फोनपे ने सोन्याच्या गुंतवणुकीसाठी युपीआय एसआयपी लाँच केले
फोनपे ने सोन्याच्या गुंतवणुकीसाठी युपीआय एसआयपी लाँच केले
- फोनपे ग्राहक आता युपीआय एसआयपी सह सर्वोच्च शुद्धता असलेल्या 24 कॅरेट सोन्यात गुंतवणूक करू शकतात
- जमा केलेले 24 कॅरेट सोने विमा उतरवलेल्या, बँक दर्जाच्या लॉकरमध्ये साठवले जाईल आणि कधीही काढता घेता येईल.
फोनपे, या भारतातील आघाडीच्या डिजिटल पेमेंट कंपनीने, सोन्यात गुंतवणुकीसाठी युपीआय एसआयपी लाँच केल्याची आज घोषणा केली. युजर्स आता दर महिन्याला निर्दिष्ट रकमेच्या सर्वोच्च शुद्धता असलेल्या 24 कॅरेट सोन्यात गुंतवणूक करू शकतात आणि त्यांचे सोने फोनपे चे भागीदार, MMTC-PAMP आणि SafeGold द्वारे राखलेल्या विमाकृत बँक दर्जाच्या लॉकरमध्ये जमा करू शकतात.
फोनपे वर सोन्याचेएसआयपी सुरू करण्याचा फायदा म्हणजे युपीआय ची सोय मिळते. युजर्सला फक्त सोन्याचा प्रदाता निवडायचा आहे, मासिक गुंतवणुकीची रक्कम नमूद करून, युपीआय पिन टाकून व्यवहारास प्रमाणितकरण करायचे आहे फक्त इतकेच आणि झाले! सोन्याचे एसआयपी सेट करणे ही फक्त एकदा करायची सोपी प्रक्रिया आहे आणि त्यानंतरची सर्व गुंतवणूक पूर्णपणे स्वयंचलित आहे. युजर्सचे त्यांच्या सोन्याच्या गुंतवणुकीवर पूर्ण नियंत्रण असेल आणि ते कधीही सोने विकू शकतात आणि त्यांच्या बँक खात्यात थेट पैसे मिळवू शकतात. ते सोन्याची नाणी आणि बारच्या रूपात त्यांचे सोन्याचे वितरण करण्याची देखील निवड करू शकतात, जे सुद्धा अगदी घरपोच.
फोनपे अॅपवर युपीआय एसआयपी द्वारे सोन्यात गुंतवणूक करण्याचे फायदे खालीलप्रमाणे आहेत:
1. फक्त 100 रुपये प्रति महिना देऊन 24 कॅरेट सोने खरेदी करा: गोल्ड एसआयपी द्वारे, युजर्स सर्वोच्च शुद्धता असलेल्या 24 कॅरेट सोन्यामध्ये दरमहा किमान 100 रुपयांपासून गुंतवणूक करण्यास सुरुवात करू शकतात आणि त्यांची सोन्यात बचत पद्धतशीरपणे करण्यासाठी नियमितपणे लहान रकमांची गुंतवणूक सुरू ठेवू शकतात.
2. किंमतीतील चढ उतारांची काळजी करण्याची गरज नाही: गोल्ड एसायपी ही नियतकालिक गुंतवणूक असल्याने, युजर्सना गुंतवणूकीचा निर्णय घेण्यासाठी सोन्याच्या किमतीचा सतत आढावा घेण्याची आवश्यकता नाही. ठराविक काळाच्या अंतराने सोन्यामध्ये ठराविक रक्कम गुंतवून युजर्सचा दीर्घकालीन गुंतवणुकीत सरासरी खर्च कमी होऊ शकते.
या लाँच प्रसंगी बोलताना, फोनपे चे गुंतवणूक प्रमुख टेरेन्स लुसियन म्हणाले, “फोनपे चे स्वप्न अशी उत्पादने आणि सेवा तयार करण्याचे आहे जे त्याच्या 380 मिलियन वापरकर्त्यांच्या विविध गुंतवणूकीच्या गरजा पूर्ण करतील. भारतीय लोक सोने खरेदी करण्याचे स्मार्ट मार्ग शोधत असल्याने, आमच्या युजर्सला युपीआय च्या माध्यमातूनगोल्ड एसआयपी सेट करण्याचा पर्याय देताना आम्हाला आनंद होत आहे. फोनपे चे गोल्ड एसआयपी युजर्सला छोट्या आणि नियमित मासिक गुंतवणुकीद्वारे सर्वात शुद्ध 24 कॅरेट सोने खरेदी करायला देऊन त्यांची दीर्घकालीन सोन्याची गुंतवणूक कोणत्याही अडचणीशिवाय करण्यात मदत करेल”
Comments
Post a Comment