ईबिक्स ट्रॅव्हलने ट्रॅव्हल कंपन्यांशी केले धोरणात्मक विक्री करार
ईबिक्सकॅशची VIA.COM उत्पादने मलेशिया आणि सौदी अरेबिया या देशांमध्ये वितरित करण्यासाठी ईबिक्स ट्रॅव्हलने या देशांतील ट्रॅव्हल कंपन्यांशी केले धोरणात्मक विक्री करार
नोएडा, भारत आणि जॉन्स क्रीक, जीए - 24 जानेवारी 2022 - ईबिक्सकॅश प्रायव्हेट लिमिटेडच्या ईबिक्सकॅश ट्रॅव्हल डिव्हिजनने त्यांची via.com ट्रॅव्हल उत्पादने वितरित करण्यासाठी मलेशियातील युनिव्हर्सल ट्रॅव्हल अँड हॉलिडेज (युनिव्हर्सल) आणि सौदी अरेबियातील अरजा ट्रॅव्हल अँड टुरिझम (अरजा) या दोन प्रतिष्ठित ट्रॅव्हल होलसेलर्सशी धोरणात्मक विक्री करार केल्याची घोषणा केली.
युनिव्हर्सलशी केलेल्या करारानुसार ईबिक्सकॅशचे ऑनलाइन ट्रॅव्हल पोर्टल असलेल्या Via.comने via.com ट्रॅव्हल बुकिंग प्लॅटफॉर्मवरून त्यांची एअरलाइन इन्व्हेंटरी मलेशियातील इतर एजंटना वितरित करण्यासाठी युनिव्हर्सलची मलेशियामध्ये होलसेल जनरल सेल्स एजंट म्हणून नियुक्ती केली आहे. विमानाची तिकिटे via.com कडून थेट खरेदी करण्याची इच्छा असलेल्या मलेशियातील ट्रॅव्हल एजंट्ससाठी हा व्यवहार एकदम सुलभ होऊन जाईल. कारण हे व्यवहार चीन व आशियातील इतर भागांमधील एजंट्सकडे न जाता केवळ मलेशियातच होतील. अशा प्रकारचे व्यवहार मलेशियात बहुधा चीन वा आशियातील इतर भागांमधील एजंट्सकडून होत होते. हे सर्व एजंट्स आता एअरलाइन इन्व्हेंटरी थेट युनिव्हर्सल हॉलिडेजकडून स्थानिक मलेशियन चलनात खरेदी करू शकतील. यासाठी त्यांना आंतरराष्ट्रीय व्यवहार शुल्क द्यावे लागणार नाही.
किंगडम ऑफ सौदी अरेबियामधील अरजाशी केलेल्या दुसऱ्या करारांतर्गत ईबिक्सकॅशच्या via.com या ऑनलाइन ट्रॅव्हल पोर्टलने सौदी अरेबियामध्ये होलसेल जनरल सेल्स एजंट (जीएसए) म्हणून अरजाची नियुक्ती केली आहे. या अंतर्गत via.com वर उपलब्ध असलेली फ्लाइट्स, हॉटेल आणि हॉलिडेज इन्व्हेंटरी via.com ट्रॅव्हल बुकिंग प्लॅटफॉर्मचा वापर करून सौदी अरेबिया, आखाती देशांतील बी2बी एजंट्सच्या विस्तृत नेटवर्कना वितरित करता येईल.
अरजा ट्रॅव्हल अँड टुरिझमचे मुख्य कार्यालय अल-खोबारमध्ये असून दम्मान, रियाध आणि जेद्दाहमध्ये त्यांची कार्यालये आहेत. गेल्या 30+ वर्षांच्या कालावधीत सौदी बाजारपेठेत कॉर्पोरेट व रिटेल ट्रॅव्हल बिझनेसमध्ये प्रतिष्ठित ट्रॅव्हल एजंट म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली आहे. सौदी अरेबियामधील प्रसिद्ध अल्माजदुई ग्रुपचा भाग असलेले अरजा हे गो फर्स्ट एअरलाइन्स (भारतातील कमी खर्चातील विमानसेवा), सलाम एअर (ओमान येथील एलसीसी) आणि किंगडम ऑफ सौदी अरेबियामधील जझीरा एअरवेज (कुवैत येथील एलसीसी) यांच्यासाठी यशस्वी जीएसए आहे.
अरजाचे महाव्यवस्थापक सय्यद अल्तमाश म्हणाले, “दोन दशकांहून अधिक काळ ट्रॅव्हल बिझनेसमध्ये कार्यरत असताना आमच्या लक्षात आले की, बी2बी बाजारपेठेत मोठी संधी आहे आणि म्हणून आम्ही ईबिक्सकॅशसह केलेल्या (via.com) भागीदारीकडून आम्हाला खूप अपेक्षा आहे, ज्यात हॉलिडेज, बिझनेस, मौजमजा आणि ग्रुप टूरचा समावेश आहे. Via.comची उत्पादने मार्केट करण्यासाठी संपूर्ण किंगडममध्ये आपले कौशल्य वापरण्याचा आणि नजीकच्या भविष्यकाळात याला यशस्वी करण्याचा अरजाचा मानस आहे.”
“मलेशियामध्ये आम्हाला या भागीदारीने उपलब्ध झालेल्या संधीमुळे आम्ही अत्यंत उत्साहात आहोत. via.com आम्हाला बी2बी ऑनलाइन ट्रॅव्हल बुकिंग प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देत आहे. ‘पे पर ट्रान्झॅक्शन’च्या (प्रति व्यवहार पेमेंट) आधारे एकाच प्लॅटफॉर्मवर कमी खर्चातील विमासेवा आणि पूर्ण क्षमतेतील (फुल-फ्लेजेड) विमानसेवांसाठी इन्व्हेंटरी उपलब्ध करून देणार आहेत.”, असे युनिव्हर्सल हॉलिडेजच्या संस्थापक आणि सीईओ झहिरा ताहिर म्हणाल्या. “आम्ही एक विशेष सेल्स टीम नियुक्त करण्याच्या प्रक्रियेत आहोत आणि चिनी नववर्षानंतर क्वालालंपूर, पेनांग, जोहोर, कोटा किनाबालू आणि कुसिंग येथील एजंट्ससाठी रोड शो व उत्पादन सादरीकरण करण्याची आमची योजना आहे.”
ईबिक्सकॅश ट्रॅव्हल अँड हॉलिडेचे व्यवस्थापकीय संचालक नवीन कुंडू म्हणाले, “आशियातील सर्वात मोठा व वेगाने वाढणारा बी2बी ट्रॅव्हल प्लॅटफॉर्म होणे हे आमचे व्हिजन आहे. मलेशिया आणि किंगडम ऑफ सौदी अरेबियामधील दोन बळकट ट्रॅव्हल भागीदारांची नियुक्ती करताना आणि भारत, इंडोनेशिया, फिलिपाइन्स, सिंगापूर आणि दुबई या व्यतिरिक्त आशियातील इतर देशांमध्ये विस्तारीकरण करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. ट्रॅव्हल आणि टुरिझम क्षेत्रात पुन्हा एकदा सक्रिय झाले आहे आणि या भागीदाऱ्यांमुळे येत्या दिवसांमध्ये आमच्या ट्रॅव्हल बिझनेसमध्ये अपेक्षित ऑरगॅनिक वाढीमुळे (आउटपुट वाढवून आणि अंतर्गत विक्री वाढवून कंपनी करत असलेली वाढ) भर पडेल.”
Comments
Post a Comment