केप्री लोन्सच्या वतीने १००+ शाखांसह सुवर्ण कर्ज व्यवसाय कामकाजाला सुरुवात


केप्री लोन्सच्या वतीने १००शाखांसह सुवर्ण कर्ज व्यवसाय कामकाजाला सुरुवात

 

~उत्तर आणि पश्चिम भारतात आर्थिक वर्ष २३ च्या प्रथम अर्धवार्षिकीत एआय-प्रणीत सिक्युरिटी वॉल्टसह २०० सुवर्ण कर्ज शाखा लॉन्च करण्याचे ध्येय ~



 

मुंबई२३ ऑगस्ट २०२२: केप्री लोन्स ही अग्रगण्य एनबीएफसी असून एमएसएमई कर्ज आणि गृह वित्त क्षेत्रात कार्यरत आहेत्यांनी राजस्थानमध्य-प्रदेश, दिल्ली-एनसीआरहरियाणागुजरातउत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र पट्ट्यात १०० हून अधिक शाखांसह सुवर्ण कर्ज व्यवसाय कामकाजाची सुरुवात केली. सोन्याच्या दागिन्यांना उत्तम दर्जाची सुरक्षितता देण्यासाठीया सुवर्ण कर्ज शाखा एआय-प्रणीत सिक्युरिटी वॉल्टस ने सुसज्जित आहेत. उत्तर आणि पश्चिम भारतात आर्थिक वर्ष २३ च्या प्रथम अर्धवार्षिकीत एआय-प्रणीत सिक्युरिटी वॉल्टसह २०० सुवर्ण कर्ज शाखा लॉन्च करण्याचे या कंपनीचे ध्येय आहे.

 

सर्व शाखांमध्ये तंत्रज्ञान राबवल्याने केप्री लोन्स जलदपारदर्शक आणि गुंतागुंत-मुक्त सुवर्ण कर्ज वित्त उपलब्ध करून देणे शक्य होईल. या शाखा बहुविध परतावा पर्यायांसह  ते १२  महिन्यांच्या कालावधीत सुवर्ण कर्ज उपलब्ध करून देतील. केप्री लोन्सच्या वतीने बाजारात उपलब्ध व्याज दरांच्या तुलनेत वाजवी किंमतीत एकूण तारण ठेवलेल्या सोन्याच्या ७५% पर्यंत कर्ज देण्यात येईल. त्याशिवायतारण ठेवण्यात आलेल्या सोन्याच्या ऐवजाच्या बदल्यात कंपनीकडून समतुल्य रकमेचा मोफत विमा उपलब्ध करून देण्यात येतो.

 

केप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक राजेश शर्मा म्हणाले, “तंत्रज्ञानाच्या दृष्टीने प्रगत सुवर्ण कर्ज एक पाऊल पुढे नेण्यास आम्ही अतिशय उत्सुक आहोतकारण आम्हाला सुवर्ण कर्ज बाजारपेठेत भरपूर संधी दिसते आहे. महामारीमुळे आर्थिक ताण वाढल्याने अल्प ते मध्यम उत्पन्न असलेल्या घरांमध्ये कर्ज मागणी वाढली आहे. सोन्याविषयी लोकांच्या मनात भावनिक ओढ असते. लोक सोने विकण्यापेक्षा अल्प कालावधीसाठी तारण कर्ज घेणे पसंत करतात. देशातील ग्रामीण आणि निमशहरी भागांत या ट्रेंडचे पुरावे आढळतात. आमच्या सुवर्ण कर्ज उत्पादनाच्या माध्यमातून ग्राहकांकडे असलेल्या सुरक्षित मालमत्ता आणि वित्त यांचा फायदा घेऊन वित्तीय आपतकालीन स्थितिशिवायविविध गरजांनुरूप कर्ज घेण्यासाठी सबलीकरण करण्यात येते. देशातील उत्तर आणि पश्चिम पट्ट्यात असणाऱ्या III, IV आणि V वर्गवारीत मोडणाऱ्या शहरांमध्ये आमची वाटचाल बुलंद आहे. रु. ८००० कोटींच्या सुवर्ण कर्जाची नोंद करण्याचे आमचे उद्दिष्ट असून आगामी पाच वर्षांत १५०० शाखांसह संपर्कजाळे विस्तारण्याचा मानस आहे”.    

 

"कॅप्रीमध्ये नवीन युगातील कर्ज इच्छुकांसाठीतंत्रज्ञान-प्रणीत एनबीएफसी होण्याकरिता आमचा प्रयत्न सातत्याने सुधारणा घडविण्याचा आहे. पुढील टप्प्यातील वित्तीय वृद्धी व्यत्यय कर्ज समावेशकतेने गाठणे शक्य आहे हा आमचा विश्वास आहे. आमची नाविन्यपूर्ण उत्पादनेगुणवत्तापूर्ण सेवा आणि बाजारातील ज्ञान सर्वसमावेशकतेचा विचार राखण्यातील आमच्या प्रयत्नांना खतपाणी घालणारी ठरणार आहेत”असेही ते पुढे बोलताना म्हणाले.    

 

केप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडचे गोल्ड लोन बिझनेस हेड रविश गुप्ता म्हणाले, “भारतात अजूनही सुवर्ण कर्ज व्यवसायाचे असंघटीत क्षेत्रावर वर्चस्व आहेते कर्जदारांच्या दोन प्रमुख चिंतांमुळे – त्यांच्या मालमत्तेची सुरक्षा आणि अनोळखी घटकाकडे सोने तारण ठेवण्यावर अविश्वास. कॅप्री गोल्ड लोन शाखा एआय-प्रणीत सिक्युरिटी वॉल्टस सुसज्जित असल्याने मालमत्तेविषयी सुरक्षाविषयक चिंता कमी होते. त्याशिवायआमचा १०० टक्के मोफत विमासोने तारण किंमतीच्या समतुल्य असल्याने कर्जदाराला चिंतारहित मालमत्ता-सुरक्षा मिलते. आमचे प्रत्येक ग्राहकांसाठी असलेले कार्यतत्पर रिलेशनशीप मॅनेजर कर्जदाराला पारदर्शकतेची चर्चा करण्याचे स्वातंत्र्य देतील. अगोदर सावकार किंवा सराफांच्या सल्ल्यावर अवलंबून राहावे लागायचेआता अपेक्षेनुसार मार्गदर्शन मिळू शकणार आहे. आमचे बाजारातील उपलब्ध दरांपेक्षा वाजवी व्याज दर आणि पारदर्शक भरणा पर्याय एकत्रित चढ्या व्याज दरापासून आमच्या ग्राहकांचे रक्षण करतील. त्यामुळे आमच्या कार्यरत बाजारपेठांतअतिरिक्त चालना मिळायला मदत होईल. आम्हाला आत्मविश्वास वाटतो कीआमची आकर्षक सुवर्ण कर्ज उत्पादने उत्तर आणि पश्चिमेकडील प्रदेशांत शिरायला मदत करतील व आगामी पाच वर्षांत आमचे व्यवसाय ध्येय गाठण्यासाठी मदत करेल”. 

 

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24