ड्रीमफोक्स सर्व्हिसेस लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) २४ ऑगस्ट २०२२ पासून खुली होणार

 

ड्रीमफोक्स सर्व्हिसेस लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) 

२४ ऑगस्ट २०२२ पासून खुली होणार

·         दर्शनी मूल्य २ रुपये असणाऱ्या प्रत्येक समभागासाठी (इक्विटी शेअर) रु.३०८ ते रु.३२६  किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे.

·         ही बीड/ऑफर बुधवार २४ ऑगस्ट २०२२ पासून २६ ऑगस्ट २०२२ पर्यंत सुरु आहे.

·         इक्विटी शेअरच्या दर्शनी मूल्याच्या १५४ पट फ्लोअर किंमत आणि इक्विटी शेअरच्या दर्शनी मूल्याच्या १६३ पट कॅप प्राइस आहे.

·         बोली किमान ४६ इक्विटी समभागांसाठी आणि त्यानंतर ४६ च्या पटीत लावता येणार आहे.

 

मुंबई, २२ ऑगस्ट २०२२: ड्रीमफोक्स सर्व्हिसेस लिमिटेडची (“कंपनी”) प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) बुधवार २४ ऑगस्ट २०२२ पासून खुली होणार आहे.

 प्रत्येक समभागासाठी (इक्विटी समभाग) रु.३०८ ते रु. ३२६ किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. बोली किमान ४६ इक्विटी समभागांसाठी आणि त्यानंतर ४६ च्या पटीत लावता येणार आहे.

आयपीओ मध्ये १७,२४२,३६८ पर्यंतचे इक्विटी समभाग प्रवर्तक विक्री समभागधारक यांच्या कडून ऑफर फॉर सेल मधून ऑफर म्हणून समाविष्ट आहेत. ऑफर फॉर सेल मध्ये ६,५३१,२०० पर्यंतचे इक्विटी समभाग मुकेश यादव यांचे, ६,५३१,२०० पर्यंतचे इक्विटी समभाग दिनेश नांगपाल आणि ४,१७९,९६८ पर्यंतचे इक्विटी समभाग लिब्रथा पीटर कल्लत यांचे आहेत.

सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया सेबी (इश्यू ऑफ कॅपिटल अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) २०१८च्या सुधारित (“SEBI ICDR Regulations”) नियम 31 सोबत सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट (रेग्युलेशन) रुल्स १९५७च्या १९()() सुधारित नियमावलीनुसार  ही ऑफर खुली करण्यात आली आहे. सेबी आयसीडीआर नियामकांच्या () निर्देशांनुसार ही ऑफर बुक बिल्डींग प्रक्रीयेद्वारे जाहीर करण्यात आली असून त्याअंतर्गत प्रमाणित तत्त्वावर पात्र संस्थात्मक खरेदीदारांना (QIBs) वाटपासाठी नेट ऑफरच्या किमान ७५% पेक्षा कमी नसलेल्याना समभाग उपलब्ध होतील. बुक रनिंग लीड मॅनेजर्सशी सल्लामसलत करून कंपनी आणि TPG Growth IIISFPte. Ltd  पात्र संस्थात्मक खरेदीदारांच्या हिश्शातील ६० टक्क्यांपर्यंत समभाग प्रमाणित तत्वावर प्रमुख गुंतवणूकदारांना (Anchor Investors) वाटपासाठी उपलब्ध करू देईल. त्यापैकी एक तृतीयांश समभाग स्थानिक म्युचुअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. सेबी आयसीडीआर नियामकांच्या निर्देशांनुसार स्थानिक म्युचुअल फंडांकडून प्रमुख गुंतवणूकदारांसाठी ("प्रमुख गुंतवणूकदार वाटप किंमत")  राखीव करण्यात आलेल्या वाटप किंमतीइतक्या किंवा अधिक किंमतीसाठी ऑफर मिळाल्यासच त्यांना हा एक तृतीयांश हिस्सा मिळू शकेल. जर प्राथमिक समभाग विक्रीमध्ये प्रस्तावित पेक्षा कमी समभागांना मागणी आली किंवा प्रमुख गुंतवणूकदारांच्या हिश्शामध्ये वाटप झाले नाही तर असे सर्व शिल्लक समभाग पात्र संस्थात्मक खरेदीदारांच्या (QIBs) हिश्शामध्ये वर्ग करण्यात येतील.

ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास QIB च्या एकूण हिश्शापैकी % फक्त म्युच्युअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध असतील आणि QIBचा उर्वरित हिस्सा म्युच्युअल फंडांसह अन्य सर्व QIB बोलीधारकांसाठी उपलब्ध करून दिला जाईल. ऑफर प्राईस इतक्या किंवा QIB भागाच्या % हून कमी किमतीला बोली मिळाल्यास QIB मध्ये सुयोग्य वाटपासाठी म्युच्युअल फंड भागात वाटणीसाठी उपलब्ध झालेले राहिलेले इक्विटी समभाग उर्वरित QIB भागात वर्ग होतील. तसेच, सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार ऑफरच्या १५ टक्क्यांपेक्षा जास्त नसलेला हिस्सा प्रमाणित तत्वावर बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी आणि बिगर संस्थात्मक भागांतर्गत बिगर संस्थात्मक बोलीदारांना वाटप करण्यासाठी उपलब्ध असलेले इक्विटी शेअर्स, खालील गोष्टींच्या अधीन असतील: (i) एक तृतीयांश भाग २००,००० रुपयांपेक्षा जास्त आणि १,०००,०००  रुपयांपर्यंत अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल आणि (ii) दोन तृतीयांश भाग १,०००,०००  रुपयांपेक्षा अधिक अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल. अर्थात वर उल्लेख केलेल्या कोणत्याही उपविभागातील सबस्क्राईब न झालेल्या भागाची वाटणी बिगर -संस्थात्मक बोलीदारांच्या इतर उप-श्रेणीमधील अर्जदारांमध्ये होऊ शकेल. सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार योजनेच्या १० टक्क्यांपेक्षा जास्त नसलेला हिस्सा किरकोळ (रिटेल) गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. ऑफरच्या किमान ७५% ऑफर QIB बोलीधारकांना वाटप करता येऊ शकणार नाही. संपूर्ण अर्ज प्रक्रिया किंमत परत केली जाईल. किंमतीच्या समकक्ष किंवा त्यापेक्षा अधिक किंमतीला मागणी आल्यासच हे हिस्सा वाटप केले जाईल. प्रमुख गुंतवणूकदारांखेरीज (Anchor Investors) रिटेल गुंतवणूकदरांसह सर्व संभाव्य गुंतवणूकदारांनी आपापल्या बँक खात्यांचा तपशील (युपीए आयडीसह) जाहीर करून अर्जाची विहित रक्कम ब्लॉक (“ASBA”) करून ठेवणे बंधनकारक आहे. त्यानुसार योजनेत सहभागी करून घेण्यासाठी सर्व बोली रकमा या एससीएसबीतर्फे  ब्लॉक करून ठेवण्यात येतील. प्रमुख गुंतवणूकदारांना त्यांच्यासाठीच्या हिश्शात ASBA प्रक्रीयेनुसार सहभागी होण्याची परवानगी नाही. तपशीलवार माहितीसाठी रेड हेंरिंग प्रॉस्पेक्टसच्या २८९ पानावर सुरू होणारे “ऑफर प्रोस्युजर” बघा.

या रेड हेंरिंग प्रॉस्पेक्टस द्वारे सादर होणारे इक्विटी समभाग बीएसई आणि एनएसई वर नोंदणीकृत करण्याचा प्रस्ताव आहे.

इक्वीरस कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड आणि मोतीलाल ओसवाल इन्वेस्टमेंट अॅडव्हायझर्स लिमिटेड हे या ऑफरचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24