फोनपेवर अक्षय तृतीयेसाठी सोने आणि चांदीवर आकर्षक ऑफर्स
फोनपेवर अक्षय तृतीयेसाठी सोने आणि चांदीवर आकर्षक ऑफर्स
ग्राहकांना 3 मे पर्यंत 24 कॅरेट सोने आणि चांदीवर ₹2,500 पर्यंत कॅशबॅक मिळेल
फोनपे, या भारताच्या आघाडीच्या डिजिटल पेमेंट कंपनीने अक्षय तृतीयेच्या शुभ प्रसंगी आकर्षक ऑफर्सची आज घोषणा केली. या सणासुदीच्या दिवसांत ॲपवर सोने आणि चांदी दोन्हीच्या खरेदीवर फोनपे आकर्षक कॅशबॅक प्रदान करत आहे. ग्राहक ॲपच्या माध्यमातून 24 कॅरेट शुद्धतेचे सोने खरेदी करू शकतात आणि कोणत्याही संग्रह किंवा घडणावळ शुल्काशिवाय बँक श्रेणीच्या विमाकृत लॉकरमध्ये जमा करण्याची निवड करू शकतात किंवा विस्तृत श्रेणीच्या डिझाइन पर्यायांमधून निवड करून सोन्याचे नाणे किंवा बारच्या स्वरूपात त्याची डिलिव्हरी मिळवू शकतात. तसेच ते ऑफर कालावधीत त्यांच्या सोन्याच्या खरेदीवर ₹2,500 पर्यंत कॅशबॅक सुद्धा मिळवू शकतात. चांदीची नाणी किंवा बार खरेदी करू इच्छित असलेले ग्राहक सुद्धा ₹250 पर्यंत कॅशबॅकचा लाभ घेऊ शकतात. ही मर्यादित कालावधीची ऑफर 3 मे, 2022 पर्यंत वैध आहे.
फोनपे ही एकमेव डिजिटल पेमेंट ॲप आहे जी MMTC PAMP आणि SafeGold दोन्हीकडून तुम्हाला सर्वोच्च शुद्धतेचे सोने खरेदी करण्याची सोय तुम्हाला उपलब्ध करून देते. तसेच सर्वोच्च शुद्धतेची चांदीची नाणी आणि बार देण्यासाठी फोनपे विशेषपणे SafeGold सोबत एकत्र आले आहे.
Comments
Post a Comment