एयु बँकेकडून कामकाजाची 5 वर्षे पूर्ण, 1:1 बोनस समभाग जारी करण्यात आल्याची घोषणा तसेच प्रती समभाग ₹. 1/- लाभांश घोषित
एयु बँकेकडून कामकाजाची 5 वर्षे पूर्ण, 1:1 बोनस समभाग जारी करण्यात आल्याची घोषणा तसेच प्रती समभाग ₹. 1/- लाभांश घोषित
आगामी काळासाठी वार्षिक ताळेबंद सुरक्षित करत एकंदर वेगवान कामगिरीला चालना
· नफा – आर्थिक वर्ष 22 च्या 4 थ्या तिमाहीची वजावटी पूर्वीची एकूण 105 % साल-दरसाल ₹ 346 कोटीएवढी; पूर्ण वर्ष पीएटी आर्थिक वर्ष 22 ₹ 1,130 कोटी; आर्थिक वर्ष 22 च्या 4 थ्या तिमाही/ आर्थिक वर्ष 22 करिता 2.2%/1.9% आणि आरओई 18.9%/16.4%
· बोनस समभाग जारी – आमच्या रिटेल समभागधारकांना लाभ मिळवून देण्याचे उद्दिष्ट ठेवत 5 वर्षांची बँकिंग कामगिरी साजरी करण्यासाठी, संचालक मंडळाकडून च्या 1:1 प्रमाणात बोनस इक्विटी समभाग जारी करण्याची शिफारस
· लाभांश – आर्थिक वर्ष 22 करिता संचालक मंडळाने प्रती समभाग ₹ 1/- (बोनसपूर्व प्रस्ताव किंवा मार्च 2022 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी ₹ 0.50/ प्रती समभाग (पूर्व-बोनस प्रस्ताव) देण्याची शिफारस केली आहे
· स्वतंत्र संचालक नियुक्ती – श्री कमलेश एस. विकमसे यांची स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती करत बँकेकडून सदस्य संख्या 10 पर्यंत वाढवत (8 स्वतंत्र) अतिरिक्त सक्षमीकरण
· मालमत्ता गुणवत्ता सुधारणेपोटी अतिरिक्त वजावट पश्चात एनपीए 1.98% पर्यंत कमी, तर वजावट पूर्व एनपीए 0.50%
· तरतूदविषयक धोरण आणखी बळकट करण्याचे उद्दिष्ट ठेवत चालू आधारावर सर्वाधिक एकगठ्ठा रक्कम उभारणे, सर्वोत्तम बँक पार्श्वभूमीवर तरतूद समावेश प्रमाण (प्रोव्हीजन कव्हरेज रेशीयो – पीसीआर) 75%
· नैमित्तिक तरतूद आता ₹ 157 कोटी, 31 डिसेंबर 21 रोजी ₹ 300 कोटी, ₹. 143 कोटींचा वापर तरतूदविषयक धोरणात बदल झाल्याने वाढीव वृद्धी तरतुदीसाठी
· आर्थिक वर्ष 22 च्या 4 थ्या तिमाही नफा-तोट्यातून ₹. 41 कोटींची तरंगती तरतूद निर्मिती
· जमा रकमेचा ₹ 50,000 कोटींचा टप्पा पार होऊन ₹ 52,585 कोटी शिलकीत, साल-दरसाल 46% पटीने वाढ तर तिमाही ते 19% वृद्धी
· सर्वाधिक तिमाही वाटप ₹ 10,295 कोटींचे (+39% साल-दरसाल)
· बँकेकडून 919 पर्यंत टचपॉइंट विस्तार साधत 39 नवीन टचपॉइंट खुले
· केअर क्रमवारी अद्ययावत करत बँकेकडून दीर्घकालीन क्रमवारी एए/स्टेबल आणि आमची अल्पकालीन क्रमवारी ए1+ वर कायम
मुंबई/,26 एप्रिल, 2022: एयु स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडच्या आजच्या संचालक सदस्य बैठकीत 31 मार्च 2022 रोजी संपलेल्या तिमाही आणि वार्षिक वित्तीय निकालांकरिता परवानगी मंजूर करण्यात आली.
कार्यकारी सारांश
एकंदर व्यवसाय वातावरणात सातत्याने सुधारणा होत असल्याने एयु बँकेकरिता सुदृढ वाटपाची नोंद झाली.
ठेवी ₹ 35,979 कोटींवरून वार्षिक 46% वाढून ₹ 52,585 कोटी झाल्या आहेत, सीएएसए (CASA) गुणोत्तरामध्ये आणखी सुधारणा होऊन ती 23% च्या तुलनेत 37% झाली आहे .आर्थिक वर्ष 22 च्या तिमाहीत, साल-दरसाल निधी-आधारित वाटप 39% नी वर जात ₹ 10,295 कोटींची नोंद झाली. मागच्या वर्षीच्या तुलनेत याच तिमाहीत ₹7,421 कोटींची नोंद झाली होती. वाटपात समाविष्ट ईसीएलजीएस आर्थिक वर्ष 22 च्या 4 थ्या तिमाहीकरिता ₹ 64 कोटी याप्रमाणे राहिला. आर्थिक वर्ष 22 च्या 4 थ्या तिमाहीकरिता निधी-एतर वाटप साल-दरसाल 90% वर जात ₹ 742 कोटीएवढे नोंदवले गेले तर मागील वर्षी याच कालावधीत ते ₹ 391 कोटी असे होते.
बँकेच्या एकूण आगाऊ रकमेत वर्ष-प्रती-वर्ष 32%ची वृद्धी होऊन ती 35,356 कोटींवरून 46,789 कोटींवर गेली. तिमाहातील प्रत्येक महिन्यात सातत्याने 100% पेक्षा जास्त संकलन क्षमतेची जोड त्याला मिळाली. परिणामी, मालमत्तेच्या गुणोत्तरात सातत्याने सुधारणी झाली. एयु 0101, व्हिडिओ बँकिंग, क्रेडीट कार्डस्, युपीआय क्यूआर इ. मुळे डिजिटल सेवांमध्ये बँकेने आपले स्थान बळकट केले आहे आणि सध्या या घटकांना ठोस चालना मिळाल्याचे दिसून येत आहे.
कामगिरीविषयी मत व्यक्त करताना एयु स्मॉल फायनान्स बँकेचे एमडी आणि सीईओ श्री. संजय अगरवाल म्हणाले, “अपवादात्मक अशा आव्हानात्मक परिस्थितीमध्येही एयु बँकने स्मॉल फायनान्स बँक म्हणून 19 एप्रिल 2022 ला 5 वर्षे पूर्ण केल्यावर एक संस्थापक आणि उद्योजक या नात्याने माझ्या मनात समाधानाची, कृतज्ञतेची आणि अभिमानाची भावना आहे. आमचे ग्राहक, गुंतवणूकदार, कर्मचारी आणि इतर भागधारकांनी एयुवर अढळ विश्वास ठेवल्याबद्दल मी त्यांचाही मनापासून आभारी आहे. या आव्हानात्मक काळात भारत सरकार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि त्यांच्या इतर सर्व नियामकांचा पाठींबा आणि त्यांचे मिळालेले मार्गदर्शन यासाठी मी त्यांचे मनापासून आभार मानतो. स्मॉल फायनान्स बँक म्हणून गेल्या 5 वर्षात मिळवलेले यश साजरे करण्याच्या अनुषंगाने आणि आमच्या भागधारकांचे आभार मानण्याकरिता संचालक मंडळाने 1:1 प्रमाणात बोनस समभागांची शिफारस केली आहे तसेच प्रती इक्विटी समभाग ₹. 1/- लाभांश (बोनस-पूर्व प्रस्ताव) किंवा आर्थिक वर्ष 22 करिता प्रती समभाग ₹ 0.50/ (पूर्व-बोनस प्रस्ताव) ची शिफारस करण्यात आली आहे.
सध्याच्या तिमाहीत आमची वित्तीय कामगिरी बरीच बळकट आहे आणि आम्हाला उपलब्ध संधीचा पुरेपूर लाभ घेण्यासाठी आम्ही सुज्ञपणे प्रयत्नशील आहोत, आमची तरतूद-आधारित धोरणे भविष्य संरक्षित करण्यासाठी, आमचे समावेशक प्रमाण वृद्धिंगत करण्याकरिता, तरंगत्या तरतुदीची निर्मिती करणे आणि मंडळ विस्ताराकडे आमचा कल आहे. त्यासोबतच व्यक्ति, डिजीटल मालमत्ता आणि ब्रँड-उभारणी यामुळे आम्हाला ग्राहकाभिमुख, भविष्याच्या दृष्टीने सज्ज बँक म्हणून नाव₹पाला येण्यासाठी मदत झाली. आमच्या महत्त्वाच्या उत्पादन-प्रकारात निर्माण होणाऱ्या मुख्य संधीचा लाभ घेत योग्य मार्गावर असल्याचा विश्वास आम्हाला वाटतो. जगातील भौगोलिक-राजकीय धोके आणि कोविडसंबंधी जोखीमांच्या बाबतीत आम्ही सतर्क आहोत आणि आम्ही अगदी सावधपणे आमचा दृष्टीकोन आशावादी ठेवला आहे.”
===============
Comments
Post a Comment