औद्योगिक आणि व्यावसायिक कार्यालयीन जागेत परिवर्तन आणण्यासाठी सिन्फनी सज्ज, ‘लार्ज स्पेस वेंटी-कुलींग’ जाहिरातीद्वारे सर्वदूर पोहोचणार
औद्योगिक आणि व्यावसायिक कार्यालयीन जागेत परिवर्तन आणण्यासाठी सिन्फनी सज्ज, ‘लार्ज स्पेस वेंटी-कुलींग’ जाहिरातीद्वारे सर्वदूर पोहोचणार
~ भव्य औद्योगिक आणि व्यावसायिक जागांकरिता लार्ज स्पेस वेंटी-कुलींग (एलएसव्ही) वर्गवारीसह थंडगार, आरोग्यदायक आणि उपयुक्त कार्यालयीन वातावरणाच्या महत्त्वाचा प्रचार करत सिन्फनी लिमिटेडने 360-डिग्री कॅम्पेन लॉन्च केले आहे, ज्यामध्ये टीव्हीसीचा समावेश आहे~
सिम्फनी लिमिटेड ही भारताची स्वदेशी वैश्विक एअर-कुलींग कंपनी असून जगातील सर्वात मोठा एअर-कूलर निर्मितादार मानला जातो. त्यांच्यावतीने “सिम्फनी लार्ज स्पेस वेंटी-कुलींग” शीर्षकाखाली नवीन एकीकृत जाहिरात आणि प्रचार अभियान लॉन्च करण्यात आले, या माध्यमातून लार्ज स्पेस वेंटी-कुलींग (एलएसव्ही) वर्गवारीवर भर देण्यात आला आहे. टीव्हीसीचा समावेश असलेल्या या प्रचार अभियानाद्वारे मोठ्या औद्योगिक आणि व्यावसायिक कार्यालयीन जागा म्हणजे कारखाने, गोदामे, विक्री दालने, शैक्षणिक संस्था, रुग्णालये, रेस्टॉरंट इत्यादीपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट आहे. कर्मचारी /कामगारांच्या दृष्टीने आरोग्यदायी तसेच आरामदायक कार्यालयीन वातावरणाचे महत्त्व पटवून देण्याचे काम हे जाहिरात अभियान करेल.
जाहिरातीची सुरुवात वडील-लेकाच्या संभाषणाने होते (मुलगा अलीकडेच परदेशातून शिक्षण घेऊन परतला आहे) हा मुलगा लहानपणी आळशी, आजारपणाची सुट्टी किंवा कामात चुका करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मजेशीर टोपण नावाने चिडवत असे. तो आपल्या ऑफिस केबिनमध्ये बसून आठवणीचे स्मरणरंजन करतो आहे. वडील आनंदाने कार्यालयात झालेला बदल लक्षात आणून देतात. हे सगळे कर्मचारी मागील तीन वर्षांपासून सुधरल्याचे सांगतात. कारखान्यातील शॉप फ्लोअरवर चक्कर टाकून सगळ्या कर्मचाऱ्यांची भेट घे असेही वडील मुलाला सुचवतात. मात्र त्या मजल्यावर तापमान अधिक असल्याने मुलगा तिथे जायला राजी नसतो. अखेर वडिलांच्या आग्रहाखातर तो त्यांच्यासोबत शॉप फ्लोअरवर जातो. एकंदर नवीन वातावरणाच्या अनुभवाने मुलाला सुखद धक्का बसतो. आपण सिन्फनीची लार्ज स्पेस वेंटी-कुलींग बसवल्याने आल्हाददायक वातावरणात कर्मचाऱ्यांना काम करण्याचा उत्साह वाढल्याची माहिती वडील अभिमानाने मुलाला सांगतात. हा उत्साही बदल झाल्याने कर्मचारी वर्गाच्या आयुष्यात परिवर्तन आलेले असते.
या एकीकृत कॅम्पेन लॉन्चविषयी बोलताना सिन्फनीचे अध्यक्ष राजेश मिश्रा – विक्री आणि विपणन म्हणाले की, “एअर कुलिंग व्यवसायाचा फायदा समजावून सांगणे हे या कॅम्पेनचे उद्देश आहे. हे उत्पादन वृद्धी आणि नफ्यासाठी कसे काम करते ते देखील अधोरेखित करण्यात आले आहे. आमचे थंड हवा देणारे उत्पादन पर्याय केवळ शॉप फ्लोअर कर्मचारी वर्गासाठी नसून ते त्या पलीकडचा आल्हाददायक कुलींग अनुभव देतात. त्यांच्याकडे उत्पादनक्षमता, वाढीव कार्यशीलता, आरोग्य सुरक्षा, खर्च होणारा वेळ कमी करणे, टर्नआऊट सुधारित वेळ या घटकांत परिवर्तन आणण्याची क्षमता आहे. त्यामुळे व्यवसायाला अधिक नफा कमवायला मदत होते.”
सिन्फनी लार्ज स्पेस वेंटी-कुलिंग हा एअर-कुलिंग आणि हवा खेळती ठेवणारा (वेंटीलेशन) अभिनव संयोग आहे, कोणत्याही एअर कंडीशनरच्या तुलनेत हा 90% वीज वाचवतो. मोठ्या स्वरूपाच्या जागांसाठी खास करून तयार
करण्यात आलेला हा पर्यावरण-स्नेही पर्याय आहे. या माध्यमातून, भव्य कार्यालयीन ठिकाणी उत्पादनक्षमता आणि फायद्याला साह्य करणारी आल्हाददायी हवेचे वातावरण उपलब्ध करून देण्याचा सिन्फनी लिमिटेडचा प्रयत्न आहे. “अज्ञान आणि उदासीनता या दोन प्रमुख कारणांपायी व्यावसायिक आणि औद्योगिक कार्यालयीन ठिकाणी आरामदायक एअर कुलिंग पर्याय स्वीकारले जात नाहीत. या कॅम्पेनचे उद्दिष्ट वेंटी-कुलिंग फायद्याचा प्रचार करण्याचा आहे. ही उत्पादने वापरल्यास व्यवसायावर सकारात्मक परिणाम होतो हे जाहिरातीमधून पटवून देण्यात आले आहे,” असे राजीव सबनीस, संस्थापक ब्रेव्ह (क्रिएटीव्ह एजन्सी) यांनी सांगितले.
हे एअर कुलिंग पर्याय अत्यंत अल्प खर्चात काम करतात. तसेच विक्री दालने, शाळा, रुग्णालये, घरांसारख्या मोठ्या जागांमध्ये वापरास उपयुक्त ठरतात हे दर्शवणारे कॅम्पेन तयार करण्याची सिन्फनीची योजना आहे.
Comments
Post a Comment