अपुऱ्या स्तनपानेच्या समस्येसाठी निओलॅक्टा लाइफसायन्सेसची १०० टक्के मानवी दूध उत्पादने
अपुऱ्या स्तनपानेच्या समस्येसाठी निओलॅक्टा लाइफसायन्सेसची १०० टक्के मानवी दूध उत्पादने
मुंबई २८ जानेवारी २०२२: मुलांना जन्म दिल्यानंतर आईच्या दुधाची कमतरता किंवा अपुरेपणा असतानाही पालक आता त्यांच्या बाळासाठी आईच्या दुधातील पोषण घटक पुरवू शकतात. अपुरे स्तनपान करण्याच्या समस्येला तोंड देत असलेल्या नवीन मातांसाठी ‘निओलॅक्टा लाइफसायन्सेस’ १०० टक्के मानवी दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन करीत आहे. त्यामुळे ही उत्पादने मुल आणि त्यांच्या मातांसाठी वरदान ठरत आहेत.
अशी अनेक प्रकरणे आहेत की माता एकतर पुरेसे स्तन दूध तयार करू शकत नाही किंवा स्तनपान करण्यास फारच अस्वस्थ असतात. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ) मातेच्या स्वतःच्या दुधाच्या अनुपस्थितीत पुढील सर्वोत्तम पर्याय म्हणून पाश्चराइज्ड दात्यांच्या मानवी दुधाची शिफारस करते. निओलॅक्टाच्या १०० टक्के मानवी दुधापासून बनवलेल्या उत्पादनांचा आजपर्यंत ३० हजारपेक्षा जास्त बाळांना फायदा झाला आहे. या उत्पादनांवर प्रोप्रायटरी तंत्रज्ञानाद्वारे प्रक्रिया केली जाते. ज्यामुळे भारत अशा उत्पादनांमध्ये प्रवेश मिळवणाऱ्या जागतिक स्तरावरील मोजक्या राष्ट्रांपैकी एक आहे.
अर्जुन पुरस्कार विजेती स्क्वॅश खेळाडू दीपिका पल्लीकल क्रिकेटपटू दिनेश कार्तिक यांना त्यांच्या जुळ्या बाळांना स्तनपान करण्यात अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे दीपिका यांना वाटत होते की, तिच्या बाळांना मानवी दुधाशिवाय दुसरे काहीही मिळू नये, कारण तिला हे माहिती होते की अर्भक फॉर्म्युलाद्वारे कृत्रिम आहार मानवी दुधाच्या पौष्टिक मूल्याशी कधीही जुळू शकत नाही. मग तिच्या डॉक्टरांनी सुचवले की, तिने निओलॅक्टा लाइफसायन्सेसचे पाश्चराइज्ड दाता मानवी दूध वापरावे जेणेकरून बाळांना आवश्यक असलेले पोषण मिळेल. .
याबाबत दीपिका पल्लीकल आणि दिनेश कार्तिक म्हणाले की ज्यांनी आम्हाला निओलॅक्टा लाइफसायन्सेसच्या स्क्रीनिंग आणि पाश्चराइज्ड मानवी दुधाच्या उत्पादनांसाठी मार्गदर्शन केले त्या डॉक्टरांचे आम्ही आभारी आहोत. पोषणाची योग्य निवड आरोग्य आणि कल्याण घडवण्यात महत्त्वाची भूमिका कशी बजावते याची जाणीव आम्हाला आहे. त्यामुळे आमच्या जुळ्या मुलांसाठी निओलॅक्टा पाश्चराइज्ड ह्युमन ब्रेस्ट मिल्क वापरल्याबद्दल आम्हाला खूप आनंद झाला आहे. निओलॅक्टाच्या उत्पादनांमुळे आमच्या बाळांना योग्य पोषण मिळू दिले आहे. आम्हाला आशा आहे की अधिक पालक त्यांच्या लहान मुलांसाठी १०० टक्के मानवी दुधाचा आहार सुनिश्चित करण्याच्या फायद्यांबद्दल संवेदनशील होतील.
निओलॅक्टा लाइफसायन्सेसचे मुख्य वैज्ञानिक अधिकारी डॉ. विक्रम रेड्डी म्हणाले की, बालकांच्या पौष्टिक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि अपर्याप्त स्तनपान करणाऱ्या नवीन मातांना मदत करण्यासाठी आणि पाश्चराइज्ड दात्यांच्या दुधाचा वापर करून निओलॅक्टा उत्पादने विकसित केली गेले आहेत.
Comments
Post a Comment