यंदा अक्षय्य तृतीयाला साजरी करा शुद्ध व शुभ्र प्लॅटिनमसह
यंदा अक्षय्य तृतीयाला साजरी करा शुद्ध व शुभ्र प्लॅटिनमसह
'अक्षय्य तृतीया' हा शुभ सण भारतीय महिना वैशाखमधील शुक्ल पक्षच्या तिस-या दिवशी साजरा केला जातो आणि व्यक्तीच्या जीवनात नवीन शुभारंभाचे प्रतीक मानले जाते. हा सण चांगले भाग्य, यश व नशीबाचे प्रतीक आहे. यंदा ३ मे २०२२ रोजी अक्षय्य तृतीया साजरी केली जाणार आहे.
'अक्षय्य' म्हणजे अविनाशी किंवा चिरंतन. हा सण संपत्ती, समृद्धता व आनंदाचे प्रतीक आहे आणि मौल्यवान धातूंची खरेदी करणा-यांचे नशीब उज्ज्वल करतो असा समज आहे. शुद्ध, नैसर्गिकरित्या शुभ्र असलेले प्लॅटिनम शुद्धता, संपत्ती, शक्ती व सामर्थ्याचे प्रतीक आहे. फिकट न होणा-या व न बदलणा-या प्लॅटिनममधील ज्वेलरी स्वत:ची शुभ्रता कायम ठेवतात आणि अधिक काळासह कधीच फिकट होत नाहीत.
प्रेमाचे वैश्विक प्रतीक असलेल्या दुर्मिळ व मौल्यवान प्लॅटिनमने आव्हानात्मक काळामध्ये व्यक्तीच्या जीवनातील महत्त्वपूर्ण प्रसंगांना उत्साहित केले आहे, ज्यामुळे ते या प्रसंगासाठी परिपूर्ण आहेत.
पीजीआय प्रोग्राम अंतर्गत प्लॅटिनम ज्वेलरीचा प्रत्येक तुकडा ९५ टक्के शुद्ध प्लॅटिनममध्ये बनवण्यात आला आहे, जो मौल्यवान दागिन्यांमधील शुद्धतेच्या सर्वोच्च मानकांपैकी एक आहे. या तुकड्यांमध्ये स्टॅम्प केलेल्या “पीटी ९५०”च्या शुद्धतेचे वैशिष्ट्य आहे - जे अक्षय्य तृतीयासारख्या लक्षणीय व शुभ दिवसाला अधिक खास बनवतात.
पारंपारिक डिझाइन्सना आधुनिक लुक देत या खास प्रसंगासाठी प्लॅटिनम ज्वेलरी श्रेणीमध्ये गणपती बाप्पा व ओमचे आकर्षकरित्या डिझाइन केलेले दैवी पेण्डंट्स, तसेच महिलांसाठी कुशलरित्या डिझाइन केलेले पेण्डंटस, चेन्स, कानातले आणि नेकपीसेस आहेत. तसेच जोडप्यांसाठी प्लॅटिनम लव्ह बॅण्ड्स आणि पुरूषांसाठी आकर्षक चेन्स व ब्रेसलेट्स देखील आहेत.
या शुभ प्रसंगाबाबत बोलताना प्लॅटिनम गिल्ड इंटरनॅशनलच्या भारतातील व्यवस्थापकीय संचालक वैशाली बॅनर्जी म्हणाल्या, ''अक्षय्य तृतीया हा भारतीय सणांमधील सर्वात शुभ सणांपैकी एक आहे, जो समृद्धता आणण्यासाठी व नवीन शुभारंभासाठी ओळखला जातो. प्लॅटिनम हा नैसर्गिकरित्या आकर्षक शुभ्र धातू आहे. तो आजीवन शुभ्र राहतो आणि त्याची शुभ्रता कधीच जात नाही. शुद्ध, नैसर्गिकरित्या शुभ्र असलेल्या गोष्टींसाठी मागणी वाढत असताना आम्हाला विश्वास आहे की, प्लॅटिनम ज्वेलरीप्रती मागणी देखील वाढेल. आमचे सर्व रिटेल सहयोगी सकारात्मक अक्षय्य तृतीयेसाठी उत्सुक आहेत.''
अक्षय्य तृतीयेला लाँच करण्यात येणा-या मेन ऑफ प्लॅटिनमअंतर्गत त्यांच्या स्पेशल डिझाइनर एडिशनबाबत सांगताना व्हीबीजे ज्वेलर्सचे भागीदार अमरेंद्रन वुम्मिदी म्हणाले, ''प्लॅटिनममध्ये बनवण्यात आलेली ज्वेलरी ९५ टक्के शुद्ध आहे, ही ज्वेलरी क्वॉलिटी अशुरन्स कार्डसह येते आणि त्यामध्ये पीटी ९५० चा शुद्धता हॉलमार्क आहे. उपलब्ध प्लॅटिनम ज्वेलरीच्या व्यापक श्रेणीसह आम्हाला विश्वास आहे की, पुरूषांना या शुभ दिवसासाठी शोध घेतलेली वस्तू मिळेल, जेथे शुभ्रता व शुद्धता आवश्यक आहे.''
कल्याण ज्वेलर्सचे कार्यकारी संचालक राजेश कल्याणरमण अक्षय्य तृतीयेसाठी स्पेशल प्लॅटिनम कलेक्शनबाबत म्हणाले, ''आम्ही विशेषत: आधुनिक, महत्त्वाकांक्षी वस्तूंचा शोध घेणा-या तरूणांमध्ये वर्षानुवर्षे प्लॅटिनमप्रती आवड वाढताना पाहिली आहे. ते त्यांची स्टाइल व लुकला साजेसा अशा अद्वितीय मॅचचा शोध घेतात. त्यांना धातूच्या गुणांबाबत माहित आहे आणि त्यांचा अवलंब करतात. प्लॅटिनम हा धातू नैसर्गिकरित्या शुभ्र आहे, कधीच फिकट होत नाही किंवा काळवंडत नाही. शुद्धता व दुर्मिळता हे गुण प्लॅटिनमला आजच्या ग्राहकांसाठी बहुमूल्य बनवतात.''
तसेच ओरा ज्वेलर्सचे दिपू मेहता म्हणाले, ''आम्हाला देशभरात प्रामुख्याने तरूणांमध्ये प्लॅटिनमप्रती मागणीमध्ये वाढ होताना दिसत आहे. तरूणांमध्ये या धातूप्रती आवड खूप वाढली आहे. शुद्धता, दुर्मिळत्व, शुभ्रता हे गुण प्लॅटिनमला या महत्त्वपूर्ण प्रसंगासाठी अनुकूल बनवतात.''
तर मग, यंदा दुर्मिळ व मौल्यवान प्लॅटिनमसह हा सण साजरा करा आणि त्याच्या शुभ्रतेची शुद्धता तुमचे जीवन समृद्ध करो हीच सदिच्छा.
Comments
Post a Comment