फिनक्लेव २०२२च्या निमित्ताने क्लासप्लस आणि इन्व्हेस्ट आज फॉर कलमध्ये करार


फिनक्लेव २०२२च्या निमित्ताने क्लासप्लस आणि इन्व्हेस्ट आज फॉर कलमध्ये करार



मुंबई, भारतातील आर्थिक साक्षरता विभागातील सर्वाधिक प्रभावकर्त्या (इन्फ्लुएन्सर्स) व्यक्तींना फिनक्लेव २०२२च्या निमित्ताने एकत्र आणण्यासाठी

क्लासप्लस या कंटेण्ट निर्मात्यांना आपले ऑनलाइन कोचिंग व्यवसाय सुरू करण्यात व त्यांची व्याप्ती वाढवण्यात मदत करणाऱ्या आपल्या विभागातील आघाडीच्या स्टार्टअपने इन्व्हेस्ट आज फॉर कलचे संस्थापक अनंत लाढा यांच्याशी करार  करण्यात आला आहे.या करारात प्रसिद्ध इन्फ्युएन्सर, बॉडीबिल्डर व व्यावसायिक वैमानिक गौरव तनेजा ऊर्फ फ्लायिंग बीस्ट या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते.  अनेत प्रसिद्ध कंटेण्ट निर्माते, शिक्षणतज्ज्ञ, इन्फ्लुएन्सर्स आणि अर्थजगतातील प्रख्यात व्यक्ती या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. यांमध्ये सीए रचना रानडे, राज शमानी, अभि आणि नियू, प्रांजल कामरा, विवेक बजाज, पीआर सुंदरम आणि यांसारख्या अनेकांचा समावेश होता. प्रख्यात स्टॅण्डअप कॉमिक बिश्वकल्याण रथ हेही कार्यक्रमाचे मोठे आकर्षण ठरले.  


कोविड साथीच्या काळात भारतामध्ये प्रथमच गुंतवणूक करणाऱ्यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली. याच काळात कंटेण्ट निर्मात्यांनी आपल्या कंटेण्टच्या प्रसारासाठी व त्यातून उत्पन्न कमावण्यासाठी अनेकविध प्लॅटफॉर्म्स वापरण्यास सुरुवात केली. सर्जकांच्या (क्रिएटर्स) या समूहात काही कुशल ‘फिनफ्लुएन्सर्स’चाही समावेश होता. त्यांनी या नवीन युगातील प्रथमच गुंतवणूक करणाऱ्यांच्या ज्ञानातील त्रुटी ओळखल्या. या फिनफ्लुएन्सर्सनी आर्थिक साक्षरतेचा प्रसार करून तसेच लोकांना व्यक्तिगत स्तरावर माहितीपूर्ण आर्थिक निर्णय करण्याची मुभा देऊन ढोबळ आर्थिक प्रणालीवर सकारात्मक प्रभाव निर्माण केला आहे. त्यांनी समाजाला दिलेले योगदानसाजरे करण्यासाठी तसेच त्यांनी नेटवर्किंगची व परस्परांकडून काही शिकण्याची संधी देण्यासाठी फिनक्लेव २०२२चे आयोजन करण्यात आले.


फॉर कलचे संस्थापक अनंत लाढा   म्हणाले की मला समुदाय बांधणीच्या उद्देशाने वित्तीय क्षेत्रात कंटेण्ट निर्मिती करणाऱ्या काही जणांना एकत्र आणण्याची इच्छा होती आणि मी ही कल्पना क्लासप्लसच्या टीमला बोलून दाखवली. ही कल्पना एवढ्या प्रचंड उत्साहाने प्रत्यक्षात उतरवल्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे! फिनफ्लुएन्सर्स आणि क्लासप्ससच्या उत्साहामुळे मी प्रचंड आनंदून गेलो आहे. त्यामुळेच फिनक्लेव २०२२ला घवघवीत यश प्राप्त झाले आहे. क्लासप्लसचे सीईओ व सहसंस्थापक मुकुल रुस्तगी म्हणाले की फिनक्लेव २०२२च्या निमित्ताने वित्तीय क्षेत्रातील सर्वांत मोठ्या इन्फ्लुएन्सर्सचे एका छताखाली स्वागत करणे हा क्लासप्लससाठी सन्मानाचा व आनंदचा विषय होता. त्यांनी समाजाला दिलेले योगदान साजरे करण्याचा आमचा हा नम्र प्रयत्न होता. आम्ही सर्वांनी मिळून जे शिक्षण या कार्यक्रमाद्वारे घेतले, ते भारताला आर्थिकदृष्ट्या साक्षर व समावेशक करण्यात महत्त्वाचे योगदान देईल .

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

After Abida Parveen & Atif Aslam's magical performance, Next is Enrique Iglesias who is all set to perform in UAE