कॅप्री ग्लोबल हाउसिंग फायनान्स लिमिटेड आणि एसबीआय यांनी गृहकर्जांसाठीच्या संयुक्त-कर्जपुरवठा करारावर केली स्वाक्षरी

कॅप्री ग्लोबल हाउसिंग फायनान्स लिमिटेड आणि एसबीआय यांनी गृहकर्जांसाठीच्या संयुक्त-कर्जपुरवठा करारावर केली स्वाक्षरी
 
मुंबई: परवडणाऱ्या घरांसाठी वित्तसहाय्य देण्यावर केंद्रीत असलेली कॅप्री ग्लोबल हाउसिंग फायनान्स लिमिटेड ही कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडच्या पूर्ण मालकीची असलेली उपकंपनी आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक बँकेने संयुक्त-कर्जपुरवठा करार केला आहे. कॅप्री ग्लोबल हाउसिंग फायनान्स लि. या कंपनीच्या भारतभरातील 110 टचपॉइंट्सच्या माध्यमातून वाजवी व्याजदराने कर्ज देऊन गृहखरेदीदारांना सक्षम करण्यासाठी प्रायॉरिटिसेक्टर अंतर्गत गृहकर्ज उपलब्ध करून देणे हे या सहयोगाचे उद्दिष्ट आहे. या करारांतर्गत मार्च 2022 पासून कर्जवाटप सुरू होणार आहे.
 
कॅप्री ग्लोबल हाउसिंग फायनान्स लि. ही कंपनी 10 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधील विस्तृत नेटवर्कच्या माध्यमातून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने घालून दिलेल्या संयुक्त-कर्जपुरवठा चौकटीशी सुसंगत राहत एसबीआयशी परस्परमान्य निकषांनुसार गृह कर्जाच्या अर्जावर प्रक्रिया करणार आहे. या लोनच्या लाइफ सायकलदरम्यान या भागीदारीअंतर्गत लोन अकाउंट्ससाठी सर्व्हिसिंग एजंट म्हणून कॅप्री ग्लोबल हाउसिंग फायनान्स लि. काम पहाणार आहे आणि त्यांच्या वहिखात्यात 20% कर्ज राखून ठेवेल तर एसबीआय 80% कर्ज राखून ठेवेल. या संयुक्त-कर्जसुविधेने कॅप्री ग्लोबल हाउसिंग फायनान्स लि.चे कामकाज व्यवस्थापनातील कौशल्य आणि एसबीआयचा कमी-खर्चातील फंड यांची सांगड घातली जाऊन कर्ज घेण्यास इच्छुक असलेल्यांना परवडणाऱ्या दरात कर्जसुविधा उपलब्ध होणार आहे.
 
एसबीआयचे अध्यक्ष श्री. दिनेश खारा म्हणाले, “संयुक्त-कर्जपुरवठा कार्यक्रमांतर्गत एचएफसीशी हातमिळवणी केल्याचा आम्हाला आनंद आहे. कर्जसुविधा न मिळालेल्या आणि या सुविधा कमी प्रमाणात मिळालेल्या गृहकर्जदारांपर्यंत पोहोचण्याचे आमचे उद्दिष्ट असून या सहयोगामुळे आमचे वितरण नेटवर्क वाढणार आहे. भारतातील छोट्या गृहखरेदीदारांसाठी  परिणामकारक व परवडणाऱ्या दरांमध्ये कर्ज उपलब्ध करून देण्याचा वेग वाढविण्याच्या आमच्या प्रतिबद्धतेशी अशा भागीदाऱ्या सुसंगत आहेत आणि ‘2024 पर्यंत सर्वांसाठी घरे’ या व्हिजनला या भागीदाऱ्यांमुळे योगदान देण्यात येते.”
 
कॅप्री ग्लोबल कॅपिटल लि.चे व्यवस्थापकीय संचालक श्री. राजेश शर्मा म्हणाले, “भारतातील सर्वात मोठ्या बँकेशी हातमिळवणी केल्याचा आम्हाला आनंद आहे. ही भागीदारी दोन्ही अस्थापनांची लाभप्रदता वाढविण्यास मदत करेल आणि दोन्ही अस्थापनांच्या गृह कर्ज पोर्टफोलियो विस्तारेल. त्याचप्रमाणे दोन्ही वित्तदात्यांना श्रेणी 2 व श्रेणी 3 शहरांमध्ये स्पर्धात्मक दराने कर्जसुविधा उपलब्ध करून देत विस्तारीकरण करता येईल. या हातमिळवणीमुळे गृह कर्ज घेऊ इच्छिणाऱ्यांना कार्यक्षम व अखंडित अनुभव उपलब्ध करून देण्यासाठी दोन्ही अस्थापनांच्या तुलनात्मक बलस्थानांचा लाभ घेता येईल. महत्त्वाकांक्षी भारतीयांना कर्ज उपलब्ध करून देत घरमालकीला आखार देण्यात कॅप्री ग्लोबल हाउसिंग फायनान्स लि. स्थापनेपासून आघाडीवर राहिली आहे. देशातील सर्वात मोठ्या कर्जपुरवठादारासोबत सहयोग केल्यामुळे, पतपात्रता असलेल्या प्रत्येक कर्जदारासाठी गृहकर्जाच्या अधिक संधी खुल्या होतील हा आम्हाला विश्वास आहे आणि घरमालकीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बदल घडविणारा घटक म्हणून काम करेल.
 
आर्थिक सर्वसमावेशकता साध्य करण्यासाठी कॅप्री ग्लोबल हाउसिंग फायनान्स लि.तर्फे वंचित गटातील कर्जदारांना कर्जसुविधा उपलब्ध करून देण्यात येते, जेणेकरून आर्थिक सर्वसमावेशकतेला चालना मिळेल आणि आर्थिक सबलीकरणाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर सामाजिक परिणाम साध्य करता येईल. 31 डिसेंबर 2021 पर्यंत कंपनीने 17,500+ ग्राहकांना गृह कर्ज उपलब्ध करून दिले आहे आणि त्यांना घरमालकीचे स्वप्न पूर्ण करण्यास मदत केली आहे.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24