सिम्फनी लिमिटेडच्या नव्या जाहिरातीत लोकप्रिय भारतीय खाद्यपदार्थ आणि एका दिवसाचा गारव्याचा खर्च यातील समन्वय अधोरेखित
सिम्फनी लिमिटेडच्या नव्या जाहिरातीत लोकप्रिय भारतीय खाद्यपदार्थ आणि
एका दिवसाचा गारव्याचा खर्च यातील समन्वय अधोरेखित
मुंबई, 21 एप्रिल 2022: तापमानात प्रचंड वाढ होत असताना, सिम्फनी लिमिटेडने त्यांच्या अत्याधुनिक एअर कुलरवरील ऑफर्स लोकांपर्यंत पोहोचाव्यात म्हणून नाविन्यपूर्ण दृष्टीकोनातून ‘एक समोसे के खर्च में पुरे दिन की कुलिंग- गर्मी को करो सिम्फनी’ जाहिरात मोहिमेचा शुभारंभ केला. सिम्फनी एअर कुलर्सचा एका दिवसाचा कुलिंग खर्च हा युपी-बिहारमधील चहा, राजस्थानातील कचोरी, गुजरातमधील खमण, दिल्लीतील सामोसा किंवा मुंबईतील वडापाव अशा सर्वार्थाने भारतीय म्हणता येतील अशा उपाहाराइतकाच असल्याचा निकष तंत्रज्ञान, आधुनिकीकरण आणि ग्राहक-केंद्रित दृष्टीकोन अशी ओळख असलेल्या ब्रँडने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणातून काढला आहे. भारतात, आपल्या लहानपणापासूनच या चहासोबतच्या पदार्थांशी आपली गट्टी आहे आणि आपल्या कुटुंबांसोबत आपण त्यांचा आनंद घेतल्याच्या आठवणी ताज्या आहेत. किमतीच्या बाबतीत अति जागरूक असलेल्या भारतातील ग्राहकांसाठी हे किमान किमतीचे पदार्थ असल्याच्या वास्तवाशी ही नाविन्यपूर्ण संकल्पना पूर्णपणे मेळ खाते. भारतातील शहरी भागात कुलर्स श्रेणी ही जवळपास 27% आहे आणि तरीही यात आणखी मुसंडी मारण्यासाठी मोठा वाव आहे. सर्वसाधारण खाद्यपदार्थांच्या इतकाच दररोजच्या कुलिंगचा खर्च असल्याची संकल्पना आपल्या मनात रुजते.
या जाहिरात मोहिमेविषयीचे आपले मत व्यक्त करताना सिम्फनी लिमिटेडचे ग्लोबल चीफ मार्केटिंग ऑफिसर, श्री. अनुज अरोरा म्हणाले, “या नव्या आर्थिक वर्षात प्रगतीपथावर असताना आम्ही आमची उद्दिष्टे पूर्ण करू आणि नवीन विक्रम स्थापित करू, याबाबत आम्ही निर्धास्त आहोत. बाजारातील एक अग्रणी या नात्याने आम्ही नव्या श्रेणीची निर्मिती करण्यासाठी पुढाकार घेऊन आमच्या ग्राहकांना अद्ययावत गोष्टी देऊ करत आहोत. लोकप्रिय भारतीय खाद्यपदार्थ आणि एका दिवसाचा कुलिंगचा खर्च यात समन्वय साधून आमच्या लक्षित प्रेक्षकांच्या संपर्कात राहण्याच्या आमच्या उद्दिष्टाच्या दृष्टीने ही मोहीम खरोखरच योग्य मार्गावर आहे. ही मोहीम म्हणजे उत्पादनाचे फायदे सर्वांपर्यंत पोहोचवण्याची आणि एअर कुलर्सच्या कमी किमतीच्या संदर्भातील सर्जनशील अभिव्यक्ती आहे. तापमानात प्रंचड वाढ होत असताना, आपली घरे थंड आणि हवेशीर ठेवणे अतिशय महत्त्वाचे आहे. आमच्या ग्राहकांना त्यांच्या पैशांचा योग्य मोबदला आणि दर्जेदार खरेदी अनुभव मिळेल, याची हमी आम्ही घेतली आहे.”.
प्रिंट आणि आउटडोअर मिडीया तसेच मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचता यावे यासाठी इतर डिजिटल प्लॅटफॉर्मवर ही जाहिरात मोहीम दिसणार आहे. पॅन इंडिया आउटडोअर मोहीम देशभरातील सुमारे 200 शहरांमधील निवासी जागा आणि सार्वजनिक ठिकाणांना लक्ष्य करण्यासाठी मध्यवर्ती ठिकाणी फलक उभारणार आहे. हे फलक स्थानिक भाषांमधून आणि सामोसा, इडली, कचोरी, चहा खमण, वडापाव यासारख्या स्थानिक लोकप्रिय पदार्थांच्या माध्यमातून ग्राहकांशी संपर्क प्रस्थापित करतील.
Comments
Post a Comment