बँक ऑफ बडोदा उत्सवांच्या निमित्ताने सादर करत आहे ‘खुशियों का त्योहार’
बँक ऑफ बडोदा उत्सवांच्या निमित्ताने सादर करत आहे ‘खुशियों का त्योहार’
होम लोनवर आकर्षक ऑफर्स - शून्य प्रक्रिया शुल्क
आणि 7.95% या खास दराने डिजिटल पद्धतीने जलद कर्जवितारणाची सुविधाने कार लोन उपलब्ध
लोन घेणे अधिक सुलभ करण्यासाठी सुरळीत प्रक्रियेसह डिजिटल लेंडिंगअभियानची सुरुवात
बडोदा तिरंगा जमा योजनावर आकर्षक व्याजदर
मुंबई, 26 सप्टेंबर 2022 : सनाच्या ह्या शुरवाती च्या औचित्याने बँक ऑफ बडोदातर्फे (बँक) या भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील एका आघाडीच्या बँके तर्फे आज खुशियों का त्योहार या वार्षिक उत्सवी अभियानाची सुरुवात करण्यात आली. या अभियानमध्ये ग्राहकांना विविध प्रकारची उत्पादने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. होम लोन व कार लोनवर आकर्षक व्याजदर, प्रकिया शुल्कमाफी किंवा सवलतीच्या दरातील प्रक्रिया शुल्क व इतर ग्राहकांना त्यांच्या स्वप्नातले घर किंवा कार घेण्यासाठी किंवा वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी ही एक स्वर्णम संधी आहे.
बँक ऑफ बडोदा आपल्या ग्राहकांना होम लोन मध्ये वार्षिक 7.95% या आकर्षक व्याजदराने उपलब्ध करत आहे आणि यासाठी कोणतेही प्रोसेसेंग शुल्क आकारत नाही.
बँक ऑफ बडोदा कार लोन वार्षिक 7.95% पासून - 25 बेसिस पॉइंट सवलतीत उपलब्ध करून देत आहे. या व्यतिरिक्त खुशियों का त्योहार या अभियान अंतर्गत ग्राहकांना इतरही अनेक लाभ मिळतील. यात प्रि-पेमेंट/अंशतः पेमेंटचे शुल्क नसणे, सवलतीच्या दरातील प्रक्रिया शुल्क आणि सात वर्षांपर्यंत परतफेडीचा कालावधी यांचा समावेश आहे.
बँक ऑफ बडोदाचे कार्यपालक निदेशक श्री. अजय के. खुराना म्हणाले, “उत्सवांचा सण सुरू होत आहे. हा आपल्या सर्वांसाठीच शुभ काळ असतो. दोन वर्षांच्या कठीण कालावधीनंतर उत्सवाच्या ह्या काळात मागणीमध्ये वाढ होत आहे. लोक आता नव्या उत्साहात व जोशात सण साजरे करण्यास सज्ज झाले आहेत. आमच्या ग्राहकांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांचे सण आणखी उत्साहाने साजरे व्हावे यासाठी त्यांना आमचे उद्दिष्ट आहे.
त्याचप्रमाणे, विविध हेतू साध्य करण्यासाठी विविध प्रकारची कर्जे ग्राहकांना त्वरीत, सुविधाजनक आणि स्मार्ट पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी आणि या उत्सवांचा पुरेपूर आनंद घेण्यासाठी बँकेने डिजिटल लेंडिंग (डिजिटल कर्ज) अभियान सुरू केले आहे. यात विविध प्रकारची डिजिटल कर्जे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यात पूर्व-मुंजुरी मिळाली वैयक्तिक कर्जे, ऑटो लोन, गृह कर्ज, शैक्षणिक कर्ज, मुद्रा कर्ज, एमएसएमई लोन, सुवर्ण कर्ज आणि बडोदा किसान क्रेडिट कार्ड (बीकेसीसी) यांचा समावेश आहे.
कर्ज उत्पादनाव्यतिरिक्त बैंक ग्राहकांना बडोदा तिरंगा डिपॉझिट योजनेअंतर्गत जास्त व्याज मिळविण्याचीही संधी देत आहे. ही एक विशेष फिक्स्ड डिपॉझिट (मुदत ठेव) ऑफर असून या योजनेअंतर्गत अधिक व्याज मिळते. बडोदा तिरंगा डिपॉझिट दोन मुदत कालावधींसाठी उपलब्ध आहेत. यात 444 दिवसांसाठी वार्षिक 5.75% या दराने तर 555 दिवसांसाठी वार्षिक 6.00% दराने व्याज मिळनार. ज्येष्ठ नागरिकांसाठी वार्षिक 0.50% अतिरिक्त व्याज दर लागू आहे. शिवाय 15 लाखांपेक्षा जास्त रकमेच्या नॉन-रिफंडेबल ठेवींवर वार्षिक 0.15% अतिरिक्त व्याजदराचा लाभ मिळेल. या संपूर्ण सण महोत्सवात बडोदा तिरंगा डिपॉझिट योजना उपलब्ध आहे आणि ही योजना 31.12.2022 पर्यंत ग्राहकाना उपलब्ध आहे.
बँक ऑफ बड़ौदा द्वारे बी3 डिजिटल फक्त जमा खाता ग्राहकांकरता सादर केले आहे, जे व्हिडियो केवायसीच्या माध्यमातून ग्राहकांना घरबसल्या खाते उघडू शकतात आणि आकर्षक ऑफर्सचा लाभ घेऊ शकतात.
Comments
Post a Comment