दिवगी
टॉर्क ट्रान्सफर सिस्टीम्स
लिमिटेडतर्फे सेबीकडे डीआरएचपी सादर
दिवगी
टॉर्क ट्रान्सफर सिस्टीम्स
लिमिटेड (दिवगी)ने आपला ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस ("डीआरएचपी") बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ("सेबी") कडे दाखल केला आहे.
दिवगी ही सिस्टम लेव्हल ट्रान्सफर केस, टॉर्क कपलर आणि ड्युअल क्लच ऑटोमॅटिक ट्रान्समिशन ("DCT") सोल्यूशन्स विकसित करण्याची आणि पुरवठा करण्याची
क्षमता असलेल्या भारतातील मोजक्या ऑटोमोटिव्ह घटक कंपन्यांपैकी एक आहे. क्रिसील अहवालानुसार कंपनी भारतातील
टॉर्क कपलरची एकमेव उत्पादक आणि भारतातून जागतिक ओईएम मध्ये ट्रान्सफर केसेस उत्पादित आणि निर्यात करणारी एकमेव कंपनी आहे.
कंपनीची इलेक्ट्रिक
वाहनांसाठी ("EVS") ट्रान्समिशन सिस्टीम विकसित करण्याची आणि प्रदान
करण्याची क्षमता देखील आहे.
कंपनीने ताज्या इश्यूमधून मिळालेल्या निव्वळ
उत्पन्नाचा उपयोग भांडवली खर्चाच्या गरजा भागवण्यासाठी त्याच्या उत्पादन
सुविधांच्या उपकरणांच्या/यंत्रांच्या खरेदीसाठी
अंदाजे
१,५३३.३८ दशलक्ष रुपये आणि सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्देशांसाठी करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.
विक्रीच्या ऑफरमध्ये ओमान इंडिया जॉइंट
इन्व्हेस्टमेंट फंड II द्वारे १७,५०,००० पर्यंतचे इक्विटी शेअर्स, Nrjn फॅमिली ट्रस्ट (त्याच्या कॉर्पोरेट ट्रस्टी, एनट्रस्ट फॅमिली ऑफिस लीगल आणि ट्रस्टीशिप
सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडद्वारे प्रतिनिधित्व)
द्वारे ११,५४,००० पर्यंतचे इक्विटी शेअर्स, भारत भालचंद्र दिवगी यांच्या द्वारे ४९,४३० पर्यंतचे इक्विटी समभाग,
संजय भालचंद्र दिवगी यांच्या द्वारे ४०,४६० पर्यंतचे इक्विटी समभाग,
आशिष अनंत दिवगी यांच्या
द्वारे १०४,०२० पर्यंतचे इक्विटी समभाग, अरुण रामदास इडगुणजी यांच्या द्वारे ३३,६६० पर्यंतचे इक्विटी समभाग आणि किशोर मंगेश कलबाग यांच्या द्वारे १५,२३२ पर्यंतचे इक्विटी समभाग समाविष्ट आहेत.
इंगा व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि इक्विरस
कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड हे या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत. इक्विटी शेअर्स बीएसई आणि एनएसईवर सूचिबद्ध
करण्याचा प्रस्ताव आहे.
Comments
Post a Comment