आयसीआयसीआय बँकेतर्फे एमएसएमईजसाठी भारतातील पहिली सर्वसमावेशक, सर्वांसाठी खुली डिजिटल यंत्रणा लाँच
आयसीआयसीआय बँकेतर्फे एमएसएमईजसाठी भारतातील
पहिली सर्वसमावेशक, सर्वांसाठी खुली डिजिटल यंत्रणा लाँच
- एमएसएमईज तसेच इतर बँकांच्या ग्राहकांना विविध सेवांचा वापर करता येणार
- कोणत्याही एमएसएमईला ओडीसाठी तत्काळ मंजुरी मिळणार
- या यंत्रणेअंतर्गत व्हिडिओ केवायसीद्वारे करंट खाते उघडण्यासाठी पूर्णपणे डिजिटल आणि इन्स्टंट प्रक्रिया
- एकाच ठिकाणी बँकिंग तसेच मूल्यवर्धित सेवांची संपूर्ण श्रेणी उपलब्ध
मुंबई – आयसीआयसीआय बँकेने आज देशातील मायक्रो, स्मॉल आणि मीडियम एंटरप्राइजेस (एमएसएमईज) तसेच इतर बँकांच्या ग्राहकांसाठी भारतातील पहिली सर्वसमावेशक, सर्वांसाठी खुली डिजिटल यंत्रणा लाँच केल्याचे जाहीर केले. या यंत्रणेचे तीन स्तंभ आहेत – १) सद्य ग्राहकांसाठी सुधारित बँकिंग सेवा २) इतर बँकांचे ग्राहक असलेल्या एमएसएमईजसाठी बँकिंग सेवांची श्रेणी ३) सर्वांसाठी मूल्यवर्धित सेवांची संपूर्ण श्रेणी उपलब्ध. या यंत्रणेअंतर्गत या क्षेत्रात प्रथमच सुरू करण्यात आलेल्या विविध सेवांचा समावेश असून त्याचबरोबर एरवी बँकांद्वारे केवळ आपल्याच ग्राहकांना सेवा देण्याच्या सध्या प्रचलित असलेली पद्धतीमध्ये लक्षणीय बदल करण्यात आला आहे.
कोणालाही आयसीआयसीआय बँकेच्या डिजिटल सेवांचा लाभ घेता येणार असून त्यासाठी केवळ इन्स्टाबिझ अप या व्यवसायासाठी सुपर अप असलेल्या अपची अद्यावत आवृत्ती गुगल प्ले स्टोअर किंवा अपल अप स्टोअरवरून अथवा बँकेच्या कॉर्पोरेट इंटरनेट बँकिंग (सीआयबी) प्लॅटफॉर्मवरून डाउनलोड करता येणार आहे.
लाँचविषयी आयसीआयसीआय बँकेचे कार्यकारी संचालक श्री. अनुप बागची म्हणाले, ‘एमएसएमईज भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहेत यावर आयसीआयसीआय बँकेने कायमच विश्वास ठेवला आहेय एमएसएमईजसाठी व्यवसाय करणे सुलभ व्हावे आणि आम्हाला त्यांच्या विकासात भागीदार होता यावे हे तत्व जपण्यास आम्ही प्राधान्य देतो.’
आम्ही केलेल्या संशोधनाअंती असे लक्षात आले आहे, की एमएसएमईजना तंत्रज्ञानामुळे मिळणाऱ्या फायद्यांची जाणीव आहे. व्यवसाय करण्याची पद्धत सोपी व्हावी यासाठी डिजिटल सेवांचा अवलंब करून पर्यायाने व्यवसाय वृद्धीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी ते उत्सुक आहेत. एमएसएमईजनाही त्यांच्या सर्व गरजा पूर्ण करणाऱ्या समग्र व्यासपीठाची गरज आहे. त्याचबरोबर आमची उत्पादने आणि सेवा केवळ आमच्या ग्राहकांपुरतीच मर्यादित राहावीत असे आम्हाला वाटत नाही. इतर बँकांच्या ग्राहकांनाही त्यांचा लाभ व्हावा अशी आमची इच्छा आहे.
या निष्कर्षांच्या आधारे आम्ही सर्वसमावेशक, खुली रचना असलेली डिजिटल यंत्रणा तयार करून त्यात अंदाजे सहा कोटींच्या एमएसएमईजना सक्षम करण्यासाठी बँकिंग सेवा तसेच मूल्यवर्धित सेवांचा समावेश केला. एमएसएमईजसाठीच्या या सेवांमुळे कार्यक्षमता वाढेल आणि त्यांच्या व्यवसायाला चालना मिळेल असे आम्हाला वाटते.’
इतर बँकांचे ग्राहक असलेल्या एमएसएमईजना इन्स्टाबिझच्या नव्या आवृत्तीवर ‘गेस्ट’ म्हणून लॉग इन करून विविध सेवांचा लाभ घेता येईल. या सेवांच्या यादीतील सर्वात महत्त्वाची सेवा म्हणून २५ लाख रुपयांच्या तत्काळ आणि पेपरलेस ओव्हरड्राफ्ट सुविधेला मिळणारी मंजरी. ‘इन्स्टाओडी प्लस’ असे नाव असलेली या क्षेत्रातील ही पहिलीच सेवा असून त्याअंतर्गत कोणत्याही बँकेच्या ग्राहकांना इन्स्टाबिझच्या अद्यावत आवृत्तीवर किंवा सीआयबीद्वारे केवळ काही क्लिक्सच्या मदतीने तत्काळ ओव्हरड्राफ्ट मिळवता येऊ शकतो. आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांना त्यांचे ओडी करंट खात्यात तत्काळ सक्रिय करता येणार असून इतर बँकांच्या ग्राहकांना व्हिडिओ केवायसीच्या माध्यमातून बँकेत डिजिटल पद्धतीने करंट खाते सुरू करून या सेवेचा लाभ घेता येईल.
उपलब्ध करण्यात आलेली आणखी एक महत्त्वाची सेवा म्हणजे डिजिटल पद्धतीने करंट खाते सुरू करणे. या संपूर्ण प्रक्रियेत खाते सुरू करण्याचा अर्ज ऑटोफिल करण्यासाठी, पॅन/आधार क्रमांकाची पडताळणी करण्यासाठी आणि व्हिडिओ केवायसीच्या माध्यमातून खाते सुरू करण्यासाठी बँकेच्या अत्याधुनिक एपीआयचा वापर करण्यात आला आहे.
त्याशिवाय एमएसएमईजचा विकास व कार्यक्षमतेला आणखी चालना देण्यासाठी इन्स्टाबिझद्वारे मूल्यवर्धित सेवांची मोठी श्रेणी बँकेचे ग्राहक असलेल्या व नसलेल्यांसाठीही उपलब्ध करण्यात आली आहे. एमएसएमईजना त्यांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या तज्ज्ञांबरोबर समन्वय साधण्याची गरज काढून टाकण्यासाठी आयसीआयसीआय बँकेने विविध भागिदारांबरोबर करार केला आहे. या भागिदारांमध्ये इंडिया फायलिंग्ज (व्यावसायिक शिस्तपालन व नोंदणीसाठी), इंडियामार्ट (व्यावसायिक लिस्टिंगसाठी), एयरटेल (कनेक्टिव्हिटी आणि व्यावसायिक संवादासाठी), क्लियर टॅक्स (टॅक्स फायलिंग आणि अडव्हायजरीसाठी), झोहो बुक्स (अकाउंटिंग सोल्यूशन्स), ग्लोबल लिंकर (बिझनेस नेटवर्किंग आणि डिजिटल स्टोअर मॅनेजमेंट), शेरलॉक.एआय (डिजिटल विपणन आणि डेटा अनालिटिक्स) यांचा समावेश आहे. एमएसएमईजना या तज्ज्ञांकडून खास सेवेचा तत्काळ लाभ घेता येऊ शकतो.
त्याशिवाय, बँकेचे ग्राहक असलेल्या व नसलेल्या एमएसएमईजनाही बँकेचा डिजिटल प्लॅटफॉर्म ट्रेड एमर्जचा वापर करून लेटर ऑफ क्रेडिट, बँक गॅरंटी, ट्रेड क्रेडिट, ट्रेड ट्रँक्झॅक्शन अशा सर्वसमावेशक ट्रेड सेवांचा लाभ घेता येईल.
त्याशिवाय इन्स्टाबिझच्या माध्यमातून मर्चंट्स, रिटेलर्स आणि डॉक्टर्स, वकील यांसार्या व्यावसायिकांनाही युपीआय व कार्ड्सद्वारे तत्काळ पेमेंट्स स्वीकारता येतील. त्यांना क्यूआर कोड जनरेट करता येईल आणि पॉइंट ऑफ सेल (पीओएस) उपकरणासाठी डिजिटल पातळीवर अर्ज करता येईल. त्यांना पेमेंटचे इन्संट्ट सेटलमेंट, केवळ ३० मिनिटांत दुकानाचे रुपांतर ऑनलाइन दालनात करणे, पेमेंट मिळाल्याची खात्री करणाऱ्या व्हॉइंस- मेसेजिंग उपकरणासाठी अर्ज करणे अशा मूल्यवर्धित सेवांचाही लाभ घेता येईल.
डिजिटल यंत्रणेद्वारे बँकेच्या सद्य ग्राहकांना अद्यावत सेवा दिल्या जातात. त्यांना आता व्यापार आणि परकीय विनिमय व्यवहारांशी संबंधित गरजा पूर्ण करण्यासाठी बँकेच्या ट्रेड ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर सहजपणे सहभागी होता येईल. त्यांना सहजपणे आणि डिजिटली जीएसटी भरता येईल, पीओएस उपकरणासाठी अर्ज करता येईल तसेच इतर सेवांचा लाभ घेता येईल. दमदार तंत्रज्ञान आणि एम्बेडेड अनालिटिक्स यांची जोड दिलेली इन्स्टाबिझ अपची नवी आवृत्ती ग्राहकाच्या प्रोफाइलनुसार वेगवेगळ्या प्रकारचे रिमाइंडर्स देते. उदा. जीएसटी भरावा लागणार असलेल्या ग्राहकाला पेमेंटच्या शेवटच्या तारखेआधी तो भरण्याची आठवण केली जाईल, तर निर्यातदार/आयातदाराला ट्रेड ऑनलाइन सक्रिय करण्याची विनंती केली जाईल आणि व्यापाराला डिजिटली पीओएस उपकरणासाठी अर्ज करण्याविषयी पॉप- अप मिळेल.
Comments
Post a Comment