स्वच्छ व शाश्वत प्रवासाला आकार दिला आहे. त्यांच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारताना मला आनंद होत आहे आणि मी हा पुरस्कार त्यांना अर्पण करत आहे. माझ्या सिमेंटच्या प्रवासाला आधार देऊ शकणाऱ्या दूरदर्शी मार्गदर्शक आणि वचनबद्ध सहकाऱ्यांमुळे मला हा पुरस्कार मिळू शकला याबाबत मी खूप सुदैवी आहे. आम्हाला नफा मिळवण्यासाठी मदत होईल, मूल्यनिर्मितीची शाश्वती मिळेल आणि त्याचवेळी पर्यावरणीय शाश्वतता मिळणे शक्य होईल यासाठी नवनवीन बिझनेस मॉडेल्सकडे आम्ही जात असताना भविष्याबाबतही मला आशा वाटते आहे.”
नवी दिल्ली येथे आयोजित १२व्या सिमेंट एक्स्पोमध्ये सिमेंट क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्या आणि शाश्वतता तसेच उद्योगाला कार्बनमुक्त करण्यासाठी सेमिनार्स, परिषदा आयोजित करून आपली मते व्यक्त करण्यासाठी एकत्र आल्या आणि त्यांनी या विषयात योगदान दिले. यावेळी नवनवीन संशोधन आणि तंत्रज्ञान तसेच सिमेंट आणि काँक्रीट डिझाइन व बांधकामातील आघाडीवरही चर्चा करण्यात आली.
Comments
Post a Comment