गुंतवणूकदारांनी गुंतवणूकीच्या वेळी टाळाव्यात अशा प्रमुख चुका

 गुंतवणूकदारांनी गुंतवणूकीच्या वेळी टाळाव्यात अशा प्रमुख चुका


अधिकाधिक पहिल्यांदाच गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार बाजारपेठेमध्ये सामील होत आहेत, याचा अर्थ असा की अधिकाधिक लोकांना भांडवल बाजारपेठेतील जोखीमा व चुकांबाबत जागरूक करण्याची गरज आहे. ऑफ-द-कफ गुंतवणुकांमुळे संपत्ती निर्मितीची संपूर्ण प्रक्रिया ठप्प होऊ शकते. तुमच्या आर्थिक फायद्यात भर पडण्याऐवजी पैशांचे नुकसान होऊ शकते. प्रत्येक गुंतवणुकदाराची जोखीम घेण्याची क्षमता वेगळी असते, त्यामुळे तुम्ही चांगल्या परताव्यासाठी सुव्यवस्थित धोरण अवलंबले पाहिजे. संभाव्य चुका अगोदरच ठरवून घेतल्यास अयोग्य गुंतवणुकीची शक्यता कमी होऊ शकते. गुंतवणूकदारांनी टाळाव्यात अशा काही प्रमुख चुकांबद्दल सांगताहेत एंजेल वन लिमिटेडचे इक्विटी स्ट्रॅटजिस्ट श्री ज्योती रॉय.

योग्यप्रकारे माहिती जाणून घेतल्याशिवाय गुंतवणूक करणे: बहुतेक गुंतवणूकदार गुंतवणूकीचे निर्णय घेण्यासाठी वेळ देण्यासोबत सखोलपणे माहिती जाणून घेतात. पण सर्वच करतात असे नाही. प्रथमच गुंतवणूक करणारे सहसा त्यांचा प्रवास सुरू करण्यास खूप उत्सुक असतात. नियोजन आणि संशोधनाच्या अभावामुळे घाईघाईने निर्णय घेतल्यास नुकसानही होऊ शकते. कोणतेही गुंतवणुकीचे निर्णय घेण्यापूर्वी, कंपनीचे व्यवसाय मॉडेल व मागील कामगिरीचे सखोल विश्लेषण व माहिती जाणून घेणे महत्त्वाचे आहे. ज्यामुळे तुम्हाला व्यवसायामध्ये भरभराट होत आहे की नाही हे समजेल आणि गुंतवणूकीसंदर्भात निर्णय घेणे सुलभ होईल. तुम्हाला त्यांच्या विकासाच्या क्षमतेबद्दल देखील सखोल माहिती मिळेल.

ट्रेण्ड्ससोबत जाताना: अनेकदा गुंतवणूकदार बाजारपेठेतील ट्रेण्डिंग स्टॉक्सकडे प्रभावित होतात. तसेच सोशल मीडियावर वैयक्तिक पूर्वाग्रह निर्माण होत आताच्या व भावी विशिष्ट उद्योगक्षेत्र किंवा स्टॉकप्रती कल वाढतो. योग्य संशोधन केल्याशिवाय फक्त ऐकलेल्या गोष्टींच्या आधारावर गुंतवणूक करण्याचा निर्णय अयोग्य ठरू शकतो. प्रत्येक ट्रेण्डिंग माहितीसंदर्भात संसाधन ओळखण्याचा प्रयत्न करा आणि योग्य गुंतवणूक निर्णय घेण्यासाठी स्वत:हून संशोधन करा.

गुंतवणूक पोर्टफोलिओंची विभागणी न करणे: बहुतेक नवीन गुंतवणूकदारांकडून दुर्लक्ष केली जाणारी सर्वात मोठी बाब म्‍हणजे गुंतवणूक पोर्टफोलिओची विभागणी. बहुतेक अनुभवी गुंतवणूकदार विविध मालमत्तावर्गांमध्ये त्यांच्या फंड्सचे वितरण करतात, तर बाजारपेठेमध्ये नवीनच असलेले गुंतवणूकदार असे करण्यास अयशस्वी ठरतात. पण आर्थिक बाजारपेठांमध्ये वैविध्यतेच्या सिद्धांताशी जुळून राहणे नेहमीच उत्तम आहे. वैविध्यपूर्ण पोर्टपोलिओ नुकसानांच्या जोखीम कमी होण्यामध्ये मदत करतो. उदाहरणार्थ, तुमच्या एखाद्या गुंतवणूकीमध्ये नुकसान झाले तर त्याचा तुमच्या संपूर्ण पोर्टफोलिओवर परिणाम होत नाही. म्हणून एकाच कंपनीचे स्टॉक्स खरेदी करण्याऐवजी वेगवेगळ्या कंपन्या किंवा मालमत्तावर्गांमध्ये गुंतवणूक करत तुमच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणण्याचा प्रयत्न करा.

त्वरित निष्पत्तींची अपेक्षा करणे: आजच्या गतीशील डिजिटली सक्षम जगामध्ये बहुतेक लोक गुंतवणूकांमधून त्वरित परतावे मिळण्याची अपेक्षा करतात. आणि अल्पावधीत काहीच वाढ दिसली नाही तर ते त्यामधून माघार घेतात. पण आर्थिक बाजारपेठांमध्ये याचा काहीच अर्थ नाही. गुंतवणूक ही क्रमिक प्रक्रिया आहे आणि कधी-कधी कोणतेही अर्थपूर्ण परतावे मिळण्यासाठी अपेक्षित काळापेक्षाही अधिक वेळ लागतो. स्टॉक्समधील वाढ कंपनीच्या व्यवसाय कामगिरीवर अवलंबून असते आणि म्हणून आवश्यक परतावे दिसण्यासाठी अपेक्षितपेक्षा अधिक वेळ लागू शकतो. म्हणूनच, गुंतवणूक करताना वास्तववादी अपेक्षा असणे महत्त्वाचे आहे.

गुंतवणूक ध्येयांबाबत संदिग्ध असणे: अंतिम ध्येय स्थापित केल्याशिवाय गुंतवणूकीला सुरूवात करणे निश्चितच चुकीचा निर्णय ठरू शकतो. यामुळे तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होण्याऐवजी सर्व गुंतवणूक कमी होऊ शकते. म्हणून तुम्ही गुंतवणूक करत असाल किंवा आर्थिक बाजारपेठेत गुंतवणूक सुरू करण्याचे नियोजन करत असाल तर पहिली पायरी आर्थिक ध्येय स्थापित करण्याबाबत आहे, जे तुम्ही विशिष्ट कालावधीमध्ये संपादित करू इच्छिता. पुढील पायरी म्हणजे जोखीम सहनशीलता निश्चित करणे. तुम्ही संपादित करावयाचे ध्येय स्थापित केल्यानंतर तुम्हाला कोणत्या मालमत्तावर्गामध्ये गुंतवणूक करावी याबाबत उत्तमप्रकारे नियोजन करण्यास मदत होईल. उदाहरणार्थ, इक्विटीजमध्ये अल्पकाळासाठी उच्च अस्थिरता असते, पण दीर्घकाळापर्यंत सुरू ठेवल्यास इतर मालमत्तावर्गांना मागे टाकू शकतात. म्हणूनच अधिकतम परतावे मिळवण्यासाठी गुंतवणूक ध्येये स्थापित करण्याची खात्री घ्या.

थोडक्यात, चुका करणे हा प्रत्येक गुंतवणूकदाराच्या गुंतवणूक प्रवासाचा एक भाग आहे. पण त्या चुका काय आहेत हे जाणून घेणे व टाळणे हा नुकसान कमी करण्याचा आणि लाभ मिळण्याच्या शक्यतांमध्ये वाढ होण्याचा उत्तम मार्ग आहे.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24