एनएसडीएलचा 'मार्केट का एकलव्य - एक्स्प्रेस' प्रोग्रॅम भारतातील सर्व राज्यांमधील 75+ शहरांमधील 4000 हून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला

 एनएसडीएलचा 'मार्केट का एकलव्य - एक्स्प्रेस' प्रोग्रॅम भारतातील सर्व राज्यांमधील 
75+ शहरांमधील 4000 हून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला

 
-          या प्रोग्रॅमला उपस्थित राहिल्यानंतर 90% विद्यार्थ्यांचा डिमॅट अकाउंट सुरू करण्याचा मानस
-          सहभागींमध्ये 48% प्रमाण मुलींचे होते
-          डीईए आणि सेबीतर्फे आयोजित आयकॉनिक सप्ताह सोहळ्यात 'मार्केट का एकलव्य - एक्स्प्रेस' या एनएसडीएल फिल्मचे प्रदर्शन
 


मुंबई, 13 जून, 2022 : नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) यांच्यातर्फे 'मार्केट का एकलव्य - एक्स्प्रेस' या शैक्षणिक कार्यक्रम शृंखलेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम खास विद्यार्थ्यांसाठी तयार केला होता. हा कार्यक्रम 8 भाषांमध्ये आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात 'आझादी का अमृत महोत्सव' अंतर्गत भारतातील सर्व राज्यांमधील 75+ शहरांमधील 4,000हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.
 
नवी दिल्ली येथे 8 जून 2022 रोजी डीईए आणि सेबीतर्फे आयोजित 'इंडियाज इकोनॉमिक जर्नी @ 75' (भारताचा अमृतमहोत्सवी आर्थिक प्रवास) या कार्यक्रमात या एनएसडीएलच्या उपक्रमावरील 'मार्केट का एकलव्य - एक्स्प्रेस' हा दृक-श्राव्य चित्रपट दाखविण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षा केंद्रीय अर्थमंत्री श्रीम. निर्मला सीतारामन यांनी या उपक्रमाची प्रशंसा केली आणि अशा प्रकारच्या प्रयत्नांची व्याप्ती वाढविण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
 
भारतातील 130 कोटी लोकसंख्येपैकी केवळ 7% व्यक्ती सिक्युरिटी मार्केटमध्ये गुंतवणूक करतात. जागतिक  स्तरावर विचार करता भारतात सर्वात तरुण लोकसंख्या आहे आणि लोकसंख्येचे सरासरी वय 29 वर्षे आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर तरुण नागरिकांचे मनुष्यबळ लाभले तर त्यामुळे लोकसंख्या लाभांश तयार होऊ शकतो. ‘मार्केट का एकलव्य’ हा प्रोग्रॅम सध्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर केंद्रीत आहे आणि त्यांना वित्तीय ज्ञानाने सक्षम करण्याचे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. त्यांना भविष्यासाठी तयार करण्याची आणि विवेकी गुंतवणूकदार होण्यास प्रशिक्षित करण्याची ही योग्य वेळ आहे.
 
या कार्यक्रमात सहभागी झालेली कोटा विद्यापीठातील महाविद्यालय समन्वयक अनुक्रती शर्मा म्हणाली, “मला गुंतवणुकीची मूलभूत तत्वे समजली. ही पूर्वी मला माहीत नव्हती. मार्केट का एकलव्य - एक्स्प्रेस हा माहितीपूर्ण कार्यक्रम होता आणि माझ्या विद्यार्थ्यांसाठी तो खूपच उपयुक्त होता. हा एक चांगला उपक्रम आहे आणि आपण विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारच्या उपक्रमांना प्रोत्साहन दिले पाहिजे.
 

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

After Abida Parveen & Atif Aslam's magical performance, Next is Enrique Iglesias who is all set to perform in UAE