गोदरेज अॅप्लायन्सेसने आपल्या फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटरमध्ये प्रगत नॅनो डीसइन्फेक्शन तंत्रज्ञानाच्या मदतीने ग्राहकांसाठी केली अन्न सुरक्षिततेत सुधारणा
गोदरेज अॅप्लायन्सेसने आपल्या फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटरमध्ये प्रगत नॅनो डीसइन्फेक्शन तंत्रज्ञानाच्या मदतीने ग्राहकांसाठी केली अन्न सुरक्षिततेत सुधारणा
आपल्या पोर्टफोलिओच्या ३०% आरोग्य आणि स्वच्छता विषयक उत्पादन योजना विस्ताराचे उद्दिष्ट
· एअर फ्लो डक्टच्या आत १००% पृष्ठभाग स्टरलायझेशन आणि अन्नपदार्थांच्या पृष्ठभागावरून ९५% हून अधिक निर्जंतुकीकरण
· पृष्ठभाग निर्जंतुकीकरण साहित्य, खोलीतील वातानुकुलीत यंत्रणा, लॉन्ड्री, डिशवॉशिंग पासून आता रेफ्रिजरेटर पर्यंत डीसइन्फेक्शन तंत्रज्ञानाचा विस्तार करून ग्राहकांच्या आरोग्याप्रती असलेली बांधिलकी जपण्याचे काम
मुंबई, २१ डिसेंबर २०२१: गोदरेज समूहाची प्रमुख कंपनी असणाऱ्या गोदरेज अँड बॉयसचा भाग असणाऱ्या गोदरेज अॅप्लायन्सेसने आरोग्य आणि स्वच्छताविषयक जाणीवांना अधिक महत्व देत आपल्या उत्पादन सादरीकरणाला आणखी बळकटी दिली आहे. वाढती मागणी पुरी करताना ब्रँडने फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटरमध्ये प्रगत नॅनो डीसइन्फेक्शन तंत्रज्ञान सादर केले असून कंपनीने त्यासाठी पेटंटही दाखल केले आहे.
आज आपण राहत असलेले वातावरण जीवजंतूंना पोषक आहे आणि ग्राहकांची त्याबद्दलची काळजी वाढत आहे. विशेषकरून आजच्या घडीला जेव्हा अन्न आपल्यापर्यंत पोहोचण्याआधी अनेकांकडून हस्तांतरित झालेले असते आणि आपल्या आजूबाजूची हवा सुद्धा जीवजंतूंना पोषक असताना आपण सेवन करत असलेले अन्न जितके शक्य होईल तितके आरोग्यपूर्ण असावे याकडे गोदरेज अॅप्लायन्सेसचा कटाक्ष आहे. नॅनो डीसइन्फेक्शन तंत्रज्ञानात रेफ्रिजरेटरच्या एअर फ्लो डक्टमध्ये विशेष जंतूविरोधी नॅनो कोटिंगचा वापर करण्यात येत आहे. या डक्टमधून जाणारी हवा निर्जंतुक होते आणि बंद रेफ्रिजरेटरमध्ये सगळीकडे फिरताना सूक्ष्मजैविक क्रियांवर नियंत्रण ठेवते. जोडीला रेफ्रिजरेटरमधील अन्नपदार्थ पृष्ठभाग निर्जंतुक करते. एअर फ्लो डक्टच्या आत १००% पृष्ठभाग स्टरलायझेशन आणि अन्नपदार्थांच्या पृष्ठभागावरून ९५% हून अधिक निर्जंतुकीकरण करण्याबाबत या तंत्रज्ञानाची चाचणी घेण्यात आली आहे. सूक्ष्मजैविक क्रियांचे थेट कमी झालेले प्रमाण अन्न अधिक चांगल्या प्रकारे टिकवून ठेवायला मदत करते. अन्न अधिक काळ ताजे आणि सकस राहते. सर्वसाधारण फ्रीजमध्ये पदार्थ गार राहत असल्यामुळे त्यातील सूक्ष्मजैविक क्रिया कमी होत असतात पण त्याहीपुढे एक पाऊल टाकत डीसइन्फेक्शन तंत्रज्ञान रेफ्रिजरेटरमधील हवा शुद्ध करते आणि त्यामुळे जीवजंतूंपासून अन्नपदार्थ अधिक सुरक्षीत राहायला मदत होते.
एनएबीएल मानांकित प्रयोगशाळेत या तंत्रज्ञानाची चाचणी घेण्यात आली. इकोली, सालमोनेला अशा नेहमी आढळणाऱ्या जंतूंसाठी २४ तास अन्न पदार्थ पृष्ठभाग निर्जंतुकीकरण प्रयोगशाळा चाचण्या घेण्यात आल्या. तसेच टोमॅटो,उघडा ब्रेड, दही, चिरलेले सफरचंद अशा नेहमी फ्रीज मध्ये आढळणाऱ्या विविध पदार्थांच्याही चाचण्या घेण्यात आल्या. हे प्रगत तंत्रज्ञान गोदरेज अॅप्लायन्सेसच्या मालकीचे आहे.
यावर्षी सुरुवातीला, गोदरेज अॅप्लायन्सेसने नॅनो कोटेड फिल्टर पृष्ठभागाशी संपर्कात येणारे ९९.९% विषाणू आणि जीवाणू यांनी भरलेले कण निर्जंतुक करणारे विशेष नॅनो कोटेड अँटी-व्हायरल फिल्टरेशन तंत्रज्ञानासह असलेले टी सिरीज एअर कंडीशनर्स सादर केले. अँटीजर्म युव्ही-आयन तंत्रज्ञान, स्टीम वॉश आणि जिवाणूंना दूर करून भांडी निर्जंतुक करणारे जीवाणू रोधक फिल्टर असलेले गोदरेज आयन डिशवॉशर्स तसेच ९९.९९% जंतू* आणि कोव्हीड विषाणू*चा नाश करणारे जर्म शिल्ड तंत्रज्ञानासह असलेले पंचतारांकित बीईई मानांकित गोदरेज आयन मॅगनस वॉशिंग मशिन्स सादर केले. लस साठवणुकीसाठी प्रगत वैद्यकीय रेफ्रिजरेटर आणि वैद्यकीय कोल्ड चेन साठी प्रगत फ्रीजर्सही गोदरेजने सादर केले आणि भारताच्या कोव्हीड लसीकरण मोहिमेचा एक भाग बनले. गेल्या वर्षी, कंपनीने जवळपास दैनंदिन वापराच्या सगळ्या गोष्टींच्या पृष्ठभागावरील कोविड विषाणू आणि जंतू यांचा नाश करण्यासाठी युव्हीसी आधारित निर्जंतुकीकरण उपकरण गोदरेज व्हायरोशिल्डही सादर केले. (*अटी लागू. godrej.com/Godrej-appliances येथे जाऊन चाचण्यांची तपशीलवार माहिती जाणून घ्या.)
नवीन सादरीकरणाबद्दल बोलताना गोदरेज अॅप्लायन्सेसचे व्यवसाय प्रमुख आणि कार्यकारी उपाध्यक्ष कमल नंदी म्हणाले, “आमच्या सगळ्या उपकरणांच्या, साहित्यांच्या पोर्टफोलिओमध्ये आमच्या ग्राहकांसाठी अधिक चांगले आरोग्य आणि स्वच्छता पुरविणारे पर्याय देण्यासाठी आणि त्यासाठी नवनव्या तंत्रज्ञानाचा अंगीकार करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. गेल्या वर्षीपासून जंतूंपासून सुरक्षा मिळविण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त अशी विविध उत्पादने आम्ही सादर केली आहेत. या सादरीकरणाला मिळत असणारा प्रतिसाद आणि ग्राहकांबरोबरचा आमचा सातत्यपूर्ण संवाद यांतून रेफ्रिजरेटरमध्ये अन्न जंतूविरहीत करण्याचे तंत्रज्ञान सादर करण्याची स्पष्ट गरज आम्हांला समजली आणि त्यातूनच आम्ही आमच्या रेफ्रिजरेटरमध्ये नॅनो डीसइन्फेक्शन तंत्रज्ञान सादर केले. या तंत्रज्ञानासह बाजारपेठेतील आमचे स्थान अधिक मजबूत करण्याचे आणि पुढच्या वर्षीपर्यंत आमच्या एकूण पोर्टफोलिओच्या ३०% आरोग्यविषयक सुविधा पर्याय उत्पादने वाढविण्याचे आमचे ध्येय आहे.”
गोदरेज अॅप्लायन्सेसच्या रेफ्रिजरेटर्स विभागाचे उत्पादन समूह प्रमुख अनुप भार्गव पुढे म्हणाले, “नॅनो डीसइन्फेक्शन तंत्रज्ञान सादरीकरण हा भारतीय रेफ्रिजरेटर उद्योगातील महत्वाचा टप्पा आहे. नॅनो डीसइन्फेक्शन तंत्रज्ञान अलिकडच्याच गोदरेज आयन व्हेलोर कन्व्हरटीबल रेफ्रिजरेटर मध्ये उपलब्ध आहे. जोडीला त्यात फ्रीज फ्रीजर ४ इन १ कन्व्हरटीबल तंत्रज्ञान आहे. तसेच त्यामध्ये अगदी ३० दिवसांपर्यंत तुमचे अन्न अत्यंत ताजे ठेवणारे प्रगत एअर फ्लो डिझाईनसह कूल बॅलन्स तंत्रज्ञान आहे. डीसइन्फेक्शन तंत्रज्ञान लवकरच संपूर्ण फ्रॉस्ट फ्री मालिकेत उपलब्ध होणार आहे.”
२४४-३५० लीटर क्षमतेची ही यंत्रे २९,००० रुपये किंमतीपासून उपलब्ध होत आहेत.
Comments
Post a Comment