पिनॅकल इंडस्ट्रीजची सिटीफ्लोसह त्यांच्या मालकीच्या नवीन बसकरिता अंतर्गत सजावटीसाठी भागीदारी
पिनॅकल इंडस्ट्रीजची सिटीफ्लोसह त्यांच्या मालकीच्या नवीन बसकरिता अंतर्गत सजावटीसाठी भागीदारी
शहरातील भारतीय प्रवाशांकरिता स्व-मालकीच्या अशाप्रकारच्या एकमेव नवीन बस डिझाईन सादर
मुंबई, 15 जून 2022: पिनॅकल इंडस्ट्रीज, ही भारताची एकमेव एकीकृत व्यापारी वाहन आसन आणि अंतर्गत सजावट कंपनी असून आयसीई आणि ईव्ही परिघातील ओईएम व्यापारी वाहनांकरिता सर्वंकष पर्याय उपलब्ध करून देणारी कंपनी आहे. मुंबईची अॅप-आधारीत प्रवासी कंपनी सिटीफ्लोकरिता त्यांच्या नवीन मालकीच्या बसचे डिझाईन, विकास आणि निर्मितीकरिता पुन्हा एकदा पुढाकार घेतला आहे. हे देशातील असे एकमेव बस डिझाईन खासकरून शहरी भारतीय प्रवासी वर्गाकरिता आहे. आगामी 2 वर्षांत 1 लाख ग्राहकांसाठी 1,500 नवीन बसची सेवा उपलब्ध करून देण्याची सिटीफ्लोची योजना आहे.
पिनॅकल इंडस्ट्रीज ही भारतामधील अग्रगण्य वाहन सजावट, आसन यंत्रणा, ईव्ही सुटे भाग, विशेष वाहने, रेल्वे आसन आणि इलेक्ट्रिक वाहने कंपनी आहे. सिटीफ्लोच्या डिझाईन आणि निर्मिती प्रक्रियेने पूर्ण होण्यासाठी जवळपास 2 वर्षे घेतली. बसची आगामी आवृत्ती तयार करण्यासाठी दळणवळण उद्योग क्षेत्रातील मातब्बर कंपनी भागीदारीसाठी पुढे आली आहे. पिनॅकल इंडस्ट्रीजच्या वतीने आसन, अंतर्गत ट्रीम्स पॅनल, सामान ठेवण्याची जागा, चालकाच्या जागेवर असलेले पार्टीशन/नियतकालिकं ठेवण्यासाठी जागा, छत्रीचे होल्डर, छत, फ्लोअरिंग आणि अवतीभवतीची रोषणाई नवीन बसच्या डिझाईन, विकास आणि निर्मितीत काम करणार आहे.
सिटीफ्लोच्या नवीन, स्व- मालकीच्या बसचे अंतर्गत सजावटीचे डिझाईन आणि विकास आणि निर्मिती पिनॅकल इंडस्ट्रीजने केली आहे. सिटीफ्लो ग्राहक तळात विशेष ग्राहककेंद्री संशोधनाच्या आधारावर अंतीम आसन प्रकार सादर होण्यापूर्वी तीन प्रकारच्या आसनांची निर्मिती करण्यात आली. त्यासाठी बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांचे वर्तन लक्षात घेण्यात आली. भारत बेंझ चेसीसचा वापर करून आवश्यक मानके आणि अपेक्षा गाठण्यासाठी या बसची बांधणी विविध पैलू लक्षात घेऊन करण्यात आली आहे. सध्याच्या बसमधील अंतर्गत डिझाईन नव्याने करण्यात आली असून त्यानुसार नवीन साज चढवण्यात आला आहे.
या भागीदारीविषयी बोलताना पिनॅकल इंडस्ट्रीजचे अध्यक्ष अरिहंत मेहता म्हणाले, “प्रवाशांच्या दृष्टीने सर्वोत्तम आरामाची खातरजमा आमच्या सिटीफ्लो भागीदारीसह करण्यात येईल. ही भागीदारी पिनॅकल इंडस्ट्रीजची बाजू व्यापारी दळणवळण परिघात एक नेतृत्व म्हणून भक्कम करेल. भारतीय रस्त्यांसाठी पिनॅकल आणि सिटीफ्लो, दोघंही अधिक वृद्धिंगत वाहतूक अनुभव देईल असा आत्मविश्वास वाटतो.”
या भागीदारीबद्दल बोलताना सिटीफ्लोचे क्रिएटीव्ह हेड, विपिन जो म्हणाले, “पिनॅकल इंडस्ट्रीजसह आमच्या भागीदारीने एक असा ग्राहक अनुभव डिझाईन करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली, जी सिटीफ्लो ग्राहकांसाठी अद्वितीय होती. ऑटोमोटीव्ह इंटीरियर (वाहनाची अंतर्गत सजावट)आणि सिटींग सिस्टीम (आसन व्यवस्था) विकसीत करण्यात त्यांच्या तज्ज्ञतेसह, पिनॅकलने आम्हाला संक्षिप्त आधारावर डिझाइनिंग, प्रोटोटाईप आणि निर्मितीमधील सर्वोत्तम स्त्रोत प्रदान केले. त्यांच्यासह आमची भागीदारी सुरू आहे, कारण आम्हाला अंतर्गत सजावटीचे परीक्षण आणि सुधारणा करण्यासाठी चालना मिळते.”
such a nice content and informative
ReplyDelete