कॅनरा बँकेतर्फे मुंबईमध्ये हवाई जाहिरातीचे प्रदर्शन
कॅनरा बँकेतर्फे मुंबईमध्ये हवाई जाहिरातीचे प्रदर्शन
मुंबई, १६ एप्रिल २०२२ : कॅमेरा बँकेतर्फे पहिलीवहिली हवाई जाहिरात मुंबईमध्ये १६ एप्रिल २०२२ रोजी मुंबई स्थित एका विमानातर्फे प्रदर्शित करण्यात आली.
या हवाई जाहिरातीचा कालावधी साधारण दोन तासांचा होता. यासाठीचे विमान हे जमिनीपासून १००० फूट तर समुद्रसपाटीपासून ५०० फूट अंतरावर ताशी ६० मैल या वेगाने उडविण्यात आले.
ग्राहक सेवा केंद्रित बँक म्हणून प्रसिद्ध असलेल्या कॅनरा बँकेची स्थापना द्रष्टे दानशूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री अँमिम बाल सुब्बराव पै यांनी कर्नाटकातील छोटेसे बंदर मेंगलोर येथे 1906 साली केली होती. कॅनरा बँक ही सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक आहे.
शतकभराच्या प्रवासामध्ये ही बँक विविध बदलांमधून गेलेली असून आजही आपले ठाम अस्तित्व टिकवून आहे. विशेष करून 1969 च्या राष्ट्रीयकरणाच्या लाटेनंतरही या बँकेने आपला भौगोलिक विस्तार कायम राखत देशभरात ग्राहक पेठ काबीज केली. 2006 साली बँकेने आर्थिक क्षेत्रामध्ये आपली शतकभराची कारकीर्द पूर्ण केली. या प्रवासामध्ये बँकेने अनेक मैलाचे दगड पार केले. आजही भारतीय अर्थकारणामध्ये कॅनरा बँक आपले विशेष स्थान टिकवून आहे.
Comments
Post a Comment