एयू स्मॉल फायनान्स बँकेने आणले उद्योगक्षेत्रातील पहिले कस्टमायजेबल क्रेडिट कार्ड, एलआयटी
एयू स्मॉल फायनान्स बँकेने आणले उद्योगक्षेत्रातील पहिले कस्टमायजेबल क्रेडिट कार्ड, एलआयटी
● एलआयटी (लिव्ह इट टुडे) क्रेडिट कार्ड, पूर्वनिश्चित सुविधांऐवजी कार्डधारकांना त्यांच्या सातत्याने बदलणाऱ्या जीवनशैलीच्या गरजांनुसार क्रेडिट कार्ड सुविधा निवडण्याची मुभा देते
● एकाच कार्डावर प्रवास, मनोरंजन, खरेदी, इंधन आणि डायनिंगसाठी कस्टमाइझ करण्याजोगे लाभ उपलब्ध करून देण्यासाठी आणली आहे पे-पर-फीचर सुविधा तसेच कोणतेही फीचर हवे तेव्हा ऑन/ऑफ करण्याची सुविधा
मुंबई, २२ जून, २०२२: आपल्या बदलाव (परिवर्तन) या उद्दिष्टाला जागत, एयू स्मॉल फायनान्स बँकेने आज एक नवोन्मेषकारी क्रेडिट कार्ड उत्पादन बाजारात आणले आहे. हे उत्पादन क्रेडिट कार्ड क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून आणेल असे आहे. एयू बँक एलआयटी (लिव्ह-इट-टुडे) क्रेडिट कार्ड हे भारतातील सर्वांत मोठ्या स्मॉल फायनान्स बँकेने तसेच सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या रिटेल बँकांपैकी एका बँकेने आणलेले उत्पादन कार्डधारकांना एक अनन्यसाधारण मूल्यविधान देऊ करते. हे मूल्यविधान म्हणजे कार्डधारक त्यांना हवी ती फीचर्स निवडू शकतात आणि त्यांना हव्या तेवढ्या काळासाठी ती कार्यान्वित करू शकतात.
क्रेडिट कार्ड कंपन्या वेगवेगळ्या प्रवर्गांमध्ये आकर्षक उत्पादने देऊ करत असल्या तरी ग्राहकांसाठी या सर्व सुविधांचा मेळ एका कार्डात घालणे बहुतेकदा खूपच कठीण जाते. यामुळे त्यांना विशिष्ट प्रवर्गात लाभ देणारी वेगवेगळी क्रेडिट कार्डे बाळगणे भाग पडते. उदाहरणार्थ, प्रवासाशी निगडित खर्च जास्तीत-जास्त प्रमाणात करण्यासाठी ट्रॅव्हल कार्ड घ्यावे लागते किंवा ई-कॉमर्स साइट्सवरून खरेदी करण्यासाठी को-ब्रॅण्डेड कार्डस् घ्यावी लागतात. या एलआयटी क्रेडिट कार्डाद्वारे बँकेने ही फीचर्स निवडण्याची शक्ती ग्राहकांच्या हाती दिली आहे. सर्व प्रकारच्या सुविधा त्यांना एकाच कार्डाद्वारे मिळू शकतात. एवढेच नाही, तर त्यांना त्यांच्या जीवनशैलीच्या बदलत्या गरजांनुसार या सुविधा ऑन किंवा ऑफ करण्याची मुभाही दिली जाते.
एलआयटी क्रेडिट कार्ड आपल्या एयू०१०१ अॅपमार्फत, ग्राहकांना अनेक सुविधा देते. ते त्यांची दैनंदिन बचत/उत्पन्न या अॅपद्वारे ट्रॅक करू शकतात व लाभांचे प्रमाण कमाल स्तरावर नेऊ शकतात. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या कार्डामध्ये अनेकविध लाभ आहेत आणि ग्राहक कोणतेही फीचर सहज जाता-येता रिअल टाइम तत्त्वावर सक्रिय करू शकतात. यासाठी त्यांना केवळ अल्पसे कन्विनियन्स शुल्क भरावे लागते. एलआयटी कार्डधारकांना ऑफर्सवर व या ऑफर्सपोटी भराव्या लागणाऱ्या शुल्कांबाबत संपूर्ण नियंत्रण पुरवते. ग्राहक हे शुल्क अत्यंत स्पष्ट, पारदर्शक पद्धतीने भरू शकतात. वापरत नसलेल्या लाभांसाठी वार्षिक शुल्क/नूतनीकरण शुल्क अशा अनेक शुल्कांच्या कचाट्यातून या कार्डामुळे ग्राहकांची सुटका होणार आहे. कार्डधारक, दिलेल्या ऑफर्सचा उपयोग करून, कॅशबॅक्स व रिवॉर्ड पॉइंट्स यातील जे काही सर्वोत्तम असेल, ते उपलब्ध करून घेऊ शकतात. कोणत्याही फीचरचा सरसकट वैधता कालावधी ९० दिवस एवढा आहे.
एलआयटी क्रेडिट कार्ड पाच प्रवर्गांतील फीचर्स देऊ करते, ती पुढीलप्रमाणे:
लाउंज अॅक्सेस: यामध्ये ग्राहक दर तिमाहीत एक किंवा दोन लाउंज अॅक्सेसेसचा पर्याय निवडू शकतात.
माइलस्टोन बेनिफिट्स: याद्वारे कार्डधारक अधिक रिवॉर्ड पॉइंट्स किंवा कॅशबॅक्स मिळवू शकतात.
ओटीटी अँड लाइफस्टाइल सदस्यत्व: यामध्ये कार्डधारक विविध प्लॅटफॉर्म्स व सेवांचे सदस्यत्व मोफत मिळवू शकतात.
अॅक्सलरेटेड रिवॉर्डस् (ऑनलाइन/ऑफलाइन): यात ग्राहक ऑनलाइन व पीओएस व्यवहारांसाठी अधिक रिवॉर्ड पॉइंट्स प्राप्त करू शकतात.
अन्य फीचर्स: यांमध्ये इंधनावरील उपकरात सवलत, किराणा मालाच्या खरेदीवर कॅशबॅक तसेच अन्य अनेक सुविधांचा समावेश होतो.
“एयू बँकेमध्ये आम्ही नेहमीच तंत्रज्ञान व नवोन्मेषाचा लाभ घेऊन बँकिंग उद्योगाला आवश्यक ते बदल घडवून आणून ‘जैसे थे’ स्थितीला आव्हान देण्यावर विश्वास ठेवतो. गेल्या वर्षी आम्ही आमच्या ग्राहकांना सक्षम करण्यासाठी क्रेडिट कार्ड पोर्टफोलिओ सुरू करणारी पहिली स्मॉल फायनान्स बँक झालो. लवकरच आमच्या लक्षात आले की, डिजिटली-सॅव्ही व जेनझेड ग्राहकांना ते वापरत असलेल्या उत्पादनांवर स्वत:चे अधिक नियंत्रण हवे असते. यातूनच कस्टमाइझ करता येण्याजोग्या एलआयटी क्रेडिट कार्डाची उत्क्रांती झाली. यामुळे एकाच कार्डामध्ये अनेक क्रेडिट कार्डांचे फीचर्स एकत्र करणे शक्य होणार आहे. आम्ही अशा प्रकारची नवोन्मेषकारी उत्पादने आणतच राहू आणि कामाच्या माध्यमातून बदलाचे प्रतिनिधी होण्याच्या अर्थात 'बदलाव हमसे है' या आमच्या उद्दिष्टाला जागत राहू,” असे एयू स्मॉल फायनान्स बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजय अगरवाल म्हणाले.
एयू बँक पूर्वीपासूनच कार्डविषयक अनेक सेवा देत असली, तरी एलआयटी कार्डाची भर यात पडल्यामुळे डिजिटल-सॅव्ही पिढीतील माहितीपूर्ण वापरकर्त्यांच्या बदलत्या गरजांची पूर्तता बँकेला अधिक चांगल्या पद्धतीने करता येणार आहे. एयू बँकेने गेल्या वर्षी क्रेडिट कार्डांची पहिली श्रेणी बाजारात आणली. तेव्हापासून बँकेने २०० हून अधिक श्रेणी २ व श्रेणी ३ जिल्ह्यांमध्ये २.३ लाख क्रेडिट कार्ड ग्राहकांची यशस्वीरित्या नोंदणी केली आहे. यातील बहुतेकांचे हे पहिलेच क्रेडिट कार्ड आहे.
=======
Comments
Post a Comment