गोदरेज इंडस्ट्रीजतर्फे गोदरेज कॅपिटल सुरू करण्याची घोषणा
गोदरेज इंडस्ट्रीजतर्फे गोदरेज कॅपिटल सुरू करण्याची घोषणा
• गोदरेज कॅपिटल ही गोदरेज समूहाची वित्तीय सेवा शाखा असून २०२६ पर्यंत ३०,००० कोटी रुपयांचा ताळेबंद तयार करण्याचे उद्दिष्ट.
• ग्राहक विभागांमध्ये विविधता आणणे आणि नवीन व्यवसाय लाइन सुरू करणे यांच्या जोडीला व्यवसाय या आर्थिक वर्षात सहा नवीन शहरांमध्ये आपल्या रिटेल कामकाजाचा विस्तार करेल
• गोदरेज इंडस्ट्रीज त्यांच्या वित्तीय सेवा उपक्रमात १,५०० कोटी रुपये गुंतवण्यासाठी बांधील असून २०२६ पर्यंत एकूण ५,००० कोटी रुपये इक्विटी गुंतवणुकीची आवश्यकता असेल अशी अपेक्षा आहे
.
मुंबई, ११ एप्रिल २०२२: वित्तीय सेवा क्षेत्रातल्या आपल्या आकांक्षा उंचावण्याच्या उद्देशाने गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेड (GIL) ने आज गोदरेज कॅपिटल लिमिटेड (GCL) सादर करत असल्याची घोषणा केली. गोदरेज कॅपिटल लिमिटेड ही गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेडची उपकंपनी आहे आणि गोदरेज हाऊसिंग फायनान्स (एक HFC) आणि गोदरेज फायनान्स लिमिटेड (एक NBFC) साठी होल्डिंग संस्था आहे. जागतिक दर्जाचा किरकोळ वित्तीय सेवा व्यवसाय तयार करण्याच्या अंतिम उद्दिष्टासह आणि २०२६ पर्यंत ३०,००० कोटी रुपयांचा ताळेबंद तयार करण्याच्या नजीकच्या काळात गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेड गोदरेज कॅपिटल लिमिटेडमध्ये १,५०० कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक करण्यासाठी बांधील आहे.
गोदरेज कॅपिटलचे काम सध्या मुंबई, बंगळुरू, दिल्ली एनसीआर, अहमदाबाद आणि पुणे येथे सुरु असून लवकरच जयपूर, चंदीगड, हैदराबाद, चेन्नई, इंदौर आणि सुरत या सहा नवीन शहरांमध्ये कार्यान्वित होईल.
विकासाविषयी बोलताना गोदरेज कॅपिटलचे अध्यक्ष पिरोजशा गोदरेज म्हणाले की, "गोदरेज कॅपिटल गोदरेज समूहाच्या एकूण वाढीचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ ठरेल. आम्ही २०२० मध्ये निवडक भौगोलिक प्रदेशांमध्ये गृहकर्जांसह सुरुवात केली. आमच्या योजनांना ग्राहकांची मजबूत स्वीकृती बघता आम्ही आमच्या वित्तीय सेवा उपक्रमाच्या प्रगतीबद्दल खूप आशावादी आहोत आणि नवीन बाजारपेठांमध्ये प्रवेश करत मुख्य लक्ष्य क्षेत्रे आणि ग्राहक विभागांमध्ये आमची पोहोच वाढवणार आहोत."
कंपनी गृहकर्ज आणि मालमत्तेवर कर्ज (LAP) असलेल्या सुरक्षित कर्जाच्या वाढीवर लक्ष केंद्रित करणे सुरू ठेवेल. जोडीला, व्यवसाय आणि भौगोलिक आकांक्षा पूर्ण करण्यासाठी व्यवसायाने या आर्थिक वर्षात ५०%नी अंदाजे ५०० लोकांपर्यंत टीम वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
गोदरेज कॅपिटलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनीष शाह म्हणाले, "आम्ही डिझाईन युवर ईएमआय आणि डिजीटल पद्धतीने वितरीत केलेले एंड-टू-एंड कॉन्टॅक्टलेस सोल्यूशन्स यासारख्या नाविन्यपूर्ण उत्पादनांद्वारे गोदरेज हाऊसिंग फायनान्स येथे डिजीटल-प्रथम दृष्टीकोन यशस्वीरित्या अंमलात आणला आहे. परवडणारी गृहकर्जे आणि सुरक्षित नसलेल्या कर्जांद्वारे विविध ग्राहक वर्गांपर्यंत आमच्या सेवा ऑफरचा विस्तार करण्यासाठी आणि आमचा ठसा उमटविण्यासाठी यामुळे आम्हाला प्रेरणा मिळाली आहे. पुढील काही वर्षांत गोदरेज कॅपिटल ही नवीन काळातील, आघाडीची रिटेल वित्तीय सेवा संस्था बनविण्याची आमची कल्पना आहे."
गोदरेज कॅपिटल मोठ्या प्रमाणावर कामकाज करण्यासाठी प्रतिभा, तंत्रज्ञान आणि विश्लेषणाद्वारे क्षमता निर्माण करण्यासाठी गुंतवणूक करत असून त्यामुळे व्यवसायाच्या वाढीला चालना मिळेल.
Comments
Post a Comment