रिलायन्स जनरल इन्श्युरन्सचा प्रधान मंत्री फसल बिमा योजनेच्या “मेरी पॉलिसी मेरे हाथ”या पॉलिसी वितरण अभियानात सहभाग
रिलायन्स जनरल इन्श्युरन्सचा प्रधान मंत्री फसल बिमा योजनेच्या “मेरी पॉलिसी मेरे हाथ”या पॉलिसी वितरण अभियानात सहभाग
भारतभर घरपोच पिक विमा पॉलिसी वितरण करण्यात येणार
मुंबई, 26 फेब्रुवारी 2022 : रिलायन्स जनरल इन्श्युरन्स कंपनी लि. (आरजीआयसीएल) ही भारतातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी खासगी जनरल इन्श्युरन्स कंपनी आहे. ‘आझादी का अमृत महोत्सव कॅम्पेन - इंडिया @75’ अंतर्गत प्रधान मंत्री फसल बिमा योजनेचे भारतभर घरपोच पिक विमा पॉलिसी वितरण महाअभियान- “मेरी पॉलिसी मेरे हाथ” यामध्ये सहभागी होत असल्याचे या कंपनीने जाहीर केले आहे. कंपनीने या उपक्रमाला पूर्ण पाठिंबा दिला आहे आणि शेतकऱ्यांसाठी अधिक चांगली आर्थिक परिसंस्था उभारण्यासाठी भूमिका निभावण्याचा या कंपनीचा निर्धार आहे.
हा उपक्रम परिणामकारकपणे राबविण्यासाठी पीएमएफबीवायअंतर्गत रिलायन्स जनरल इन्श्युरन्समध्ये नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या सध्याच्या पिक विमा पॉलिसीबद्दल माहिती देण्यासाठी ग्राम पंचायत/गाव पातळीवर खास शिबिरे स्थापन केली आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विम्याची रक्कम, विमा संरक्षण दिली जाणारी पिके आणि प्रीमिअमची रक्कम अशी त्यांच्या पिक विम्याबद्दलची थेट माहिती मिळणार आहे. कंपनीतर्फे शेतकऱ्यांना त्यांच्या पॉलिसीची प्रत्यक्ष कागदपत्रेही वितरित करण्यात येणार आहेत त्यामुळे क्लेम सेटलमेंट विना-अडथळा करणे सोपे होईल. त्याचप्रमाणे या उपक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांचा अभिप्राय, शंका आणि तक्रारी थेट विमा कंपनीला सांगण्यासाठी एक व्यासपीठ मिळेल.
या उपक्रमावर प्रतिक्रिया देताना रिलायन्स जनरल इन्श्युरन्सचे सीईओ राकेश जैन म्हणाले, “आम्ही या उपक्रमाचे स्वागत करतो आणि या असामान्य अभियानासाठी आमचे विस्तृत सहकार्य देत आहोत. शेती व्यवसाय आपल्या लोकसंख्येच्या सुमारे 60% लोकांना उपजीविका पुरवतो. पण नैसर्गिक आपत्तीची जोखीम, पावसावर अवलंबून असलेली मोठ्या प्रमाणावरील शेती, शेतीला लागणारी कीड व रोग यामुळे शेतीक्षेत्र हे अत्यंत अस्थिर क्षेत्र झाले आहे. त्यामुळे अशा अनपेक्षित घटनांपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी प्रधान मंत्री फसल बिमा योजना सुरू करण्यात आली. ‘मेरी पॉलिसी मेर हाथ’या उपक्रमाच्या माध्यमातून सरकारच्या या प्रयत्नांचे एक पाऊल पुढे टाकण्यात आले आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना पिकविम्याबद्दल जागरुक करण्यात येत आहे आणि शेतकऱ्यांना विमा पॉलिसी घरपोच देण्यात येत आहे. यामुळे शेतकरी आणि विमा कंपन्यांमधील थेट संवादात वाढ होईल आणि विमा कंपन्या व पीएमएफबीवाय योजनेवरील त्यांचा विश्वास वाढेल.
पिक विम्याबद्दल शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी कंपनी स्थानिक भाषांमध्ये एफएक्यू (वारंवार विचारले जाणारे प्रश्न) पत्रक वितरित करेल.
Comments
Post a Comment