एमजी मोटर इंडियाचा भारत पेट्रोलियमसह सहयोग

 

एमजी मोटर इंडियाचा भारत पेट्रोलियमसह सहयोग

~ भारतातील पॅसेंजर ईव्हींसाठी ईव्ही चार्जिंग परिसंस्था प्रबळ करणार ~


मुंबई, २६ एप्रिल २०२२: स्थिरता व हरित गतीशीलतेप्रती आपल्या कटिबद्धतेशी बांधील राहत एमजी मोटर इंडियाने देशभरातील ईव्ही चार्जिंग पायाभूत सुविधेला चालना देण्यासाठी 'महारत्न' फोर्ब्स ग्लोबल २००० व फॉर्च्युन ग्लोबल ५०० कंपनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) सोबत सहयोग केला आहे. यासह एमजी मोटर इंडिया 'हरित गतीशीलते'चा अवलंब झपाट्याने वाढवण्यासाठी बीपीसीएलसोबत सहयोग करणारी पहिली पॅसेंजर कार कंपनी बनली आहे.


आपल्या 'चेंज व्हॉट यू कॅन' दृष्टीकोनाशी संलग्न राहत हे एमजीचे भारतातील इलेक्ट्रिक वेईकल अवलंबता प्रबळ करण्याच्या दिशेने पुढील पाऊल आहे. बीपीसीएलसोबतचा सहयोग आंतरशहरीय प्रवासासाठी संधी विस्तारत ईव्ही अवलंबतेला गती देईल, जेथे दोन्ही कंपन्या महामार्गांवर, तसेच शहरांमध्ये ईव्ही चार्जर्स इन्स्टॉल करतील. बीपीसीएलची व्यापक ग्राहक पोहोच व कार्यसंचालने आणि एमजीचे ईव्ही क्षेत्रातील प्रयत्नांसह दोन्ही कंपन्या कौशल्यांना एकत्र करत धोरणात्मकरित्या चार्जिंग साइट्स ओळखू शकतात, ग्राहक अभिप्राय प्राप्त करू शकतात, लॉयल्टी उपक्रम डिझाइन करू शकतात आणि चार्जिंग यंत्रणांच्या व्यवस्थापनासाठी तंत्रज्ञानाची निर्मिती करू शकतात.


एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजीव छाबा म्हणाले, "इलेक्ट्रिक मोबिलिटीमध्ये यशस्वी परिवर्तनासाठी प्रबळ ईव्ही परिसंस्था महत्त्वाची आहे. एमजी २०२० मध्ये झेडएस ईव्हीच्या लाँचपासून प्रबळ ईव्ही परिसंस्था विकसित करण्यामध्ये अग्रस्थानी राहिली आहे. आमच्या परिसंस्था सहयोगींसोबत आम्ही इलेक्ट्रिक वेईकल्ससाठी एण्ड-टू-एण्ड सस्टेनेबिलिटीकरिता बॅटरी रिसायकलिंग व बॅटरी सेकंड लाइफ सोल्यूशन्ससोबत ईव्ही चार्जिंग सोल्यूशन्सचे व्यापक नेटवर्क निर्माण करण्याप्रती काम करत आहोत. तसेच आमचे ग्राहक अद्वितीय ६-वे चार्जिंग परिसंस्थेचा लाभ घेतात, ज्यामुळे दररोज ईव्हीचा वापर अधिक सुलभ होतो. बीपीसीएलसोबतचा आमचा सहयोग ग्राहकांचा ईव्हींमधील विश्‍वास अधिक वाढवण्यासाठी भारतातील ईव्ही चार्जिंग पायाभूत सुविधा प्रबळ करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल आहे. बीपीसीएलची भारतातील प्रबळ उपस्थिती व व्यापक नेटवर्क देशभरातील विद्यमान व संभाव्य ग्राहकांना चार्जिंग सोल्यूशन्स सोईस्करपणे उपलब्ध होण्याची खात्री घेतील. आमचा ईव्हीला चार्जिंग करण्याच्या सुविधांमध्ये अधिक वाढ करण्याचा आणि ग्राहकांना त्यामधून होणा-या पर्यावरणीय लाभांबाबत जागरूक करण्याचा मनसुबा आहे."


बीपीसीएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अरूण कुमार सिंग म्हणाले, "आपण मास इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या युगात प्रवेश करत असताना स्थिर वापर हे वर्तमान व भविष्य आहे. आपण झपाट्याने इलेक्ट्रिक मोबिलिटीप्रती परिवर्तनाचा अवलंब करत असताना बीपीसीएल देशामध्ये इलेक्ट्रिक वेईकल्सच्या अवलंबतेला चालना देण्याकरिता ग्राहकांचा विश्वास वाढवण्यासाठी इलेक्ट्रिक वेईकल मालकांमधील तीन मोठ्या चिंता दूर करण्यामध्ये अग्रस्थानी आहे. बीपीसीएलमध्ये आम्ही आमची क्षमता विस्तारित करण्यास व दर्जात्मक ईव्ही चार्जिंग सोल्यूशन्सच्या युगामध्ये विकसित होण्यास एमजी मोटर इंडिया सारख्या नाविन्यपूर्ण ब्रॅण्ड्ससोबत सकारात्मक समन्‍वय निर्माण करण्यास उत्सुक आहोत.आम्ही या सहयोगासाठी, तसेच देशभरात इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या अवलंबतेला चालना देण्यासाठी आणि वैयक्तिक गतीशीलता क्षेत्रामध्ये उत्साहवर्धक ग्राहक ऑफरिंग्ज निर्माण करण्यास संधी देण्यासाठी उत्सुक आहोत."

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202