शेअरचॅटने आपल्या लोकप्रिय टॅलेंट हंट ‘मेगा स्टार’चा तिसरा सीझन लाँच केला

 शेअरचॅटने आपल्या लोकप्रिय टॅलेंट हंट ‘मेगा स्टार’चा तिसरा सीझन लाँच केला



मुंबई, 30 जून 2022: शेअरचॅट, भारतातील लिडिंग सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने त्यांचा लोकप्रिय टॅलेंट हंट 'मेगा स्टार' लाँच करण्याची घोषणा केली. स्पर्धेचे उद्दिष्ट तिसर्‍या सेशनमध्ये, भारतभरातील डिजिटल क्रिएटर्समध्ये नऊ कॅटेगरी आणि दहा भाषांमध्ये उल्लेखनीय लोकल टॅलेंट शोधण्याचे आहे. दोन सीझन यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर, मेगास्टार सीझन 3 मोठा आणि चांगला असण्याची अपेक्षा आहे कारण यावेळी क्रिएटर्स ऑटोमोबाईल्स, गॅजेट्स आणि टेक, बिझनेस, शिक्षण आणि नोकरी, इमोशन्स, एंटरटेनमेंट, ह्युमर, लाईफस्टाईल, न्यूज व भक्ती आणि ज्योतिष यांसारख्या कॅटेगरीमध्ये स्पर्धा करतील. हे पुढे हिंदी, पंजाबी, तमिळ, तेलगू, मराठी, कन्नड, मल्याळम, गुजराती, बंगाली आणि ओडिया अशा विविध भाषांमध्ये पसरवले जाईल.

60 दिवसांची कॅम्पेन इमेजेस, शॉर्ट, लॉंग आणि मोशन व्हिडिओ यासारख्या कंटेंट कॅटेगरीमध्ये प्रवेश आमंत्रित करेल आणि कंटेंट क्रिएटर्सला प्लॅटफॉर्मवर सामील होण्यासाठी प्रोत्साहित करेल आणि उत्कृष्ट पुरस्कारांसह युनिक टॅलेंट साजरे केले जाईल. विजेत्यांना चार कॅटेगरीमध्ये बक्षीस दिले जाईल - प्रत्येकी 10 मेगास्टार्स आणि सुपरस्टार्स, 60 प्रॉमिसिंग स्टार्स आणि 720 रायझिंग स्टार्समध्ये, त्यांच्या कंटेंटवरील व्हिजिबिलिटी आणि एंगेजमेंटच्या आधारावर. गेल्या वर्षी, कॅम्पेनमध्ये 220K हून अधिक क्रिएटर्सने सहभाग घेतला, ज्यांनी 2.9 दशलक्ष पेक्षा जास्त UGC तयार केले ज्याने 1.5 अब्ज पेक्षा जास्त व्ह्यूज मिळविले.

कॅम्पेनच्या शेवटच्या सीझनमध्ये वर्षा काळे, मयुरी होकटे, आशितोष श्रीपती पाटील, मंथन भागवत, करण धारकर, शशिकांत प्रभाकर गुरव यांनी मराठीतील मेगास्टारचा किताब पटकावला.

लॉंचबाबत कमेंट करताना, शशांक शेखर, सीनियर डायरेक्टर – कंटेंट स्ट्रॅटेजी आणि ऑपरेशन्स, शेअरचॅट म्हणाले, “शेअरचॅटने नेहमीच भारतातील विविध क्षेत्रांमधील त्याच्या क्रिएटर्स कम्युनिटीमध्ये गुंतवणूक करण्यावर आणि लोकल क्रिएटर्सला एक प्लॅटफॉर्म तयार करण्यावर भर दिला आहे. याचमुळे ते त्यांच्या अविश्वसनीय टॅलेंटसाठी ओळखले जातात. मागील दोन सीझनमध्ये अप्रतिम प्रतिसाद मिळाल्यानंतर, आम्ही मेगास्टारच्या या सीझनबद्दल खूप आशावादी आहोत. आमचा प्लॅटफॉर्म 32 दशलक्षाहून अधिक टॅलेंटेड क्रिएटर्सचे घर आहे. या कॅम्पेनचा उद्देश टॉप क्रिएटर्सला प्रकाशात आणणे आहे जे शेअरचॅट कम्युनिटीचे त्यांच्या ओरिजिनल, मजेदार कंटेंटसह मनोरंजन करतात."

संपूर्ण कॅम्पेनदरम्यान, विजेत्यांना iPhone 12, Honda Activa आणि रु. 1,000-5,000/- पर्यंतच्या Amazon व्हाउचर सारख्या बक्षिसांसह 25 लाख रुपयांची बक्षिसे जिंकण्याची संधी मिळेल. विजेत्यांना शेअरचॅटवर प्रीमियम ओरिजिनल क्रिएटर्स बनण्याची संधी देखील मिळेल.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

After Abida Parveen & Atif Aslam's magical performance, Next is Enrique Iglesias who is all set to perform in UAE