मुंबईत 1 मे 2022 रोजी जागतिक सारस्वत परिषदेचे आयोजन
मुंबईत 1 मे 2022 रोजी जागतिक सारस्वत परिषदेचे आयोजन
विश्व सारस्वत फेडरेशन (व्हीएसएफ) यांच्यातर्फे ऑल इंडिया सारस्वत कल्चरल ऑर्गनायझेशन (एआयएससीओ) आणि जीएसबी सभा नवी मुंबई यांच्या सहयोगाने नवी मुंबईतील वाशी येथे 1 मे 2022 रोजी कॉन्फ्लुअन्स ऑफ सारस्वत वर्ल्डवाइड (जगभरातील सारस्वतांचा संगम) या एक दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. जगभरातील सारस्वतांना जोडण्यासाठी व एकत्र आणण्यासाठी दर वर्षी या परिषदेचे आयोजन करण्यात येते. सारस्वत हे वैदिक संस्कृतीचे जतन करून ती हजारो वर्षांपासून अखंडपणे चालू ठेवण्यासाठी ओळखले जातात.
श्री काशी मठ संस्थान, श्री गोकर्ण पार्थगली जीवोत्तम मठ, श्री गौडापादाचार्य कैवल्यमठ आणि श्री चित्रपूर मठ या चार सारस्वत मठांच्या मठाधिपतींच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम होत आहे. या वर्षी या परिषदेसाठी सुमारे 1500 लोक उपस्थित असतील, असा अंदाज आहे आणि या कार्यक्रमासाठी 1200 अभ्यागतांनी आधीच नोंदणी केली आहे. सारस्वत म्हणजे ऋग्वेद काळात सरस्वती नदीच्या काठी राहणाऱ्या सारस्वत मुनींचे वंशज होत.
Comments
Post a Comment