फोनपे ने आपल्या प्लॅटफॉर्मवरून 1 दशलक्ष टू व्हीलर पॉलिसींची केली विक्री
फोनपे ने आपल्या प्लॅटफॉर्मवरून 1 दशलक्ष टू व्हीलर पॉलिसींची केली विक्री
~ एकूण विमा खरेदींपैकी 75%+ खरेदी टियर 2 & 3 शहरांमधून झाल्याचे दिसते~
India, 2022: फोनपे या भारतातील आघाडीच्या फिनटेक प्लॅटफॉर्मने, आपल्या विमा ब्रोकिंग प्लॅटफॉर्मवरून विमा पॉलिसी सादर केल्यापासून तब्बल 1 दशलक्ष टू व्हीलर विमा पॉलिसी विकल्याचे जाहीर केले आहे. कंपनीने असेही म्हटले आहे, की विमा खरेदीपैकी ७५% पेक्षा जास्त खरेदी ही टियर २ आणि ३ शहरांमधून केली जाते. यामध्ये निम शहरे आणि नगरे येथे ऑफरचा व्यापक स्वीकार दिसतो. विमा उत्पादने सर्वांसाठी उपलब्ध व्हावीत हा PhonePe चा प्रमुख दृष्टीकोन आहे. या दृष्टीकोनातील हा प्रमुख टप्पा आहे. पॉलिसी प्रकारांची निवड, परवडणारे दर आणि दोन मिनिटांमध्ये त्वरित होणारी प्रक्रिया याद्वारे रस्त्यांवरील विनाविमा वाहनांची संख्या कमी करणे, हा PhonePe चा हेतू आहे.
आणखी लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे ग्राहक फोनपे च्या टू व्हीलर विम्यासह कोणत्याही तपासणीशिवाय कालबाह्य झालेल्या पॉलिसीचेही कोणत्याही त्रासाशिवाय नूतनीकरण करू शकतात आणि हा विमा तातडीने जारी केला जातो. आजच्या घडीला PhonePe च्या प्लॅटफॉर्मवरून युजर्सना निवडीची विस्तारित श्रेणी ऑफर केली जाते, ज्यातून विमाधारकांना ऑन बोर्ड असलेले विस्तृत निवडीचे पर्याय उपलब्ध असतात. सुलभ ऑनबोर्डिंग आणि खरेदीचा अनुभव यासारख्या नावीन्यपूर्ण वैशिष्ट्यांमुळे PhonePe वरून भारतभर विमा उत्पादने स्वीकारली जातात.
कंपनीने पुढे असेही सांगतिले, की ८०% पेक्षा जास्त टू व्हीलर विमा, कवच कालबाह्य झालेल्या युजर्सनी खरेदी केला आहे. याद्वारे असे दिसून येते, की जिथे पुरेशी जागरूकता नाही आणि त्यांच्या विम्याचे नूतनीकरण करण्यासाठी सोयीस्कर मार्ग नाही, अशा पूर्वी कमी सेवा असलेल्या विभागांना PhonePe प्लॅटफॉर्मद्वारे या ऑफर दिल्या जात आहेत. टू व्हीलर विम्यासाठी, PhonePe युजर्स व्यापक योजनांची निवड करत आहेत, ज्यात तृतीय पक्षाच्या वाहनांचे नुकसान आणि स्वतःच्या वाहनाचे नुकसान दोन्हीसाठी कवच दिले जाते. PhonePe ने हे श्रेय ग्राहकांमध्ये जागरूकता वाढवणे, परवडणारे दर आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरून उपलब्धता अशा प्रयत्नांना दिले आहे.
Comments
Post a Comment