के जे सोमैय्या हॉस्पिटल अॅन्ड रिसर्च सेंटरच्या ईएनटी विभागाने एका वंचित मुलाचे कोक्लियर इंप्लाट करून दिले
के जे सोमैय्या हॉस्पिटल अॅन्ड रिसर्च सेंटरच्या ईएनटी विभागाने एका वंचित मुलाचे कोक्लियर इंप्लाट करून दिले
~के जे सोमैय्या हॉस्पिटलच्या ईएनटी विभागाने डॉ. दिनेश वैद्य आणि त्यांच्या संघाच्या मार्गदर्शनाखाली श्रवणयंत्राच्या पलीकडे जाऊन सामाजिक उपक्रमाला हातभार लावला असून तरूण मुलांचे आयुष्य बदलण्याची आशा दर्शवली आहे~
मुंबई, मे २०२२ - ईएनटी विभागाने डॉ. दिनेश वैद्य आणि केजे सोमैय्या हॉस्पिटल अॅन्ड रिसर्च सेंटर येथील त्यांच्या ईएनटी संघाने आज पहिली कोक्लियर इंप्लांट यशस्वीरीत्या पूर्ण केली. हे इंप्लांट एका दात्याच्या सहकार्यातून नि:शुल्क करण्यात आले. हे इंप्लांट मुंबईतील प्रसिद्ध ईएनटी तज्ञ आणि के जे सोमैय्या हॉस्पिटल अॅन्ड रिसर्च सेंटर येथे कोक्लियर इंम्पांट मार्गदर्शक असलेले डॉ. मीनेश जुवेकर यांनी केली. के.जे. सोमैय्या हॉस्पिटल अॅन्ड रिसर्च सेंटर हे जागतिक दर्जाचे नवजात बालकांच्या श्रवणाचे स्क्रीनिंग करण्याची सुविधा असलेले केंद्र आहे आणि कमी खर्चात ते शस्त्रक्रिया करण्यात मदत करतात. कोक्लियर इंप्लांटमध्ये बहिरेपण असलेल्या मुलामध्ये एक उपकरण लावून देण्याचा समावेश होतो. या इंप्लांटचा सर्वोत्तम वयोगट आहे १-४ वर्षे. या इंप्लांटच्या सहाय्याने लहान मुलांना ऐकूही येऊ शकते आणि साधारण मुलांसारखे बोलता देखील येऊ शकते.
वस्तूत: एखाद्या कोक्लियर इंप्लांटेशनमध्ये उपकरणामध्ये एक अंतर्गत उपकरण असते आणि एक बाह्य उपकरण असते, जे कानाच्या वर कवटी हाडाच्या आत लावले जाते. कोक्लियर इंप्लांट हे कानाच्या नुकसान पावलेल्या भागाला वगळून पुढे जाते आणि श्रवण शीरेला उत्तेजित करते व थेट मेंदूला संवेदना पाठवते.
एक साधे इम्प्लांट करण्यासाठी साधारणपणे ६ लाख खर्च होतो. बर्याच जणांना हे परवडण्यासारखे नाही. त्यामुळे हे लक्षात घेऊनच, के जे सोमैय्या हॉस्पिटल अॅन्ड रिसर्च सेंटरने सहकार्य करण्याच्या दृष्टीने हा उत्तम उपक्रम हाती घेतला आहे, ज्यामुळे समाजातील निम्न आर्थिक स्तराची पार्श्वभूमी असलेल्या वंचित बहिरेपणा असलेल्या मुलांना मदत करण्यासाठी हे केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या काही ठराविक योजना आहेत, ज्यातून जन्मजात बहिरेपण असलेल्या मुलांना हे इंप्लांट्स देता येतात.
के जे सोमैय्या हॉस्पिटल आणि संशोधन केंद्राने बाळाचे जे इंप्लांट करून दिले ते युएसमधील अॅडवांस्ड बायोनिकमधून आयात करण्यात आले आहे आणि त्याला २० वर्षांची वॉरंटी असून उत्तम गुणवत्तेचे आहे. सुरूवातीला इंप्लांट हे १५ दिवसांनी चालू होत होते, ज्यानंतर नियमित वाचा उपचार दिले जात होते ज्यामुळे मुलाची वाचा सर्वसामान्यांसारखी होऊ शकेल.
सोमैय्या हॉस्पिटलने केलेल्या या समाजोपयोगी कार्याबद्दल बोलताना डॉ. मीनेश जुवेकर म्हणाले की, “मी या व्यवसायामध्ये मागील काही वर्षे कार्यरत आहे आणि माझ्या या एकूण कार्यकाळामध्ये मी अनेक पालकांना त्यांच्या बहिरेपणा आलेल्या मुलांवर उपचार करण्यासाठी येताना पाहिले आहे आणि बर्याच जणांना उपचार करून घ्यायचा आहे मात्र ते त्यांच्या खिशाला परवडण्यासारखे नसते, ज्यामुळे त्यांना शांतपणे आहे ते स्वीकारावे लागते आणि तसेच जगत राहावे लागते. के जे सोमैय्या हॉस्पिटल अॅन्ड रिसर्च सेंटरने हा उपक्रम हाती घेतल्याचे पाहून मला प्रचंड समाधान वाटले, ज्यामुळे तरूण मुलांना हे इंप्लांट्स देऊन त्यांचे आयुष्य सुकर होऊ शकेल. खरोखर आवश्यकता असलेल्या बहुतांशी मुलांपर्यंत पोहोचणे आणि त्यांना श्रवण शक्तीची भेट देणे हे आमचे लक्ष्य आहे, ज्यातून त्यांच्या आयुष्यामध्ये एक सर्वांगीण, सकारात्मक बदल घडून येऊ शकेल''.
केजे सोमैय्या हॉस्पिटल आणि वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक आणि ईएनटी विभागाचे एचओडी, डॉ. दिनेश वैद्य, म्हणाले की, “आम्ही कोक्लियर इंप्लांट कार्यक्रम आमच्या केंद्रावर राबवण्याचा मागील एका वर्षापासून प्रयत्न करत आहोत आणि शेवटी आजपासून आम्ही त्याची सुरूवात करू शकलो याचा मला आनंद वाटत आहे. आमच्या हॉस्पिटलमधील ही सुविधा समाजातील सर्व घटकांतून आलेल्या लहान मुलांना व प्रौढांना आम्ही प्रदान करू शकू याबद्दल मला विश्वास आहे. आमच्या या कार्यक्रमासाठी आवश्यक असलेल्या तपासात्मक सर्व सुविधा आणि त्याचबरोबर एक अप्रतिम अशी टीम देखील आहे.
केजे सोमैय्या हॉस्पिटल व संशोधन केंद्राच्या डीन असलेल्या डॉ. वर्षा फडके म्हणाल्या की, ”लहान मुले ही देशाचे भवितव्य असतात. आम्ही सर्वसमावेशक, नियोजित आणि मानवी दृष्टीकोनाच्या अनुषंगाने निम्न सामाजिक-आर्थिक स्तरातील व्यक्ती निवडतो आणि वैद्यकीय उपचार क्षेत्रामध्ये आमच्या दृष्टीने सहकार्य करण्याचा मार्ग अनुसरत आहोत. आम्ही तंत्रज्ञानाचा वापर करून आणि वंचित गटातील मुलांना सहानुभूतीपूर्ण मार्गाने सक्षम बनवत आरोग्य प्रणाली मजबूत करण्यात मदत करत आहोत".
Comments
Post a Comment