उन्नती मायक्रोफिनमुळे दिवा शहरातील वेदिका यांच्या जीवनात उद्योजकतेद्वारे परिवर्तन
उन्नती मायक्रोफिनमुळे दिवा शहरातील वेदिका यांच्या जीवनात उद्योजकतेद्वारे परिवर्तन
कल्याण, ११ एप्रिल २०२२ : महिला उद्योजकांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यापासून तो वाढविण्यासाठी मायक्रोफायनान्स आर्थिक मदत करण्यात महत्त्वाचा ठरला आहे. देशासह राज्यातील अनेक इच्छुक महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी मदत करून त्यांचे आयुष्य समृद्ध करण्यात मायक्रोफायनान्सने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
मायक्रोफायनान्सचा वापर करून सूरू झालेला महाराष्ट्रातील कल्याण येथील दिवामध्ये रहिवासी असलेल्या वेदिका लखन यांचा उद्योजकतेचा प्रवास त्यांच्या परिसरातील महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. वेदिका यांच्यातील चिकाटी आणि दृढनिश्चय यामुळे त्यांच्या कुटुंबातील गंभीर आर्थिक संकट दूर झाले असून त्यांना आर्थिक स्थैर्य मिळाले आहे. तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या चांगल्या आयुष्यास सुरूवात झाली आहे.
वेदिका यांचा घरगुती पद्धतीचे जेवण टब्ब्याद्वारे पुरविण्याचा छोटासा व्यवसाय होता. तर त्यांचे पती विशाल लखन हे घाटकोपरमध्ये एका कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून कामाला होते. मात्र लॉकडाऊनमुळे ते त्यांच्या कामाच्या ठिकाणी हजर होवू शकले नाहीत. ज्यामुळे त्याची नोकरी गेली. विदेका आणि विशाल यांच्यासह अनेकांची घरे कोरोनाच्या साथीने उध्वस्त केली होती. नोकरी गेल्याने आता नेमकं जगायच कस आणि आर्थिक गरजा कशा भागवायच्या, असा प्रश्न वेदिका यांच्या कुटुंबापुढे होता. उत्पन्नाचे कोणतेही साधन नसल्यामुळे कुटुंबाला जीवनावश्यक वस्तू मिळण्यासाठीचा संघर्ष त्यांना करावा लागला होता.
कुटुंबाची आर्थिक परिस्थिती पाहून वेदिका यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र भांडवलाची कमतरता हा त्यांच्या उद्योजकीय प्रवासातील मोठा अडथळा ठरला. यावर मात करण्यासाठी त्या विविध मार्ग शोधत असताना त्यांना आर्थिकदृष्ट्या कमकुवत महिलांना मदत करण्यासाठी गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असलेल्या नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्या - मायक्रो फायनान्स संस्था (एनबीएफसी-एमएफआय) - उन्नती मायक्रोफिनशी ओळख झाली. उन्नती मायक्रोफिनसारख्या मायक्रोफायनान्स संस्था कोणतेही तारण न घेता कर्ज देते. त्यामुळे वेदिका यांनी वेळ न दवडता तातडीने कर्ज अधिकाऱ्याकडून आवश्यक माहिती आणि मार्गदर्शन घेतले आणि कर्ज घेतले.
कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेतून त्यांनी ऑर्डरनुसार लाडू बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. हे लाडू त्यांनी आपल्या परिसरात विकण्यास सुरवात केली. सुरुवातीला त्यांना काही आव्हानांचा सामना करावा लागला. मात्र कठोर परिश्रम , समर्पण आणि उन्नतीच्या पाठिंब्यामुळे त्यांच्या व्यवसायाला गती मिळाली. व्यावसायातून आलेला नफा वाढत गेल्याने त्यांच्या कुटुंबाला आवश्यक असलेले आर्थिक स्थैर्य मिळाले आहे. आर्थिक स्थैर्याने त्यांच्या कुटुंबाचे जीवनमान सुधारले आहे. तसेच त्यांचा हा प्रवास आजूबाजूच्या इतर महिलांसाठी आदर्श ठरत आहे.
मायक्रोफायनान्स संस्थांनी केलेली मदत आणि स्वतःच्या मेहतीमुळे आनंदी व समाधानी झालेल्या वेदिका लखन यांनी त्यांच्या अनुभवाबाबत सांगितले की, “मी उन्नती मायक्रोफिनला माझ्या यशाचे ऋणी मानते. त्यांची मदत आणि मार्गदर्शनाशिवाय मी इथपर्यंत पोहोचू शकले नसते. मायक्रोफायनान्स कर्ज आणि वेगवेगळ्या टप्प्यांवर आर्थिक प्रशिक्षणामुळे आम्हाला कुटुंबासाठी बचत व्यवस्थापित करण्यासाठी आणि अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी माहिती आणि कौशल्य मिळाले. माझ्या उपक्रमात मला मार्गदर्शन आणि वित्तपुरवठा केल्याबद्दल मी उन्नतीची आभारी आहे.”
Comments
Post a Comment