मिंत्राचे ईओआरएस-१६ ५० लाखांहून अधिक ग्राहकांना सेवा देण्यासाठी व गर्दीच्या वेळेत दर मिनिटाला १६,००० हून अधिक ऑर्डर्स हाताळण्यासाठी सज्ज
मिंत्राचे ईओआरएस-१६ ५० लाखांहून अधिक ग्राहकांना सेवा देण्यासाठी व
मिंत्राच्या द्विवार्षिक ईओआरएस या कार्यक्रमाच्या १६व्या पर्वाच्या रूपाने भारतातील सर्वात मोठा फॅशन महोत्सव सुरू होत आहे. देशातील लक्षावधी फॅशनप्रेमींसाठी हा उपक्रम आनंद व उत्साह घेऊन येत आहे. ११ ते १६ जून या काळात घेतला जाणारा हा महोत्सव त्याच्या मागील पर्वांहून अधिक मोठा असणार आहे. यात ५०००हून अधिक ब्रॅण्ड्सच्या १४ लाख स्टाइल्सचे आत्तापर्यंतचे सर्वांत मोठे कलेक्शन असणार आहे. या ६ दिवसांच्या कार्यक्रमादरम्यान फॅशन, लाइफस्टाइल, ब्युटी अँड पर्सनल केअर तसेच होम या विभागांत अभूतपूर्व अशा ऑफर्स दिल्या जाणार आहेत. याचा लाभ देशभरातील ५० लाख अनोख्या ग्राहकांना मिळणार आहे. मागणीमध्ये बीएयूच्या ३ पट वाढ होणे अपेक्षित आहे आणि मागील जुलैमध्ये झालेल्या ईओआरएसच्या तुलनेत २६ टक्के अधिक ग्राहक सहभागी होणे अपेक्षित आहे. मिंत्राला १० लाखांहून अधिक नवीन ग्राहक अपेक्षित आहेत आणि यातील ४० टक्क्यांहून अधिक श्रेणी २ व ३ शहर-गावांतील असतील असाही अंदाज आहे.
Comments
Post a Comment